मनोरंजन

दुसऱ्या लग्नावरुन प्रश्न विचारणाऱ्या नेटकऱ्यांना अभिज्ञाने दिले असे उत्तर

Leenal Gawade  |  Mar 1, 2021
दुसऱ्या लग्नावरुन प्रश्न विचारणाऱ्या नेटकऱ्यांना अभिज्ञाने दिले असे उत्तर

2021 हे वर्ष अनेकांच्या जीवनात आनंद घेऊन आले आहे. अनेक सेलिब्रिटी जोडप्यांनी त्यांच्या प्रेमाची घोषणा किंवा लग्नाची गोड बातमी त्यांच्या चाहत्यांना दिली आहे. लॉकडाऊननंतरच्या या काळात अभिनेत्री अभिज्ञा भावे हिचे देखील लग्न झाले. मेहुल पै सोबत तिने तिच्या नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनेकांना तिच्या या आयुष्यातील आनंद पाहून खूपच आनंद झाला आहे. पण काहींना मात्र नको ती चिंता उगीचच सतावू लागली आहे. म्हणूनच त्यांनी अभिज्ञाला चुकिचा प्रश्न विचारत तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. पण अभिज्ञानेही या ट्रोलर्सच्या प्रश्नांना न घाबरता त्याची सडेतोड उत्तरे दिली आहेत. जाणून घेऊया अभिज्ञासोबत नेमकं झालं काय?

मराठी फिल्मफेअर सोहळ्यात मारली ‘आनंदी गोपाळ’ने बाजी

विचारला नको तो प्रश्न

अभिज्ञा भावेने मेहुल पै शी दुसरा विवाह केला आहे. या आधीचे ल्गन तिचे फार काळ टिकू शकले नाहीच. पण मेहुलच्या रुपात तिला एक उत्तम जोडीदार मिळाला आहे. याचा आनंद तिने अनेकदा सोशल मीडियावर व्यक्त केला आहे. पण खूप जणांना तिच्या पहिल्या विवाहाविषयी अधिक चिंता असताना दिसत आहे. अभिज्ञाला ट्रोल करण्यासाठी त्यांनी उगाचच पहिल्या नवऱ्याविषयी प्रश्न विचारला आहे. दुसऱ्या लग्नाचे ठीक आहे पण पहिल्या लग्नाचे काय? असा प्रश्न तिला अनेक नेटकऱ्यांनी विचारला आहे. तिच्या फोटोजवर कमेंट करत अशा पद्धतीने नको त्या खासगी गोष्टीची विचारणा करण्यात आल्यामुळे अभिज्ञाने गप्प न बसता त्याला सडेतोड उत्तर देणे पसंत केले आहे. तिने त्याचा स्क्रिनशॉट काढत तिने त्यांना चांगलेच उत्तर दिले आहे. तिने तिच्या इन्स्टास्टोरीवर हा झालेला सगळा प्रकार सांगितला असून त्या खाली तिने दुर्देवाने हे सगळे माझे मराठी बांधव आहेत अशी कॅप्शन लिहिली आहे.

मेहुल पै शी केला विवाह

अभिज्ञा भावे या क्षेत्रात आली तेव्हा विवाहित होती हे सगळ्यांना माहीत होतं. पण काही कारणास्तव तिचा संसार टिकू शकला नाही. पण तिला मेहुलच्या रुपात एक अनुरुप जोडीदार मिळाला. तिने तिचे रिलेशनशीप सोशल मीडियावर जाहीर केले. त्यानंतर थेट तिच्या लग्नाची जोरदार चर्चा होऊ लागली. 6 जानेवारी 2021 रोजी तिचा विवाहसोहळा पार पडला. या विवाहसोहळ्याला अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. या लग्नासाठी तिचा लुकही एकदम शाही होता. जांभळ्या रंगाच्या सुंदर साडीमध्ये अभिज्ञा दिसली होती. पारंपरिक नऊवारी साडी, खोपा असा तिचा लुक या लग्नासाठी तिने केला होता. तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

शिव ठाकरेच्या नव्या फोटोची सगळ्या सोशल मीडियावर चर्चा

खुलता खळी खुलेना मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला

अभिज्ञा भावेला खरी ओळख मिळाली ती तिच्या ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेतून. त्याने या मालिकेत खलनायकाची भूमिका केली होती. तिची ही भूमिका फारच गाजली. त्यानंतर तिला अनेक मालिकांमधून आणि नाटकांमधून काम करण्याची संधी मिळाली. तुला पाहते रे,  रंग माझा वेगळा अशा मालिकांमधून तिने कामं केली आहेत. सध्या ती स्वत:चा एक क्लोथिंग ब्रँडही चालवत आहे. तेजाज्ञा असे या ब्रँडचे नाव असून तेजस्विनी पंडित आणि अभिज्ञा असे दोघे तो ब्रँड चालवत आहे. 

अंकुश चौधरीची नवी भूमिका, गुंतवणूकदार म्हणून नेटफ्लिक्समध्ये प्रवेश

 सध्या या ट्रोलर्सना अभिज्ञाने चांगलेच उत्तर दिले असे म्हणायला हवे. 

Read More From मनोरंजन