मनोरंजन

अभिजीत खांडकेकर मराठीतला रणवीर सिंह, नेटकऱ्यांची प्रतिक्रिया

Leenal Gawade  |  Jul 12, 2021
अभिजीत खांडकेकर मराठीतला रणवीर सिंह, नेटकऱ्यांची प्रतिक्रिया

रणवीर सिंह हा बॉलीवूडमधील असा स्टार आयकॉन आहे जो त्याच्या फॅशनमुळे सगळीकडेच चर्चेत असतो. त्याच्या ड्रेसिंगसेन्स हा सगळ्यांसाठीच चर्चेचा विषय ठरतो. त्याच्यासारखी फॅशन कोणीच करु शकत नाही हे खरे असले तरी मराठीतील एक कलाकार हा तितकी रिस्क घेऊन सध्या वेगवेगळ्या फॅशन करताना दिसत आहे तो म्हणजे अभिनेता अभिजीत खांडकेकर. अभिजीतने त्याचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये त्याने त्याचे वेगळ्या लुकमधील फोटो शेअर केले आहेत. त्यामुळेच नेटीझन्सने त्याची तुलना ही रणवीर सिंह अशी केली आहे. त्याच्या फोटोवर ही प्रतिक्रिया आल्यामुळे आता सगळीकडे अभिजीतची चर्चा होऊ लागली आहे.

बाई, बुब्स आणि ब्रा वर झाली हेमांगी कवी व्यक्त, ‘लोक काय म्हणतील’चं ओझं किती वहायचं

अभिजीतने शेअर केले फोटोज

अभिजीतने त्याच्या इन्स्टा अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तो एका मल्टी कलर शर्ट मध्ये दिसत आहे. बेसिकली पॅचवर्क केलेले असे हे शर्ट आहे. त्याच्याखाली त्याने पलाझो पँट देखील घातली आहे. ही पलाझो पँट खालून कट असा त्याचा हा लुक त्याने केला आहे. त्या खाली त्याने स्लिपर्स घातल्या आहेत. या त्याच्या लुकमुळेच त्याची तुलना ही रणवीर सिंहची होऊ लागली आहे. त्याचा हा फोटो पाहून खूप जणांनी त्याला मराठीतला रणवीर सिंह अशी कमेंट केली आहे. म्हणूनच की काय त्याचा फोटो हा चांगलाच व्हायरल होऊ लागला आहे

मालिकेतून मिळाली प्रसिद्धी

अभिजीत खांडकेकरला माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतून चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे. या मालिकेतील ग्रे शेड भूमिकेतून तो घरोघरी पोहोचला आहे. एका टँलेंट शोमधून अभिजीतला खरी प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर त्याला या मालिकेतून मोठा ब्रेक मिळाला. इतकेच नाही. तर अभिजीत हा अनेक मालिकांसाठी सूत्रसंचालनाचे काम देखील करतो. त्यामुळे अनेकांच्य तो पसंतीस उतरलेला चेहरा आहे. अभिजीत खांडकेकर हा मराठीतील चॉकलेट बॉय आहे असे म्हणायला काहीच हरकत नाही. 

राहुल वैद्यच्या संगीतची जोरदार तयारी सुरु, व्हिडिओ झाला व्हायरल

रणवीरने शेअर केला फोटो

काहीच दिवसांपूर्वी काही मोठ्या ब्रँडसाठी फोटो शेअर करताना रणवीरने काही विचित्र फोटो शेअर केले होते. त्या फोटोमध्ये त्याने चकचकीत कपडे आणि केसांवर लांब केसांचा टोप घातला आहे. या शिवाय त्याने गळ्यामध्ये जे काही सोन्याचे दागिने घातले आहे. ते पाहता अनेकांना रणवीरला वेड लागले असेच वाटले असेल तर काहींना मात्र रणवीरचा हा फोटो पाहून फारच आनंद झाला. आता अभिजीतच्या या नव्या प्रयोगामुळे त्याची तुलना ही रणवीरशी होणे हे अगदी स्वाभाविक आहे. 

नवीन काहीतरी करायला हवे

मराठीतले कलाकार आता नक्कीच काहीतरी नवं करायचा प्रयत्न करतात. त्यामुळेच आता हिंदीच्या बरोबरीने मराठी कलाकार हे देखील चर्चेत येऊ लागले आहेत. असे नवे काहीतरी करणे हे देखील फारच गरजेचे झाले आहे. 

आता तुम्हाला अभिजीतचा लुक हा रणवीरच्या तुलनेत कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा.

अक्षय कुमारने ‘रक्षाबंधन’साठी वाढवलं पाच किलो वजन, सेटवरचे फोटो व्हायरल

Read More From मनोरंजन