‘कट्यार काळजात घुसली’ या अजरामर संगीत नाटकावर तितकाच उत्तम चित्रपट अभिनेता सुबोध भावेनं दिग्दर्शित केला. या चित्रपटाला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर आता सुबोध भावे ‘संगीत मानापमान’ हे अजरामर नाटक रुपेरी पडद्यावर ‘मानापमान’ चित्रपटाद्वारे सादर करणार असून पुढील वर्षी दिवाळीत हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. कट्यार काळजात घुसली या चित्रपटाने इतिहास रचला. त्यामुळे आता मानापमान या चित्रपटाकडूनही प्रेक्षकांना नक्कीच खूप आशा आहेत. हा चित्रपट कधी येतोय याचीच चाहते वाट पाहात आहेत. तसंच सुबोध भावे पुन्हा एकदा दिग्दर्शन करणार याचाही चाहत्यांना नक्कीच आनंद आहे. एक उत्कृष्ट कलाकृती यामुळे पाहायला मिळेल असा विश्वास सर्वांनाच आहे.
मलायका अरोराने हिऱ्याची अंगठी दाखवल्यामुळे साखरपुडा झाल्याच्या बातम्यांना ऊत
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर घोषणा
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मानापमान या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. चित्रपटाचं टीजर पोस्टर लाँच करण्यात आलं आहे. सुनील फडतरे चित्रपटाची निर्मिती करत आहेत. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनी संगीत मानापमान नाटक लिहिलं होतं, तर शिरीष गोपाळ देशपांडे या चित्रपटाची पटकथा लिहित आहेत. नाटकाचं संगीत गोविंदराव टेंबे यांनी केलं होतं, तर चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन शंकर-एहसान-लॉय करणार आहेत. नमन नटवरा सारखी नांदी या नाटकानं दिली होती. तर नाही मी बोलत नाथा, चंद्रिका ही जणू, शुरा मी वंदिले, युवतीमना दारुण रण अशी उत्तमोत्तम पदं नाटकात होती. ही पदं आजही तितकीच लोकप्रिय आहेत. 1911 मध्ये हे नाटक रंगमंचावर आलं होतं, त्यात बालगंधर्वांची प्रमुख भूमिका होती. आता चित्रपट रुपात हे नाटक येत असताना कोण कलाकार असतील याचं कुतुहल निर्माण झालं आहे. कट्यार काळजात घुसलीद्वारे सुबोध भावने दमदार दिग्दर्शकीय पदार्पण केलं होतं, शंकर-एहसान-लॉय यांनी नाट्यपदांसह सूर निरागस हो, अरुणि किरणी अशी उत्तमोत्तम नवी गाणी कट्यारमधून दिली होती. त्यामुळे संगीत मानापमान नाटकातील कोणती पदं चित्रपटात येणार, नवी गाणी असणार का असे अनेक प्रश्न आहेत. त्याची उत्तरं टप्प्याटप्प्याने मिळतील. जागतिक पातळीवर ज्याप्रमाणे “कट्यार काळजात घुसली” चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती त्याप्रमाणेच “मानापमान” या चित्रपटाला देखील पसंती मिळेल आणि श्रवणीय संगीताची रसिक प्रेक्षकांना मेजवानी मिळेल यात शंका नाही.
लॉकडाऊन उत्तर नाही’असे ट्विट करणाऱ्या महेश कोठारेंवर नेटीझन्सची टीका
कट्यार नंतर पुन्हा एकदा नाटकावर आधारित चित्रपट
कट्यार काळजात घुसली या नाटकावर आधारित सुबोध भावेने चित्रपट केला आणि त्याला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला. आता त्यानंतर पुन्हा एकदा नाटकावर आधारित चित्रपट सुबोध भावे घेऊन येत आहे. मुळात चित्रपटाचं संगीत आणि त्यातील कलाकारांचा अभिनय हा चित्रपटाला नेहमीच वरच्या पातळीवर घेऊन जात असतो. अभ्यासात्मक असं दिग्दर्शन मागच्या वेळीही सुबोध भावेने केले असल्यामुळे मानापमानकडूनही प्रेक्षकांना भरभरून अपेक्षा आहेत. तसंच या चित्रपटातूनही पुन्हा एकदा अप्रतिम संगीत मेजवानी मिळेल याची प्रेक्षक वाट पाहात आहेत. किंबहुना या चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर चित्रपटाची चर्चा प्रेक्षकांमध्येही रंगली आहे. आता या चित्रपटामध्ये नक्की कोणकोणते कलाकार असणार आणि कशा प्रकारे या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात येणार या सर्वांचीच उत्सुकता लागून राहिली आहे. मात्र सध्या हे सर्वच गुलदस्त्यात असून लवकरच याबाबत चाहत्यांना कळेल अशी आशा आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३० व्या जयंतीनिमित्त कलाकारांची मानवंदना
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade