हिंदी चित्रपटसृष्टीत आजकाल ब्रेकअप झाल्याच्या बातम्या सतत येत आहेत. नुकतेच अभिनेता सोहेल खान आणि त्याच्या पत्नीच्या घटस्फोटाची बातमी आली होती. त्यानंतर आता आणखी एक नातं तुटण्याच्या मार्गावर आहे.अलीकडेच कळलेल्या माहितीनुसार बॉलिवूड अभिनेता इम्रान खान आणि त्याची पत्नी अवंतिका मलिक यांनी आपलं नातं संपवण्याचा निर्णय घेतला आहे.हा बॉलीवूड कलाकार गेल्या अनेक वर्षांपासून हिंदी फिल्म इंडस्ट्रीपासून दूर आहे. तो शेवटचा 2015 मध्ये आलेल्या ‘कट्टी बट्टी’ चित्रपटात दिसला होता. इम्रान त्याच्या चित्रपट आणि करियर व्यतिरिक्त त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल देखील खूप चर्चेत होता. गेल्या अनेक वर्षांपासून इम्रान आणि त्याची पत्नी अवंतिका यांच्यातील वाढती दरी सर्वांना दिसून आली होती. दरम्यान, आता त्यांच्या वैवाहिक आयुष्याशी संबंधित ही मोठी बातमी समोर आली आहे.
अनेक वर्षांपासून राहत होते वेगळे
इंडस्ट्रीतील उडत्या वार्तांवर विश्वास ठेवायचा झाला तर, इम्रानने अवंतिका मलिकसोबतचे नाते अखेर कायदेशीररित्या संपवण्याचा निर्णय घेतला आहे. दोघेही बराच काळ एकमेकांपासून वेगळे राहत होते. वास्तविक, इम्रान खानचे अवंतिका मलिकसोबतचे संबंध अनेक दिवसांपासून खराब झाले होते. दोघांमधील अंतर इतके वाढले होते की गेल्या काही वर्षांपासून हे जोडपे वेगळे राहत होते. अशा परिस्थितीत आता दोघांनीही हे नाते संपवण्याचा निर्णय घेतला आहे.
इम्रान खान अनेक दिवसांपासून चित्रपट आणि इंडस्ट्रीतून गायब आहे. इंडस्ट्रीत काम न मिळाल्याने त्यांना आर्थिक चणचण भासत होती. अशा परिस्थितीत आर्थिक अडचणींमुळे इम्रान आणि अवंतिका यांच्यात वाद निर्माण झाले, त्याचा परिणाम त्यांच्या मुलीवर होऊ लागला. दोघांच्या घरच्यांनी हे नाते वाचवण्याचा प्रयत्न केला, पण काही तोडगा निघाला नाही. गेल्या काही वर्षांपासून मात्र अवंतिका आपल्या मुलीसोबत तिच्या वडिलांच्या घरी राहत आहे.
2011 मध्ये झाले होते लग्न
इम्रान खान व अवंतिका मलिक यांचे नाते काही चट मंगनी पट ब्याह असे जुळलेले नव्हते. दोघेही एकमेकांना बरीच वर्षे ओळखत होते. त्यांचे एकमेकांशी भरपूर वर्षे अफेअर होते. एकमेकांशी इतकी वर्षे ओळख व प्रेमसंबंध असल्याने अवंतिका व इम्रानने 2011 मध्ये लग्न केले होते. यानंतर, 2014 मध्ये त्यांना एक कन्यारत्न प्राप्त झाले.. मात्र, मुलीच्या जन्मानंतर दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. नंतर त्यांच्या नात्यातील कटुता एवढी वाढली की 2019 मध्ये अवंतिका इमरानपासून विभक्त होऊन तिच्या आई-वडिलांच्या घरी राहायला गेली.
अवंतिकाने नात्याला दिली होती एक संधी
इम्रान खान हा आमिर खानचा पुतण्या आहे. अनेक दिवसांपासून इम्रान आणि अवंतिका यांच्यात मतभेद असल्याच्या बातम्या येत होत्या. दोघांच्या भांडणाच्या बातम्याही मीडियात आल्या होत्या. असे सांगितले जात आहे की अवंतिकाला इम्रान आणि तिच्या नात्याला पुन्हा एकदा संधी द्यायची होती. त्यामुळेच त्यांनी घटस्फोटाचा निर्णय लवकर घेतला नाही. यासोबतच दोघांच्या मित्रपरिवार आणि नातेवाईकांनीही दोघांची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न केला पण दुर्दैवाने हे नाते पुन्हा सांधले जाऊ शकले नाही. सर्व प्रयत्नांनंतरही इम्रान आणि अवंतिका यांच्यात समझोता झाला नाही. अशा परिस्थितीत आता दोघांनीही वेगळे होणे योग्य मानले आहे. मात्र, सध्या कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाचा अर्ज दाखल झालेला नाही.
इम्रानच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे तर, त्याने 2008 मध्ये आलेल्या ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटातून अभिनेता म्हणून करिअरची सुरुवात केली. यानंतरही तो अनेक उत्तमोत्तम चित्रपटांचा भाग बनला, पण त्याला फारसे यश मिळू शकले नाही. चाहत्यांना इम्रान व अवंतिकाची जोडी आवडत असे. आता मात्र त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला असल्याने पुन्हा एक नाते तुटल्याची चुटपुट चाहत्यांच्या मनाला लागून राहिली आहे.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक
Read More From बॉलीवूड
फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यावरील बायोपिक ‘सॅम बहादूर’च्या चित्रीकरणास सुरुवात
Vaidehi Raje