बॉलीवूड

केआरकेवर लागला विनयभंगाचा आरोप, मॉडेलने केली तक्रार

Leenal GawadeLeenal Gawade  |  Jul 28, 2021
केआरके विरोधात तक्रार

कायम चर्चेत असणारा अभिनेता, दिग्दर्शक केआरके म्हणेच कमाल आर खान आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. रोज तो त्याच्या टिकांमुळे चर्चेत असतो. पण आता त्याच्यावरच गंभीर आरोप लागले आहेत. एका मॉडेलने केआरकेवर बलात्काराचा आरोप केला आहे. त्यामुळे आता तो अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. सलमान खानशी पंगा घेणे, कलाकारांची भविष्यवाणी सांगणे अशी कामे करुन कायम स्वत:वर काही गोष्टी ओढून घेणाऱ्या केआरकेच अडचणीत सापडल्यामुळे आता तो काय करेल हे पाहणे आता गरजेचे आहे. दरम्यान नेमकं झालं काय ते जाणून घेऊया

नोरा फतेही आहे धकधक गर्लची फॅन, करायचं आहे माधुरीच्या बायोपिकमध्ये काम

केआरके विरोधात तक्रार 

https://www.instagram.com/p/CR2xTLzgZry/

केआरकेच्या विरोधात अंधेरीतील वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये एका ताशा नावाच्या फिटनेस मॉडेलने आपली तक्रार नोंदवली आहे. तिने कमाल आर खानने तिच्यावर अतिप्रसंग केल्याचे म्हटले आहे. त्याच्या विरोधात बलात्काराची तक्रार केली आहे. कमाल आर खान आणि आरोप लावणारी ताशा या दोघांची कोणतीही प्रतिक्रिया संदर्भात आलेली नाही. कमाल आर खानकडूनही या संदर्भात कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही. त्यामुळे या प्रकरणात कमाल आर खान खरंच दोषी आहे की, नाही हे देखील स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, हे प्रकरण त्याला सलमान खानवर काही गंभीर केल्यामुळे झाले आहेत असे देखील बोलले जात आहे. 

कमाल आर खान आणि टीका

बॉलिवूडवर निशाणा साधायची एकही संधी केआरके कधीही सोडत नाही. तो कायम सगळ्या बड्या स्टारवर निशाणा साधत असतो. त्याच्या ट्विटरवरुन तो कायम काही ना काही सल्ले देत असतो. हल्ली त्याने भविष्यवाणी करण्याचा एक नवा ट्रेंड सुरु केला आहे. ज्यामध्ये तो बॉलिवूडवाल्यांचे भविष्य सांगतो. यामध्ये त्याने करिना कपूरच्या मुलांचे बॉलिवूड करिअर हे केवळ त्यांच्या नावांमुळे चालणार नाही. तब्बू कधीही लग्न करणार नाही. आलिया-रणबीर यांचे लग्न अवघ्या चार वर्षात तुटेल. रणबीर आलियाला सोडून देईल. अशी काही तरी तिरसट भविष्यवाणी त्याने केली होती. ज्याचा राग सगळ्यांनाच आला होता. तो त्यावेळी बराच ट्रोलसुद्धा झाला होता.

ओम जिंकला चँलेज,पण मालिकेमध्ये या कारणामुळे आला ट्विस्ट

चित्रपटांवर टीका 

आता केआरकेला नावचं टीकाबाबा पडल्यामुळे एखाद्याच्या खासगी आयुष्यासोबतच तो चित्रपटांबद्दलही आपली मतं मांडत असतो. कोणता चित्रपट काय कमाईल करेल या विषयी तो सतत काहीना काही बरळत असतो. त्यामुळेच त्याच्यावर टीका होतात. भोजपुरी चित्रपटात काम करणाऱ्या केआरकेचा एकही चित्रपट कोणाला आवडेल असा नाही. पण तरीदेखील आपल्या चित्रपटांची वाहवा करुन तो थकत नाही. त्याला सतत चर्चेत राहायला आवडते. आता या नव्या तक्रारीमुळे तो चांगलाच अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. 

केआरके आणि बिगबॉस 

रिअॅलिटी शो बिगबॉसमध्ये केआरके येऊन गेला आहे. त्याने त्यावेळीही बराच गोंधळ घातला होता. त्याच्या त्या गोष्टी तेव्हाही अनेकांना हास्यास्पद वाटत होत्या आणि आता त्याच्या या वागण्यामुळे चीड आणि हास्य अशा दोन प्रतिक्रिया त्याला कायम उमटतात. 

आता राहिला प्रश्न तक्रारीचा तर त्याच्या अडचणी वाढणार यात काही शंका नाही.

शेरशाहसाठी कियारा अडवाणीने नेसलेल्या साडीची किंमत ऐकून व्हाल थक्क

Read More From बॉलीवूड