आजवर विविध प्रकारच्या भूमिकांनी प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या प्रविण तरडेंचा (Pravin Tarade) आगळा वेगळा करारी बाणा प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे आगामी ‘पांडू’ (Pandu) या चित्रपटांमधून. एका शिवप्रेमी, भारदस्त राजकीय व्यक्तीचं पात्र ते या चित्रपटात साकारत आहेत. या चित्रपटातील ‘जाणता राजा’(Janta Raja) हे छत्रपती शिवाजी महाराजांची (Chatrapati Shivaji Maharaj) महती सांगणारं गाणं प्रदर्शित झालंय. या गाण्यामधून प्रविण तरडेंचा हा वेगळा लुक प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. एक वेगळं गाण प्रेक्षकांसमोर हा चित्रपट घेऊन आला आहे. प्रवीण तरडे नेहमीच वेगवेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येत असतात. आता पुन्हा एकदा प्रवीण तरडेचा वेगळा लुक दिसून येत आहे.
अधिक वाचा – मराठ्यांची सर्वश्रेष्ठ साम्राज्ञी देणार इतिहासातील बलाढ्य शत्रूला टक्कर
टीझर झाला प्रदर्शित
झी स्टुडिओजची निर्मिती असलेल्या आणि विजू माने यांचे दिग्दर्शन असलेल्या ‘पांडू’ चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला. या टिझरला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. भाऊ कदम आणि कुशल बद्रिके यांच्यासोबत या चित्रपटात कोणते कलाकार असतील याबद्दलची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली होती. प्रेक्षकांची ही उत्सुकता आणि उत्कंठा आता आणखीनच वाढणार आहे कारण यात अभिनेता प्रविण तरडे एका आगळ्या वेगळ्या भूमिकेत दिसणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आदर आणि प्रेम असणाऱ्या एका करारी बाण्याच्या राजकीय नेत्याची भूमिका ते यात साकारत आहेत. याशिवाय सुप्रसिद्ध लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळीही (Prajakta Mali) यात एका विशेष भूमिकेत दिसणार आहे. प्राजक्ताचादेखील खूपच फॅन फॉलोईंग आहे. त्याशिवाय प्राजक्ताची नक्की या चित्रपटात काय भूमिका असेल याबाबत आता तिचे चाहते उत्सुक झाले आहेत. प्राजक्ताला आतापर्यंत वेगवेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांनी पाहिले आहे. त्यामुळे या चित्रपटात तिची नक्की भूमिका काय हेदेखील आता प्रेक्षकांना जाणून घ्यायचे आहे.
अधिक वाचा – रोहीत शेट्टी लागला ‘सिंघम 3’ च्या तयारीला, सूर्यवंशीमध्ये दिली होती हिंट
प्रवीण तरडेचा खास लुक
‘पांडू’ चित्रपटातील या भूमिकेसाठी प्रविण तरडेंचा एक खास लुक तयार करण्यात आलाय. याबद्दल प्रविण तरडे म्हणतात की,“या भूमिकेबद्दल मी कमालीचा उत्सुक आहे. हा लुक प्रेक्षकांसमोर कधी येतो याची मी स्वतः गेल्या अनेक दिवसांपासून वाट बघत होतो. आज झी स्टुडिओजने माझ्या वाढदिवशी हे गाणं आणि माझा हा लुक प्रेक्षकांसमोर आणायचं ठरवलं याहून आनंदाची दुसरी गोष्ट नाही. हे गाणं, हा लुक प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी मला आशा आहे.” महाराष्ट्राचं आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची महती सांगणाऱ्या ‘जाणता राजा’ या गाण्याचे गीतकार आहेत समीर सामंत तर ते संगीतबद्ध केलंय महाराष्ट्राचा लोकप्रिय संगीतकार अवधूत गुप्ते यांनी. आजवर आपल्या धारदार आवाजाने रसिकांची मने जिंकणाऱ्या आदर्श शिंदेने हे गाणं त्याच जोशात आणि ढंगात गायलं आहे. मराठी चित्रपटांची विनोदी परंपरा जपण्यासाठी आणि प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी झी स्टुडिओजचा ‘पांडू’ हा चित्रपट येत्या 3 डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. तर कोरोनानंतर आता अनेक मराठी चित्रपट प्रदर्शित होत असल्याने मराठी प्रेक्षकही तितकाच आनंदी आहे. याशिवाय या चित्रपटात मराठमोळ्या प्रेक्षकांच्या आराध्यदैवत छत्रपती शिवरायांचं गाणं असल्याने तर अधिक उत्सुकता लागून राहिली आहे हे मात्र नक्की!
अधिक वाचा – Bigg Boss Marathi:पुन्हा दिसून आली विकास-विशालची मैत्री, केला हा त्याग
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade