उत्तम कथानक, दमदार स्टारकास्ट असलेल्या गुडबॉय या नव्या वेब सिरीजला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. ‘हंगामा प्ले’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या या वेब सिरिजबद्दल अतिशय धमाल, फुल ऑन एंटरटेनिंग अशा शब्दांत प्रेक्षकांनी गुडबॉयचं कौतुक केलं आहे. वेब सिरीजची निर्मिती कॅफेमराठीच्या निखिल रायबोले आणि भुपेंद्रकुमार नंदन यांनी केली आहे. या वेबसिरीजमध्ये ऋषी सक्सेना, खुशबू तावडे, विनय येडेकर, रीना अगरवाल, दुष्यंत वाघ, योगेश सोहोनी,अभ्यंग कुवळेकर आदींच्या प्रमुख भूमिका आहेत. बद्रिश पाटील यांनी या सिरीजचं दिग्दर्शन केलं आहे. सौरभ मास्तोळी यांनी संगीत दिग्दर्शन, अक्षय राणे यांनी छायांकनाची जबाबदारी निभावली आहे.
Bigg Boss 14 फेम राहुल वैद्यला मिळाला मोठा ब्रेक, सलमान खानसाठी गाणार गाणे
ऋषी, रिना आणि खुशबूचा धमाल अभिनय
कॉलेजपासून सतत मुलींच्या मागे असलेल्या तरुणाला खऱ्या प्रेमाचा शोध आहे. मात्र त्याच्याविषयी मुलींमध्ये त्याच्याबद्दल एक वेगळाच समज निर्माण होतो आणि तो अडचणीत येतो. हा समज नेमका काय आहे? आणि यातून त्याच्या अडचणी कशा वाढत जातात आणि या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी तो काय करतो, त्यातून तो यशस्वी होतो का, त्याला खरं प्रेम मिळतं का अशा प्रश्नांची उत्तरं वेब सिरीज पाहिल्यावरच मिळतील. धमाल कथानक, उत्तम अभिनय आणि प्रत्येक एपिसोडला निर्माण होणारी उत्सुकता ही या सीरिजची वैशिष्ट्यं आहेत. त्यामुळेच ही सिरीज प्रेक्षकांच्या पसंतीला उतरली आहे. गुडबॉय ही वेबसिरीज ‘हंगामा’च्या हंगामा प्ले’ या व्हिडिओ ऑन डिमांड प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. तसंच एमएक्स प्लेयर, एअरटेल एक्स्ट्रीम अॅप, व्ही मूव्हीज अँड टीव्ही, अमेझॉन फायर टीव्ही, टाटा स्काय बिंज, डिशस्मार्ट स्टीक, डी2एच स्ट्रीम, डिशस्मार्ट हब, शिवाय मेघबेला ब्रॉडबॅंड, अलियान्स ब्रॉडबँड, एसीटी फायबरनेट आणि नेटप्लस यांच्यासारखे आयएसपी तसेच टीसीएल, वनप्लस टीव्ही, सोनी ब्राविया, सीव्हीटीई, तोशिबा आणि क्लाऊडवॉकर अशा स्मार्ट टीव्हींवर हंगामा प्ले’च्या माध्यमातून उपलब्ध आहे. त्याशिवाय, हंगामाच्या शाओमी समवेतच्या भागीदारीने ग्राहक हंगामा प्लेद्वारे ‘मी टीव्ही’वर ही सिरीज पाहू शकतील.
बॉलीवूड अभिनेत्री ज्या सौंदर्य खुलवण्यासाठी करतात आयुर्वेदिक उपचार
ऋषीचा निरागसपणा भावतोय
ऋषी सक्सेनाने एका मराठी मालिकेतून पदार्पण केले. ऋषीचा निरागसपणा नेहमीच त्याच्या चाहत्यांना भावला आहे. ऋषीने कपड्यांच्या ब्रँडसाठीही मॉडेलिंग केले आहे. आता वेबमध्येही ऋषीच्या अभिनयाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. तर रिना अगरवाल आणि खुशबू तावडे या मराठीतील नावाजलेल्या अभिनेत्री आहेत. खुशबूने याआधी मराठी मालिका केल्या असून रिनाने मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. हे तिन्ही कलाकार नेहमी आपल्या सोशल मीडियावरही अॅक्टिव्ह असतात. त्यामुळे त्यांच्या चाहत्यावर्गासाठी ही वेबसिरीज म्हणजे एक पर्वणीच आहे. प्रत्येक भागामध्ये एक उत्सुकता ताणून धरण्यात दिग्दर्शक यशस्वी झाला असून प्रेक्षकांच्या पसंतीला ही वेब उतरत आहे असे म्हणावे लागेल. तर ऋषी आता मराठी इंडस्ट्रीमध्येही चांगलाच रूळल्याचे दिसून येत आहे. त्याचे मराठी उत्तम नसले तरीही त्याला मराठीची जाण आहे हे त्याच्या अभिनयातून आणि त्याच्या संवादफेकीवरून दिसून येत आहे. त्यामुळे ‘गुडबॉय’ ऋषीने आपली इमेज या वेबमधूनही राखण्यात यश मिळवलं आहे असं म्हणायला हरकत नाही.
अग्गंबाई सूनबाईमधील सोहम- शुभ्राचे बदलते रुप पाहून चक्रावले प्रेक्षक
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade