मनोरंजन

#tinypanda – सिद्धार्थ – मितालीच्या लग्नाची धूम, खास क्षण

Dipali Naphade  |  Jan 24, 2021
#tinypanda - सिद्धार्थ - मितालीच्या लग्नाची धूम, खास क्षण

गेल्या काही दिवसांपासून अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर यांच्या लग्नाची जोरदार चर्चा आणि तयारी सुरू होती. दोघेही लग्नबंधनात अडकले असून पुण्याच्या ढेपे वाड्यामध्ये दोघांचा विवाह सोहळा संपन्न झाला आहे. दोघांच्या लग्नाला त्यांच्या मित्रमैत्रिणींनी उपस्थिती लावली होती. तर सिद्धार्थ आणि मिताली यांच्या विवाहापूर्वीच्या विधींंचेही फोटो व्हायरल झाले होते. सिद्धार्थ आणि मितालीच्या लग्नसोहळ्याचे काही खास क्षण ‘POPxo मराठीच्या’ वाचकांसाठी. सिद्धार्थ आणि मितालीचे हे खास क्षण कॅप्चर केले आहेत, गाथा कंपनीने. प्रत्येक खास क्षण आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करत सिद्धार्थ आणि मितालीचा हा खास दिवस अप्रतिम बनवला आहे. 

आलियाच नाही स्ट्रेसमुळे बॉलीवूडच्या ‘या’ अभिनेत्रींचीही सेटवर बिघडली होती तब्येत

मराठमोळा पुणेरी लुक

सिद्धार्थ आणि मिताली या दोघांनाही लग्नामध्ये पुणेरी मराठमोळा लुक करून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. अगदी पक्का पुणेरी लुक करून सिद्धार्थ आणि मितालीने चाहत्यांचीही मनं जिंकून घेतली. मिताली हिरव्या नऊवारीमध्ये अगदी सुंदर नववधू दिसत होती. तर सिद्धार्थही जांभळ्या रंगाच्या शेरवानीमध्ये अगदी नजर लागेल इतका सुंदर दिसत आहे. दोघांचीही जोडी अप्रतिम दिसत असून लग्नाच्या वेळीदेखील मितालीने पिवळी नऊवारी नेसली होती. तर सिद्धार्थनेही अप्रतिम ऑफव्हाईट रंगाची शेरवानी घातली होती. दोघांच्याही लग्नाचे विधी गेले चार दिवस धुमधडाक्यात चालू होते. 

दगडूची प्राजू झाली बोल्ड, केतकी माटेगावकरचा बोल्ड लुक व्हायरल

गेल्यावर्षी झाला साखरपुडा

सिद्धार्थ आणि मितालीने गेल्यावर्षी साखरपुडा केला होता. दोघेही एकमेकांना बरीच वर्ष ओळखत आहेत. दोघांच्याही चाहत्यांना ही जोडी कधी लग्नबंधनात अडकणार याची आतुरता होती. सिद्धार्थ आणि मितालीने फोटो पोस्ट केल्यानंतर तर सोशल मीडियावर त्यांच्या मित्रमैत्रिणींकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.  तर सिद्धार्थचे जवळचे  मित्रमैत्रिणी पूजा सावंत, उमेश कामत, सई ताम्हणकर हे सर्व त्यांच्या लग्नाला उपस्थित होते. पुण्याच्या ढेपे वाड्यामध्ये या विवाहसोहळा संपन्न झाला असून गेले चार दिवस या दोघांचेही लग्नापूर्वीचे विधी इथेच संपन्न झाले. दोघांनीही आपल्या सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांसाठी फोटो पोस्ट केले असून सिद्धार्थने फोटो पोस्ट करताना मितालीला ‘Mine’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये भांगेमध्ये सिंदूर लावण्याचा फोटोही  कॅप्चर करण्यात आला असून यासाठी सिद्धार्थने एक चुटकी सिंदूर म्हणत अत्यंत आनंदी फोटो पोस्ट  केला आहे. सिद्धार्थ आणि मिताली दोघेही सध्या वेगवेगळ्या मालिकांमध्ये काम करत असून दोघेही आपापल्या कामामध्ये व्यग्र आहेत. त्यामुळे आता या दोघांची पुढची योजना काय आहे याची उत्सुकताही चाहत्यांना लागली आहे. मात्र आता दोघेही कुठे फिरायला जाणार की पुन्हा आपापल्या  चित्रीकरणाकडे परतणार हेदेखील पाहावे लागेल. 

दोघेही अत्यंत आनंदी दिसत असून सिद्धार्थ आणि मितालीला त्यांच्या भावी आयुष्याच्या वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा!

सैफ अली खानची ‘तांडव’ वादाच्या भोवऱ्यात

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From मनोरंजन