मनोरंजन

दिलबरो म्हणत मुलीची केली पाठवणी, सुनील बर्वेचा व्हिडिओ व्हायरल

Dipali Naphade  |  Jul 8, 2021
दिलबरो म्हणत मुलीची केली पाठवणी, सुनील बर्वेचा व्हिडिओ व्हायरल

कोणत्याही बापासाठी आपल्या मुलीची लग्नात पाठवणी करणं हे खूपच कठीण काम आहे. जन्मापासून वाढवलेल्या मुलीला एका दिवसात असं दुसऱ्या घरी पाठवताना प्रत्येक वडिलांच्या काळजाला घरं पडत असतात. आपल्या मुलीचा संसार सुखाने व्हावा ही इच्छा. तिला हवा तसा जोडीदार मिळाला याचा आनंद आणि एका बाजूला आता ती आपल्या घरी नसणार याचं दुःख यामधील भावना या केवळ त्या मुलीला आणि वडिलांनाच समजू शकतात. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय तो अभिनेता सुनील बर्वे (Sunil Barve) आणि त्याची मुलगी सानिका बर्वे (Sanika Barve) हिचा. ‘दिलबरो’ या गाण्यावर दोघेही सानिकाच्या लग्नात डान्स करत असतानाचा हा व्हिडिओ आहे. यामध्ये सुनील बर्वे अत्यंत भावूक झाला असून इतर जमलेले कलाकारही भावूक झालेले दिसून येत आहे. 

मीरा आणि आदिराज यांच्या प्रेमकहाणीबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता, ‘अजूनही बरसात आहे’

सुनील बर्वेने केली मुलीसाठी खास पोस्ट

सुनील बर्वे नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. मात्र आपल्या कुटुंबाच्या बाबतीत फारच हळवे असणारे सुनील बर्वे पुन्हा एकदा हळवे झालेले दिसून आले आहेत आणि त्याचं कारणही तसंच आहे. आपल्या काळजाचा तुकडा अर्थात सुनील बर्वेची मुलगी सानिका बर्वेचे नुकतेच लग्न पार पडले. तिच्या लग्नाच्या आधी संगीत कार्यक्रमातील एक व्हिडिओ सुनील बर्वे यांनी शेअर केला आहे. या व्हिडिओने सर्वच भावूक होताना दिसून आले आहेत. कोणत्याही मुलीची पाठवणी करणं याइतकं जड आयुष्यात वडिलांसाठी काहीच नसतं. दिलबरो या गाण्यावर बाप – लेकीचा हा भावूक क्षण सुनील बर्वे यांनी शेअर करत अगदी सर्वांच्या काळजाला हात घातला आहे असं म्हणावं लागेल. या व्हिडिओमध्ये त्याचे मित्र पुष्कर श्रोत्री, सुमित राघवनदेखील तितकेच भावूक झालेले पाहायला मिळालं. तर दिग्दर्शक केदार शिंदेने आपल्यावरही ही वेळ लवकरच येणार असल्याचीही भावना बोलून दाखवली आहे. ‘कधी काळी मी मला या भूमिकेत पहातोय… कठीण आहे’ अशी भावना केदार शिंदेने व्यक्त केली. तर पुष्कर श्रोतीलाही मुलगी असल्याने त्याच्याही डोळ्यात यावेळी पाणी पाहायला मिळालं. 

अर्जुन कपूर आणि तारा सुतारियाच्या ‘एक व्हिलेन रिटर्न्स’चं शूटिंग सुरू

उपस्थितांच्याही डोळ्यात पाणी

मुलीच्या लग्नातील हा परफॉर्मन्स असला तरीही या स्टार वडील आणि मुलीच्या जोडीने सर्व उपस्थितांच्याही डोळ्यात पाणी आणले आहे. या लग्नसोहळ्याला मराठी इंडस्ट्रीतील अनेक स्टार्स उपस्थित होते. अनेकांना या परफॉर्मन्सने गहिवरून आलेले या व्हिडिओतून दिसून येत आहे. सानिकाच्या आठवणीत सुनील बर्वे यांनी हळवे होत हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. प्रत्येक वडिलांची मुलीला दुसऱ्या घरात देताना काय वाटत असेल हे यातून स्पष्ट दिसून येत आहे. सुनील बर्वे यांचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. सुनील बर्वे सध्या टीव्हीवरदेखील प्रेक्षकांचं मनोरंजन करत असून ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहेत. आजही सुनील बर्वे हे अनेक तरूणींच्या गळ्यातील ताईत आहेत. त्यांच्या अभिनयाने गेले अनेक वर्ष त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. आता पहिल्यांदाच अशा हळव्या आणि खऱ्या आयुष्यातील बापाच्या भूमिकेतील सुनील बर्वेला पाहून सर्वांनाच भावूक व्हायला झालं आहे हे नक्की. त्याच्या या व्हिडिओला अनेक लाईक्स आणि कमेंट्सही मिळत आहेत. 

खऱ्या आईबद्दल विचारणाऱ्यांना सुश्मिता सेनच्या मुलीने दिलं असं उत्तर

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From मनोरंजन