छोट्या पडद्यावरील ‘का रे दुरावा’ आणि ‘बापमाणूस’ यांसारख्या भूमिकांमुळे घराघरात पोचलेलं नाव म्हणजे अभिनेता सुयश टिळक. आपल्या दमदार अभिनयाची चमक पुन्हा एकदा नव्या भूमिकेतून दाखवायला सज्ज आहे.
सुयश दिसणार सुरेशच्या भूमिकेत
‘छोटी मालकीण’ या मालिकेत लवकरच सुयश झळकणार आहे. या मालिकेत सुयश टिळक ‘सुरेश’ नावाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. या मालिकेच्या कथानकाला सुयशच्या पात्रामुळे अनोखे वळण मिळणार असून सुयशचं हे पात्र प्रमुख भूमिकेत नसलं तरी महत्त्वाचं आहे. या मालिकेमुळे सुयशला पहिल्यांदाच डॉ.गिरीश ओक यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्यांबरोबर काम करायची संधी मिळणार आहे. तसंच करिअरच्या सुरूवातीला ‘बंध रेशमाचे’ या मालिकेत अक्षय कोठारीबरोबर काम केल्यावर हे दोघंही मित्र पुन्हा एकदा छोटी मालकीणच्या निमित्ताने स्क्रीन शेअर करताना दिसतील.
सुयशची यशस्वी घौडदोड
रंगभूमी, मराठी सिनेमापासून सुरू झालेला अभिनयाचा प्रवास आता टीव्ही मालिकांमध्ये चांगलाच स्थिरावलाय. क्लासमेट, कॉफी आणि बरंच काही आणि तिचा उंबरठा या सिनेमातून अभिनय केल्यानंतर अभिनेता सुयश टिळकने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. मुख्य म्हणजे त्याच्या सर्व भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या आहेत. कोणत्याही साचेबद्ध भूमिका करण्यापेक्षा सुयश नेहमीच वेगळ्या भूमिकांना निवडताना दिसतो. मग तो ‘का रे दुरावा’ मधील ‘जयराम’ असो वा ‘बापमाणूस’ मधला ‘सूर्या’. सुयशचे काम नेहमीच लोकांच्या पसंतीस पडले आहे. त्यामुळे आता त्याचे ‘सुरेश’ हे नवं पात्रदेखील लोकांना नक्कीच आवडेल, याची खात्री आहे.
अभिनय आणि फोटोग्राफी
अभिनयाच्याबरोबरीने पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजचा विद्यार्थी असलेल्या सुयश टिळकला वाईल्ड फोटोग्राफीचीही आवड आहे. सुयशच्या इंन्स्टाग्राम अकाउंटवर नेहमीच त्याने काढलेले सुंदर फोटोज तो शेअर करत असतो.
या आवडीमुळे त्याने बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (BNHS) मधून खास कोर्स ही केला आहे.
त्यामुळे एकीकडे अभिनयातील करिअर सांभाळत तो आपली ही आवडसुद्धा जपत असतो.
फोटो सौजन्य : Instagram
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade