मनोरंजन

सुयश टिळकला नेमकं झालंय तरी काय…पोस्टमुळे चाहते बुचकळ्यात

Dipali Naphade  |  Feb 16, 2021
सुयश टिळकला नेमकं झालंय तरी काय...पोस्टमुळे चाहते बुचकळ्यात

सुयश टिळक हे नाव काही मराठी प्रेक्षकांना आता नवे नाही. सध्या शंतनूच्या भूमिकेत सुयश सर्वांचं मन जिंकून घेत आहे. सुयशने आतापर्यंत मालिका, चित्रपटांमध्ये काम करत आपल्या अभिनयाने अनेकांना जिंकून घेतलं आहे. सुयश टिळक (Suyash Tilak) सोशल मीडियावरही नेहमी अॅक्टिव्ह असतो. पण गेल्या काही दिवसांपासून सुयशचं काहीतरी बिनसलं असल्यांचे त्याच्या चाहत्यांना वाटत आहे. सुयशच्या वेगवेगळ्या पोस्टमुळे चाहतेही आता बुचकळ्यात पडले आहेत आणि नक्की सुयशला झाले तरी काय आहे अशी चर्चा सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वीच सुयशला सोशल मीडियाला राम राम ठोकला होता. मात्र आता पुन्हा एकदा सुयशने भली मोठी पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे पुन्हा सुयश चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वीच आपण सोशल मीडियापासून दूर जात असल्याचे सांगत सुयशने निरोप घेतला होता. आता पुन्हा अचानक केलेल्या त्याच्या या पोस्टमुळे त्याच्या झालेल्या ब्रेकअपमुळेच त्याला त्रास होत आहे की काय असा कयास बांधला जात आहे.

या मराठी अभिनेत्यांनी साकारली शिवाजी महाराजांची भूमिका, प्रेक्षकांच्या मनावर सोडली छाप

प्रेम करावं निःस्वार्थी, सुशयची पोस्ट

एखाद्यावर प्रेम केलं तर ते निःस्वार्थी असावं, आपल्या जोडीदाराच्या कठीण काळात त्याच्या पाठिशी खंबीरपणे उभं राहायला हवं अशा आशयाची मोठी पोस्ट सुयशने केली आहे. त्या प्रत्येक व्यक्तीसाठी ज्याला मनापासून आपली चूक सुधारायची आहे आणि मनापासून कोणासाठी तरी काही तरी करायचं आहे त्याच्यासाठी वेळ गेलेली नाही. कोणीही एकटे नाही. तुम्हाला जर संधी मिळाली नसेल तर ती नक्की आहे….त्या प्रत्येकासाठी ही पोस्ट आहे असं सुयशने  त्याच्या या पोस्टमध्ये म्हटलं आहे. ‘तुम्ही जर खरंच प्रयत्न केला असेल तर आता दीर्घ श्वास घ्या आणि ठीक आहे असं स्वतःला समजवा. तुम्ही स्वतःवरच राग करू लागला असाल किंवा तुम्हाला सतत प्रश्न पडत असतील की असं का तर ठीक आहे. होतं असं …तुम्हाला एकटं वाटत असेल तर तुम्ही नक्कीच एकटे नाही आहात. तुमची स्वप्नं, भविष्यकाळात जोडीदाराबरोबर रंगवलेल्या गोष्टी, करिअर या सगळ्याचा जरी भंग झाला असेल तरीही फिनिक्स पक्षाप्रमाणे व्हायचा प्रयत्न करा. दीर्घ श्वास घ्या आणि जे काही आहे ते ठीक आहे असं ठरवा आणि पुढे  चला. तुम्ही एकटे नाहीत. निःस्वार्थी  केलेले प्रेम तुम्हाला नक्कीच त्रास देईल.  जे तुमच्यासाठी जग होते त्यांच्यासाठी तुम्ही कोणीही नाही हे माहीत असताना ते आनंदी आहेत हे लक्षात येईल तेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी आनंदी व्हा. एखाद्याने तुमचा अपमान केला, तुम्हाला समजण्यात चूक केली, करू देत. त्यांना राग करण्याचा हक्क आहे. कारण तुम्ही जर खरं प्रेम केलं असेल तर त्यांचा आनंद तुमच्यासाठी महत्वाचा ठरतो.’ 

सुयशने अत्यंत भावनात्मक पोस्ट केली आहे. पुढे सुयशने म्हटले की, ‘एखाद्यावर तुम्ही खरंच प्रेम करत असाल तर तुम्ही त्यांना मुद्दाम दुखवू शकत नाही. तुम्ही त्या व्यक्तीला तेव्हा एकटं नाही सोडू शकत जेव्हा तुम्हाला माहीत आहे की, तुम्हीच त्याच्यासाठी सर्व काही आहात. आधीच त्रासात असलेल्या व्यक्तीला तुम्ही पुन्हा एकदा त्या अंधारात नाही ढकलू शकत. तुम्ही बोलणं गरजेचं आहे. तुम्ही एकटे नाहीत. अशा प्रेम करणाऱ्या व्यक्तीने चुका केल्या तर त्याला सांगा मी होते, आहे आणि कायम तुझी राहीन. हेच कायमस्वरूपी प्रेम आहे. पण सतत तुम्हाला कोणी दुखावत असेल तर असू दे…तुम्ही एकटे नाहीत. ज्यांना तुमच्यासाठी आनंद वाटत नाही अशांना माफ करा. कारण त्यांचीही काही कारणं असतील. तुमचे अपयश त्यांच्यासाठी आनंदाचे असेल. त्यांना हास्य द्या. त्यांनाही प्रेमाने पाहा. रोज उठल्यावर कालच्यापेक्षा आज जास्त दयाळूपणा दाखवा.  कालच्यापेक्षा आज आपण अधिक चांगले असू याची खात्री करून घ्या. त्यांना तुमच्यातला बदल दिसला नसेल तरीही तुमचे प्रेम खरे आहे हे विसरू नका. प्रेम करा. नव्याने  जन्म घ्या’

पाकिस्तानी पावरी व्हिडिओपेक्षा स्मृती इराणींना आवडला शहनाजचा टॉमी

ब्रेकअपची चर्चा

सुयश टिळक आणि तुझ्यात जीव रंगला फेम अक्षया देवधर यांचे एकमेकांवर प्रेम होते आणि त्यांचे ब्रेकअप झाले असं म्हटलं जात आहे. यासंदर्भात दोघांनीही कधीही वाच्यता केलेली नाही. मात्र एकमेकांसह फोटो बऱ्याचदा पोस्ट केले होते. मात्र आता ब्रेकअपमुळेच सुयशने ही पोस्ट केली असावी असा अंदाज बांधला जात आहे. दोघांनीही एकमेकांना अनफॉलो केले असल्याचंही म्हटलं जात आहे. पण सुयशने लवकरच यातून बाहेर पडत पुन्हा एकदा आनंदी राहावं असंच त्याच्या चाहत्यांना वाटत आहे आणि त्यामुळेच त्याला या पोस्टवर अनेक कमेंट्सही मिळत आहेत. 

शिवजयंती निमित्त शिवाजी महाराजांची गाणी आणि पोवाडा Shivaji Maharaj Marathi Songs & Powada

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From मनोरंजन