अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) हे नाव केवळ मराठी चित्रपटसृष्टीच नाही तर अगदी बॉलीवूडमध्येही चांगलंच स्थिरावलं आहे. अमृता नेहमीच आपल्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत आपले फोटो पोस्ट करत असते. आताही नुकतंच अमृताने आपल्या एका फोटोशूटचे फोटो पोस्ट केले असून अमृताचे आरस्पानी सौंदर्य नक्कीच चाहत्यांना घायाळ करत आहे. अगदी अप्सरा आल्याचा फीलही काही जणांना आला आहे. अभिनय, नृत्य आणि सौंदर्याचा उत्तम मिलाफ म्हणजे अमृता असं म्हटलं तर नक्कीच अतिशयोक्ती ठरणार नाही. अमृताचे हे नवे फोटोशूट पाहून तर तिच्या चाहत्यांमध्ये नक्कीच वाढ होणार आहे. केवळ बोल्ड फोटोशूट अथवा अंगप्रदर्शन म्हणजे सौंदर्य असते असे नक्कीच नाही आणि अमृताने हे नेमहीच सिद्ध केलं आहे. अमृताच्या सोशल मीडियावर तिचे फोटो पाहिले तर अधिकाधिक फोटोमध्ये अमृता साडी अथवा भारतीय वेषातच दिसून येते. असेच पुन्हा एकदा भारतीय वेषातील पेहरावातील अमृताचे फोटो व्हायरल होत आहेत.
बॉलीवूड अभिनेत्री ज्यांनी चित्रपटात साकारल्या नॉन ग्लॅमरस भूमिका
मराठमोळ्या अमृताचा भारतीय अंदाज
अमृता पक्की मराठमोळी आहे. बऱ्याचदा ती साडीमध्येच दिसून येते. तर आता तिने केलेल्या फोटोशूटमुळे पुन्हा एकदा अभिनेत्रीही भारतीय वेशात इतक्या सुंदर आणि अप्रतिम दिसू शकतात हे दाखवून दिले आहे. अमृताने घातलेला पेहराव हा 100 टक्के भारतीय असून तिने केलेला मेकअपही अत्यंत मिनिमल आहे. त्यामुळे तिचे सौंदर्य अधिक खुलून आले आहे. कोणताही गडद मेकअप न करता अगदी साध्या पण तरीही तिच्याकडे बघतच राहावं अशा स्वरूपाच्या पेहरावामध्ये अमृताने केलेले हे फोटोशूट अप्रतिमच आहे. लाल रंगाच्या या कपड्यांमध्ये अमृता अधिक सुंदर दिसत आहे. तिने फोटो शेअर केल्यानंतर या फोटोंवर अक्षरशः लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडलेला दिसून येत आहे. संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर अमृताचे चाहते अनेक ठिकाणी आहेत. विशेषतः खतरों के खिलाडीसारख्या रियालिटी शो मध्ये सहभागी झाल्यानंतर तर अनेक स्तरावरून अमृताची वाहवा पण झाली आहे. केवळ मराठीतच नाही तर अगदी हिंदीमध्येही अमृताने आपल्या अभिनयाने चाहते निर्माण केले आहेत.
मालदिव्ज ठरतोय सेलिब्रिटीजचा ‘हॉट’स्पॉट
अभिनयाने जिंकले आहे सर्वांनाच
‘कट्यार काळजात घुसली’ मधील अभिनय असो अथव ‘नटरंग’ मधील लावणी असो आपल्या ठसकेबाज नृत्याच्या आणि अभिनयाच्या जोरावर अमृताने सर्वांचेच मन जिंकून घेतले आहे. अमृताचे फोटो पाहिल्यास अमृता फारच कमी वेळा गडद मेकअप अथवा अति बोल्ड अवतारात दिसते. अत्यंत साधी आणि सालस पण तितकीच आकर्षक असा अमृताचा अंदाज म्हणूनच प्रेक्षकांना अधिक आपलासा वाटतो आणि तिच्या चाहत्यांच्या संख्येत त्यामुळेच वाढ होत असलेली दिसून येत आहे. राझी चित्रपटातील मुनिरा असो अथवा मलंग चित्रपटातील शांत भूमिका असो दोन्ही भूमिका तितक्यात ताकदीने अमृताने पेलल्या आहेत. तसंच जॉन अब्राहम, मनोज वाजपेयी यांच्यासह त्याच ताकदीने ती ‘सत्यमेव जयते’ चित्रपटात उभी राहिली आहे. अशी ही आरस्पानी सौंदर्य लाभलेली अमृता मराठमोळ्या लोकांना अभिमान नसती तरच नवल. अमृताचे अनेक फोटो पाहताना तिच्याबद्दल केवळ सुंदर असाच शब्द तोंडातून निघतो. त्यामुळे आता पुढे नक्की अमृता कोणत्या स्वरूपाचे फोटोशूट करून आपल्या चाहत्यांना घायाळ करणार आहे याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
टाईमपास 3′ वादाच्या भोवऱ्यात, या कारणामुळे झाला वाद
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक
Read More From बॉलीवूड
फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यावरील बायोपिक ‘सॅम बहादूर’च्या चित्रीकरणास सुरुवात
Vaidehi Raje