‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजे अमृता पवार (Amruta Pawar). अदिती म्हणून तिने प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवली आहे. काहीच दिवसांपूर्वी अमृताने नील पाटीलसह लग्नगाठ बांधली. तिच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाले होते. तिने आपल्या हळदीचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले होते. अत्यंत साधे तरीही खूप आकर्षक असे हे तिचे फोटो सर्वांनाच आवडले. तर लग्नातील व्हिडिओही तिच्या चाहत्यांनी अगदी मनसोक्त आनंद घेत पाहिले. पण लग्न झाल्यावर आता अमृता अधिक भावूक झाली आहे तीदेखील खास माणसासाठी अर्थात वडील हा प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील सर्वात पहिला हिरो असतो आणि लग्नात सर्वात जास्त त्रास आपल्या बाबांपासून विरहाचा अधिक असतो हे कोणालाही सांगायला नको. अमृताने आपल्या वडिलांसाठी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट वाचल्यानंतर प्रत्येक मुलगी नक्कीच लग्नाच्या वेळचा क्षण आठवून आपल्या वडिलांची त्या क्षणाला आठवण काढल्याशिवाय राहणार नाही.
अमृताचा वडिलांसाठी खास व्हिडिओ
अमृताने आपल्या बाबांसाठी खास व्हिडिओ पोस्ट करत तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. बाबा हा प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील महत्त्वाची व्यक्ती असते. अमृताने कॅप्शनमध्ये आपले मन मोकळे केले आहे,
“मी आज अगदी खरं बोलणार आहे. लग्नासाठी मुलगा पाहताना तुम्ही मला खूप गोंधळात घातलं होतं. खरं तर तुम्हीच माझ्या नवऱ्याबद्दलच्या अपेक्षा खूप वाढवून ठेवल्या होत्या. पण आता लग्न झालं आणि मला तुमचे यासाठी मनापासून आभार मानायचे आहेत.
मी आतापर्यंत ज्या गोष्टी केल्या त्यात तुम्ही नेहमीच पाठिंबा आणि आत्मविश्वास मला दिलात. तुम्ही आणि आईने मला आधीच वचन दिले होते की, कोणतीही गोष्ट करण्यासाठी तुम्ही मला अडवणार नाही. त्यामुळेच आज मी इथपर्यंत येऊन पोहचले आहे. मला तुमच्यासारखे आई-वडील लाभले यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजते. मी खूपच कृतज्ञ आहे.
ज्यावेळी मी चुकले त्या त्या वेळी तुम्ही मला माझी चूक दाखवली आहे आणि त्यातून बाहेर पडण्याचा योग्य रस्ताही दाखवला. ताकदीने उभं केलं. जगाला काय वाटतं यापेक्षा मला जे वाटतं ते करण्याची हिंमत तुम्ही मला दिलीत. मला स्वतःवर कायम विश्वास ठेवायला शिकवलं. इतर कोण काय बोलत असेल अथवा काय करतंय याची कधीच तुम्हाला काळजी वाटली नाही. आजपर्यंत तुम्ही जे काही माझ्यासाठी केलंत त्यासाठी खूप थँक्स बाबा. मी तुमच्यावर किती प्रेम करते हे शब्दात व्यक्त करता येणे शक्य नाही”
अमृताने आपल्या भावना व्यक्त करत चाहत्यांनाही खूप भावूक केल्याचे कमेंट्सवरून दिसून येत आहे. अनेक कलाकार मित्रमैत्रिणी आणि अमृताच्या चाहत्यांनी तिला तिच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा कमेंट्सच्या माध्यमातून दिल्या आहेत. तर लवकरच तिची मालिका बंद होणार आहे. त्यामुळे चाहतेही आता अमृताच्या पुढच्या प्रोजेक्टकडे डोळा लावून बसले आहेत. या मालिकेनंतर अमृता कोणत्या प्रोजेक्टमध्ये दिसणार याबाबतही विचारणा होत आहे. पण सध्या अमृता आपल्या नव्या संसारात रमेल असाही अनेकांनी अंदाज लावला आहे.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade