अभिनेत्री इशा गुप्ता नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत असते. मात्र आता इशा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे ती तिने दिलेल्या प्रेमाच्या कबुलीमुळे. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून आपण नात्यात असल्याची कबुली इशाने दिली आहे. या पोस्टमध्ये इशाने आपला बॉयफ्रेंड कोण आहे आणि काय करतो याचीही माहिती दिली आहे. इशाचा बॉयफ्रेंड हा कोणताही अभिनेता नाही अथवा भारतीयदेखील नाही. स्पेनच्या उद्योगपती मॅन्युअल कंपोझ ग्वोल्लर (Manuel Campos Guallar) याच्यासह इशा सध्या नात्यात असल्याचं तिने जाहीर केलं आहे. इशाचे नाव बऱ्याचदा अनेक अभिनेत्यांसह जोडले गेले आहे. पण कधीही इशाने आपल्या नात्याबद्दल जाहीर वक्तव्य केले नव्हते. इशाने पहिल्यांदाच आपल्या बॉयफ्रेंडबद्दल जाहीर केले असून त्याच्याबरोबर आपला फोटोही शेअर केला आहे.
सारा रमजानच्या काळात तरी अशी वागू नको, सारा झाली ट्रोल
इशाने शेअर केला फोटो
इशाने आपल्या इन्स्टा अकाऊंटवर आपल्या बॉयफ्रेंडसह फोटो शेअर करत जे कॅप्शन लिहिले आहे त्यातून तिने आपण नात्यात असल्याचे स्पष्ट केले आहे. इशाने या फोटोला स्पॅनिश कॅप्शन दिली आहे, ‘te amo mucho mi amor’ याच अर्थ ‘मी तुझ्यावर खूप प्रेम करते, माय लव्ह’ असे इशाने म्हटले आहे. इशाने मॅन्युअलसह शेअर केलेल्या या फोटोनंतर तिला भरभरून कमेंट्स मिळाल्या आहेत. मात्र सर्वात जास्त लक्ष वेधले आहे ते मॅन्युअलने दिलेल्या उत्तरावर. त्याने त्यावर हिंदीमध्ये ‘मैं तुमसे प्यार करता हू’ असे म्हणत हार्ट इमोजी दिला आहे. तिच्यावर सध्या अभिनंदनाचा वर्षावर होत आहे. आतापर्यंत या फोटोला लाखो लाईक्स मिळाले असून सतत तिला अभिनंदाच्या कमेंट्सही मिळत आहेत. इशाने याआधीही एका मुलाखतीमध्ये स्पष्ट केले होते की, ‘माझा बॉयफ्रेंड सध्या स्पेनमध्ये असून तो आयसोलेशनमध्ये आहे आणि योग्य ती काळजी घेतो आहे. व्हायरसबद्दल तो रोज मला कळवत आहे आणि मी स्वतः या लॉकडाऊनची मानसिक तयारी केली आहे. मी त्याच्याशी रोज व्हिडिओ कॉलवर बोलते आणि त्याची काळजी घेत आहे. त्याच्या तब्बेतीविषयी जाणून घेत आहे.’ इशा माबेल ग्रीन कपमध्ये सहभागी होण्यासाठी गेली होती. पण आता ती तिथेच आहे.
सहानुभूती मिळवण्यासाठी रश्मी ‘वूमन कार्ड’ खेळत असल्याचा अरहान खानचा आरोप
इशाचा बॉयफ्रेंड आहे उद्योगपती
इशाचा बॉयफ्रेंड हा स्पेन शहरातील उद्योगपती आहे. Manuel Campos Guallar सह इशाने ऑगस्ट 2019 मध्येही एक फोटो शेअर केला होता. मॅन्युअल हा माबेल कॅपिटलचा सीईओ आणि मालक आहे. त्याने युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोमधून एमबीए केले असून लॉ अँड फायनान्सची बॅचलर डिग्रीही मिळवली आहे. तर इशाने आतापर्यंत बॉलीवूडमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र तिला म्हणावे तसे ग्लॅमर मिळाले नाही. पण तरीही इशा आपल्या हॉट आणि ग्लॅमरस फोटोशूटमुळे नेहमीच चर्चेत असते. तिचे फोटो ती नेहमीच आपल्या इन्स्टावर पोस्ट करत असते आणि तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. इशाने प्रेमाची कबुली दिली असली तरीही तिची मॅन्युअलबरोबर कुठे भेट झाली आणि ते दोघे एकमेकांच्या कसे जवळ आले, प्रेमात पडले याबाबत काहीही स्पष्ट केलेले नाही. मात्र या लॉकडाऊनच्या काळात ते दोघेही एकमेकांची व्हिडिओ कॉलवरूही काळजी घेत आहे. सध्या अगदी सामान्यांपासून ते सेलिब्रिटी सगळ्या कपल्सची अशीच ताटातूट झालेली आहे. मात्र इशा आता मॅन्युअलबरोबर कधी लग्न करणार आहे आणि त्याची घोषणा कधी करणार आहे याकडेच तिच्या चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
मराठी सेलेब्सना क्वारंटाइनमध्येही फिट ठेवणारी जोडी
Read More From बॉलीवूड
फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यावरील बायोपिक ‘सॅम बहादूर’च्या चित्रीकरणास सुरुवात
Vaidehi Raje