मनोरंजन

अभिनेत्री हिना पांचाळला झाली अटक, जाणून घ्या कारण

Leenal Gawade  |  Jun 28, 2021
अभिनेत्री हिना पांचाळला झाली अटक, जाणून घ्या कारण

बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोरासारखी हुबेहूब दिसणारी अभिनेत्री अशी ओळख असलेली महाराष्ट्रीयन अभिनेत्री हिना पांचाळ सध्या चर्चेत आली आहे. तिला चक्क तिच्याच वाढदिवशी अटक झाली आहे. नाशिक येथील इगतपुरी परीसरात झालेल्या पार्टीत हिना पांचाळ हिला अटक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे अचानक इन्स्टाग्रामनंतर आता हिना सगळ्या बातम्यांमध्ये झळकू लागली आहे. हिना पांचाळ हिला नेमकी का अटक झाली याचे नेमकं कारण काय आहे? आणि हिना कोण आहे जाणून घेऊया या संदर्भातील माहिती.

सारेगमप लिटिल चॅम्प मंचावर रंगणार लोकसंगीताचा जागर

करत होती रेव्ह पार्टी

सध्या संपूर्ण देशात लॉकडाऊनचं वातावरण आहे. त्यामुळे बरेच निर्बंध घातलेले आहेत. अशात पार्टी करणं हे सगळ्यांनाच शक्य नाही. अशातच हिना पांचाळ हिने वाढदिवसासाठी इगतपुरी परीसरात एक रेव्ह पार्टी आयोजित केली होती. या रेव्ह पार्टीत ड्रग्ज असल्याची माहिती नाशिक ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. हश, कोकी, हुक्का असे सगळे यामध्ये  असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी लागलीच या ठिकाणी छापा घालत या पार्टीतील सगळ्यांना ताब्यात घेतले. त्यामुळे अचानक हिना पांचाळ चर्चेत आली आहे. बिग बॉसनंतर सतत सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारी हिना पांचाळ आता  पुन्हा चर्चेचा विषय बनली आहे.

आपल्याच गाण्याचं प्रमोशन करतेय राखी, व्हिडिओ होतायत व्हायरल

ड्रग्ज रॅकेट आले समोर

सुशांत सिंह राजपूत गेल्यापासून ड्रग्ज प्रकरणाची माहिती ही आतापर्यंत सगळ्यांनाच झालेली आहे. ड्रग्ज पेडलर हे पोलिसांच्या रडारवर आहेत. या पार्टीसाठी काही खास ड्रग्ज पुरवणारी टोळी नाशिक परिसरात आल्याची टीप पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या पार्टीमध्ये मोठे ड्रग्ज पेडलर येणार होते. हे सगळ्यात मोठे ड्रग्ज रॅकेट असल्याची माहिती मिळाल्यामुळे या पार्टीवर धाड टाकण्यात आली. आता याच्या पुढील तपासासाठी मुंबईहून पोलिसांची टिम देखील पोहोचली आहे.अशी माहिती मिळत आहे. त्यामुळे आता तपासातून नेमकं काय समोर येतं ते पाहावे लागेल. दरम्यान, हिना अजूनही पोलिसांच्या ताब्यात आहे असे कळत आहे.

कोण आहे हिना पांचाळ

हिना पांचाळ ही दाक्षिणात्य अभिनेत्री असून तिने अनेक चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटातून तिला प्रसिद्धी मिळाली आहे. पण बिग बॉस मराठीमध्ये आल्यानंतर तिला सगळ्यात जास्त प्रसिद्धी मिळाली. इन्स्टाग्रावर तिचा चाहता वर्ग मोठा आहे. आपल्या बोल्ड आणि बिनधास्त वागण्यामुळे तिची कायम चर्चा होते. तिचे व्हिडिओ आणि तिचा डान्स व्हिडिओ कायम सोशल मीडियावर दिसत असतो. तिने दाक्षिणात्य चित्रपटात काम केल्यामुळे तिथे तिने खूप डान्स केलेले आहेत. तिचे इन्स्टाग्राम अकाऊंट तिच्या सगळ्या पोस्टने भरलेले आहेत. ती मलायका अरोराची कॉपी असल्यामुळे तिची खूप जण तारीफ करतात. पण त्याचबरोबर तिला ट्रोल देखील केले जाते. त्यामुळे हिना पांचाळ कायमच चर्चेत असते.
पण आता या नव्या गोष्टीमुळे हिना पांचाळ अधिक चर्चेत आली आहे. 

तुझ्यात जीव रंगला फेम धनश्री काडगावकरच्या बाळाचं झालं बारसं

Read More From मनोरंजन