मनोरंजन

मालिका सोडण्यावरुन ऋताने दिले आता स्पष्टीकरण, म्हणाली…

Leenal Gawade  |  May 31, 2022
hruta_durgule_fb

तमाम दिलों की धडकन.. अशी जिची ओळख आहे ती अभिनेत्री ऋता दुर्गुळे आता ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेतून आपल्याला या पुढे दिसणार नाही हे यावर बातम्यांनी शिक्कामोर्तब केले होते. पण अशी कोणतीही माहिती स्वत: ऋताने दिली नव्हती. आता एक मुलखतीदरम्यान तिने यासंदर्भात काही स्पष्टीकरण दिले आहे. ते ऐकून तुम्हाला धक्का बसणार आहे. सध्या हनिमूनसाठी टर्कीला बाहेर गेलेली ऋता या संदर्भात काय म्हणाली आहे ते जाणून घेऊया. ऋता मालिका सोडणार की, तिचा निर्मात्यासोबतचा वाद मिटला जाणून घेऊया याबद्दल अधिक

मालिका सोडण्याचा निर्णय का?

ऋताने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला अशी पहिली बातमी जेव्हा सगळीकडे पसरली त्यावेळी तिचे मालिका सोडण्याचे कारण हे अस्वच्छता होती. त्या संदर्भात तिने निर्मात्यांना अनेकदा सांगितले पण अखेर चिडून तिने मालिका सोडली असे सांगितले जात होते. पण आता ऋताने यावर स्पष्टीकरण दिले आहे. ऋताने एका मुलाखती दरम्यान सांगितले की, मी मालिका सोडली हे मी देखील ऐकले. पण असे काहीही झालेले नाही. मी माझ्या लग्नासाठी 15 दिवसांची सुट्टी घेतली आहे. त्यानंतर मी पुन्हा मालिकेत दिसणार आहे. येत्या सोमवारपासून तिने शुटींगला येणार असल्याचे देखील सांगितले आहे. त्यामुळे आता ही अफवाच होती असे म्हणावे लागणार आहे. त्यामुळे जर ऋता दिसणार नाही म्हणून तुम्ही नाराज असाल तर ऋताने तुमच्यासाठी आनंदाची बातमी दिलेली आहे. 

स्वच्छतेवरुन झाला होता का वाद?

ज्या स्वच्छतेवरुन ऋताने मालिका सोडली असे कळत होते. खरंच या कारणामुळे ऋताने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला होता का? असे तिला विचारण्यात आले त्यावेळी तिने सांगितले की, मालिका निर्मात्यांसोबत माझे चांगले संबंध आहेत. स्वच्छतेच्या कारणावरुन जर मला काही खटकत असेल तर आम्ही ते बोलून सोडवू शकतो. त्यासाठी मालिका सोडण्याचा निर्णय का घेण्यात येईल. सेटवर काही ना काही समस्या उद्भवत असतात. पण असे काही झाले असते तर मी सोशल मीडियावर पोस्ट केली असती. पण असे काहीही झालेले नाही. हे सांगायला ऋता विसरली नाही.

सध्या करतेय हनिमून

ऋतानचे नुकतेच लग्न झाले आहे. लग्नाचे तिचे अनेक सुंदर फोटोज तिने शेअर केले आहेत. तिचे अनेक लग्नाचे व्हिडिओज व्हायरलही झाले आहेत. तिच्या लग्नातील लुकपासून ते तिच्या इमोशनपर्यंत सगळे काही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तिच्या लग्नानंतर ती हनिमूनसाठी टर्कीला गेली आहे. तिथून तिने तिचे अनेक फोटोज आणि व्हिडिओज शेअर केले आहेत. ज्यात ही जोडी खूपच सुंदर दिसत आहे. आता तिच्या या सुट्टीनंतर ती मालिकेत पुन्हा परतण्याची प्रतिक्षा सगळ्यांना आहे. 

आता ऋता मालिकेत दिसणार नाही, या बातमीवर तिने स्पष्टीकरण दिल्यामुळे अनेकांना दिलासा मिळाला असेल.

Read More From मनोरंजन