मनोरंजन

चाकूने मारण्याची अभिनेत्री माही विजला कुककडून धमकी, माहीने केला खुलासा

Dipali Naphade  |  Jun 30, 2022
actress-mahhi-vij-cook-threatened-to-kill-her-know-the-matter-in-marathi

जय भानुशाली (Jay Bhanushali) आणि माही विज (Mahhi Vij) हे मनोरंजन क्षेत्रातील अत्यंत प्रसिद्ध जोडपे आहे. तर त्यांची मुलगी तारा भानुशालीही (Tara Bhanushali) सोशल मीडियावर खूपच प्रसिद्ध आहे. मात्र माहीने काही ट्विट केले आणि नंतर डिलीट केले. पण हे डिलीट करण्यात आलेले ट्वीटही व्हायरल होत आहेत. या ट्विट्समधून आपल्या घरात काम करणाऱ्या कुककडून आपल्याला धमकी देण्यात (Threat To Death) आल्याचे माहीकडून सांगण्यात आले. याशिवाय यासंदर्भात आपल्याकडे पुरावा असल्याचेही माहीने यामधून स्पष्ट केले आहे. “कुकने मला चाकू पोटात खुपसून मारण्याची धमकी दिली होती” (Mahhi Vij’s cook gave threat to death, stab khanjar) अशा पद्धतीनेच ट्विट तिने केले होते.

मुलाखतीत केले स्पष्ट

एका इंग्रजी संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीमध्ये माहीने याबाबत अधिक खुलासा केला आहे.  माहीने सांगितलं की, तो कुक तिच्याकडे काही दिवसांपासून काम करत होता. मात्र माहीच्या मुलीच्या ताराच्या नॅनीने तीनच दिवसात त्याच्याविषयी तिला अलर्ट राहायला सांगितले होते. त्याने घरातील काही वस्तूंची चोरी केल्याचे निदर्शनास येताच तिने याविषयी आपला पती जय भानुशाली याला याबाबत माहिती दिली. त्याप्रमाणे जयने केलेल्या कामाचा हिशेब करून त्याला कामावरून जायला सांगितले असता, त्या कुकने भांडण करत एक महिन्याचा पगार मागितला आणि दोघांनाही जीवानीशी मारण्याची धमकी दिली. त्यावेळी त्या कुकने दारू प्यायली असल्याचेही माहीने सांगितले. आपल्याला आपल्या जीवाची काळजी नाही मात्र मुलीचा विचार करून फारच भीती वाटत असल्याची चिंता तिने व्यक्त केली. 

फोनवरून दिल्या कुकने धमक्या

जय आणि माहीने त्या कुकला कामावरून काढल्यानंतरही त्या कुकने फोन करून धमकी देणे सुरूच ठेवले असल्याचा खुलासाही माहीने केला. आजकाल बरंच काही आजूबाजूला घडत असून जर खरंच त्याने चाकू मारला तर असा विचार केला तरी घाबरायला होतं. कारण त्यानंतर लोक माझ्यासाठी आवाज तर नक्की उठवतील, पण त्याचा फायदा काय? कुटुंबाच्या काळजीत आपण असल्याचेही माहीने सांगितले आहे. तर तो जेलमधून सुटल्यावर आपल्या मुलीचे काही बरंवाईट तर करणार नाही ना? तिला तर काही होणार नाही ना? किंवा जेलमधून सुटल्यानंतर कोणताही बदला तर तो घेणार नाही ना? अशीही तिने ट्विटमधून चिंता व्यक्त केली होती. इतकंच नाही तर त्या कुकने “200 बिहारी आणून उभे करीन” असंही शिवीगाळ करत सांगितल्याचे माहीने सांगितले असून यासंदर्भात पोलीस स्टेशनला तक्रारही केल्याचे सांगितले आहे. मात्र आपल्याला आणि आपला नवरा जय या दोघांनाही मुलगी ताराची काळजी अधिक असल्याचे तिने आवर्जून सांगितले आहे. ताराला कोणताही त्रास होता कामा नये यासाठीच सध्या दोघेही चिंतेत असल्याचे कळून येते. 

जय भानुशालीने नुकतेच ‘DID lil Master’ च्या पाचव्या सीझनचे निवेदन केले होते. तर माही गेले काही वर्ष आपली मुलगी तारा हिचा सांभाळ करत आहे. मात्र सोशल मीडियावर नेहमीच माही अॅक्टिव्ह असते. जय आणि माही नेहमीच आपल्या मुलीसह अनेक रिल्सदेखील शेअर करत असतात. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From मनोरंजन