आपल्याकडे लग्न झाल्यावर अनेक बंधने महिलांवर येतात असं म्हटलं जातं. अगदी काही कलाकारांच्या बाबतीतही हे दिसून आलं आहे. मात्र काही महिन्यांपूर्वीच अभिनेता सिद्धार्थ चांदेकरशी (Siddharth Chandekar) लग्नगाठ बांधलेल्या अभिनेत्री मिताली मयेकरच्या (Mitali Mayekar) बाबतीत मात्र हे नक्कीच उलट झाल्याचे बघायला मिळत आहे. लग्नानंतर लगेचच मितालीने केस कापून आपला लुक बदलला होता. तर तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर अनेक बोल्ड फोटोही शेअर केले होते. पण आता चर्चा आहे ती मितालीच्या साडीतील बोल्ड लुकची.
कोरोना असूनही बाहेर फिरल्यामुळे या अभिनेत्रीवर गुन्हा दाखल
लाल साडीमध्ये खुलले मितालीचे सौंदर्य
मितालीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक लाल साडीतील फोटो शेअर केला असून तिचा हा बोल्ड लुक चाहत्यांनाच नाही तर अगदी तिच्या इंडस्ट्रीतील मित्रमैत्रिणींनाही भावला आहे.लाल साडी, गळ्यात मंगळसूत्र आणि कर्ल केलेले केस असा लुक मितालीने ‘चला हवा येऊ द्या’ या शो च्या मंचासाठी खास केला होता. या शो च्या चित्रीकरणाच्या वेळी मिताली लग्नानंतर या लुकमध्ये आली होती. तिने हा लुक शेअर केल्यानंतर तिच्या या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव तर होतच आहे. शिवाय तिला या फोटोसाठी अनेक लाईक्सही मिळत आहेत. चला हवा येऊ द्या च्या सेटवर नॉमिनेशन स्पेशल भाग चित्रीत करण्यात आला. मिताली सध्या ‘लाडाची मी लेक गं’ या मालिकेतून कस्तुरी म्हणून प्रेक्षकांसमोर येत आहे. या मालिकेतील भूमिकेसाठी तिला नामांकन मिळाले असून सध्या पुरस्कार सोहळ्यासाठी प्रेक्षकांसमोर मत मागण्याचे काम सुरू आहे. याचसाठी मिताली आणि अनेक कलाकारांनी ‘चला हवा येऊ द्या’ च्या सेटवर उपस्थिती लावली होती. साधा पण तितकाच हॉट असा लुक करून मितालीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले असल्याचे दिसून येत आहे. काही जणांनी मितालीला या लुकमध्ये खूपच अप्रतिम दिसत आहे असे म्हटले आहे, तर काही जणांनी लुक तर अप्रतिम आहे. मात्र तुला लहान केस शोभून दिसत नाही अशाही कमेंट्स दिल्या आहेत. मात्र हा फोटो नक्कीच दुर्लक्षित करण्यासारखा नाही हे या कमेंट्सवरून कळून येत आहे.
मोबाईलनंतर आता आमिरने सोडलं ‘सोशल मीडिया’ शेअर केली शेवटची पोस्ट
मितालीचा लग्नानंतरचा बोल्ड अंदाज
मितालीने जानेवारी महिन्यात सिद्धार्थशी लग्न केले. त्यानंतर मितालीने काही दिवसातच आपल्या लांबसडक केसांना अलविदा करत केस लहान करून घेतले. तर बाथटबमधील काही फोटोही तिने आपल्या सोशल मीडियावरून पोस्ट केले होते. लग्नानंतर मितालीने अधिकाधिक बोल्ड फोटो शेअर केले असल्याचे दिसून येत आहे. मग तो बाथटबमधील पाठमोरा फोटो असो अथवा सिद्धार्थसह चुंबन घेतानाचा फोटो असो. मितालीचे अनेक चाहते आहेत. काही जणांना तिचा हा लुक आवडतोय तर काही जणांना तिचा हा बोल्डनेस आवडत नाहीये. पण तरीही मिताली मात्र आपल्या चाहत्यांसाठी वेगवेगळे प्रयोग करत आहे आणि नेहमी आपल्या सोशल मीडियावरून आपल्या आयुष्यातील खास क्षणही शेअर करताना दिसून येत आहे. #tinypanda ची ही जोडी नेहमीच आपल्या चाहत्यांना आनंद देत असते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मितालीचे फोटो बऱ्याचदा स्वतः तिचा नवरा सिद्धार्थ काढतानाही दिसून येतो. त्यामुळे सिद्धार्थचा तिला पाठिंबा असल्याचेही दिसून येत आहे.
ड्रामा क्वीन राखी सावंतने शेअर केल्या लहानपणीच्या आठवणी
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade