कोरोना काळात अनेक सेलिब्रिटींनी लग्न केल्याचे समोर आले आहे. तर काहींनी गुड न्यूजही दिली आहे. त्यात आता अजून एक नाव जोडले गेले आहे ते म्हणजे अभिनेत्री नीती टेलर हिचे. कोरोनाचा हा काळ कधी संपणार याची कोणालाच कल्पना नाही. त्यामुळे आता आपल्या आयुष्याची नवी सुरूवात अनेकांनी सुरू केली आहे. त्यापैकी अनेकांनी अगदी घरच्या लोकांमध्येच आपलं लग्न करून घेतलं आहे. अगदी जवळच्या माणसांच्या उपस्थितीत नीतीने आपलं लग्न झाल्याची माहिती नुकतीच दिली आहे. त्यामुळे चाहत्यांना नक्कीच सुखद धक्का बसला आहे. परिक्षित बावा याच्यासह 13 ऑगस्ट रोजी आपण विवाहबद्ध झाल्याचे स्वतः नीतीने सांगितले आहे. मंगळवारी तिने आपले फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले त्यानंतर तिचे फोटो सर्वात जास्त ट्रेंड झाले आहेत.
या महिन्याच्या शेवटी नेहा कक्कर अडकणार विवाहबंधनात, चर्चांना आलंय उधाण
साखरपुडा करायचा होता पण केले लग्न
नीतीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर जाहीर करत लिहिले की, ‘मी याची घोषणा उशीरा करत आहे. कारण आम्हाला वाटले होते की, कोविड – 19 ची परिस्थिती बदलेल आणि आम्ही आमचा हा महत्त्वाचा दिवस अगदी मोठ्या प्रमाणात साजरा करू शकू. 2021 ची सुरूवात चांगली होईल अशी अपेक्षा आहे. कुमारीपासून ते सौ होण्यापर्यंतचा माझा प्रवास. मी माझ्या सर्व चाहत्यांना आणि सांगू इच्छिते की, 13 ऑगस्ट, 2020 रोजी मी परिक्षितसह विवाहबद्ध झाले. आमच्या पालकांच्या उपस्थितीमध्ये अगदी लहान सोहळ्यामध्ये हे लग्न पार पडले असून कोविड काळातील आमचे लग्न आहे. आता मी अगदी मनापासून मोठ्या आवाजात ‘हॅलो नवऱ्या’ अशी हाक मारू शकते. 2020 मधील माझा स्वतःचा सर्वात मोठा आनंद’. तसंच याआधी 13 ऑगस्टला नीती साखरपुडा करणार होती मात्र त्यांनी कोरोनाची ही परिस्थिती बघून लग्न केल्याचे सांगितले. नीतीने आपल्या लग्नाच्या स्वप्नवत असा व्हिडिओदेखील शेअर केला असून नीतीच्या मित्रमैत्रिणींनी आणि चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
खुशखबर! गायक सपना चौधरी झाली आई, मुलाला दिला जन्म
अतिशय सुंदर दिसत आहे नीती
नीतीचा नवरा परिक्षित बावा हा आर्मी अधिकारी असून दोघेही लग्नात खूपच सुंदर दिसत आहे. नीतीने सॉफ्ट गुलाबी रंगाचा सुंदर भरजरी लेहंगा घातला असून पायल केयालने तिचा लेहंगा डिझाईन केला आहे. नीतीने काही महिन्यांपूर्वी तिचे हे फोटो शेअर केले होते. मात्र आपण लग्न केले आहे याचा माहिती दिली नव्हती. त्यामुळे कोणत्या तरी मॅगझिनसाठी चित्रीत करण्यात आला असेल असा अंदाज लावण्यात आला होता. मात्र आता नीतीने स्वतः सांगितल्यानंतर तिच्या स्वतःच्या लग्नातील हे फोटो असल्याचे समोर आले आहे. नीतीने खूपच कमी वयात प्रसिद्धी मिळवली. तिने एमटीव्हीच्या ‘कैसी ये यारीया’ मधील नंदिनी मूर्ती या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केले. तर त्यानंतर तिने बडे अच्छे लगते है, सावधान इंडिया, ये है आशिकी आणि इश्कबाज यासारख्या मालिकांमधूनही काम केले. पण नीती इतक्या लवकर लग्न करेल असं कोणालाच वाटलं नव्हतं. त्यामुळे तिच्या चाहत्यांना एक सुखद धक्का बसला आहे.
पतौडी पॅलेसमध्ये स्पॅनिश शिकत आहे तैमूर, शेअर केले क्यूट फोटो
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade