बॉलीवूड

पल्लवी जोशी आणि विवेक अग्निहोत्रींचा कोव्हिड-19 पीडित मुलांना दत्तक घेण्यास पुढाकार

Dipali Naphade  |  May 18, 2021
पल्लवी जोशी आणि विवेक अग्निहोत्रींचा कोव्हिड-19 पीडित मुलांना दत्तक घेण्यास पुढाकार

सध्या कोरोनाने (Coronavirus) सगळीकडेच हाहाःकार माजवला आहे. अनेक कलाकार विविध रूपात मदत करण्यासाठी पुढे येत आहेत. सध्या अनेकांना वेगवेगळ्या गोष्टींची गरज आहे. विशेषतः या दुसऱ्या लाटेत अनेक घरं उद्धवस्त झाली आहेत. त्यामुळे कुटुंबातील अनेक मुलं अनाथ झाली आहे. त्यासाठी आता अनेक संस्था आणि कलाकार मदत करायला पुढे येत आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने मदत करण्यासाठी वेगवेगळ्या एनजीओशीदेखील हातमिळवणी करत आहेत. जास्तीत लोकांना याचा फायदा घेता यावा यासाठी प्रयत्न करत आहेत. आता अभिनेत्री पल्लवी जोशी (Pallavi Joshi) आणि तिचे पती दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री (Vivek Ranjan Agnihotri) यांनी कोव्हिड-19 साथीच्या आजाराने पीडित झालेल्या मुलांना आणि कुटुंबांना दत्तक घेण्यासाठी एका एनजीओशी (NGO) हातमिळवणी केली आहे. कोव्हिड-19 (Covid 19) मुळे भारत इतिहासातील सर्वात वाईट टप्प्यातून जात असताना, सर्व देशातील आरोग्याच्या पायाभूत सुविधांना आणि त्याच्या अर्थव्यवस्थेला चाप बसला आहे, तरी मदत कार्यासाठी सिनेसृष्टीतील हे जोडपे पुढाकार घेत आहे.

विद्या बालनच्या ‘शेरनी’चा ग्लोबल प्रिमिअर ‘या’ ओटीटी माध्यमावर होणार प्रदर्शित

तज्ज्ञांकडूनही मिळणार समुपदेशन

Instagram

अभिनेत्री पल्लवी जोशी आणि तिचे चित्रपट निर्माते पती श्री विवेक रंजन अग्निहोत्री हे जोडपं कोव्हिड-19 मुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी (Orphan Child), तज्ञांच्या अध्यक्षतेखाली समुपदेशन सत्र आयोजित करत आहेत.  हे जोडपे आय एम बुद्धा फाउंडेशन चालवित आहेत, ज्याद्वारे ते चित्रपट क्षेत्रातील, कोरोना महामारीने ग्रस्त असलेल्या व्यक्तींना मदत करत आहेत. या संदर्भात पल्लवी जोशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पल्लवीने सांगितले की, “या समुपदेशन सत्राचे लक्ष्य लहान मुले आणि किशोरवयीन मुले आहेत, ज्यांनी कोरोनाच्या या संकटकाळात आपले एक किंवा दोन्ही पालक गमवल्याने, मानसिक त्रासाला सहन करत आहेत.’’ सध्या अनेक मुलांवर हे संकट ओढवले असून अनेक जण मदतीसाठी धाऊन येत आहेत. यामध्ये आता पल्लवी जोशीनेही पाऊल उचलले आहे. 

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचं ‘लॉकडाऊन लग्न’, सोशल मीडियावर चर्चा

कुटुंबांसाठीही उचलले पाऊल

या जोडप्याने  ”नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाईल्ड राईट्स (एनसीपीसीआर)” महिला व बालविकास मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणाऱ्या भारतीय बाल हक्क संरक्षण आयोग बरोबर करार केला आहे. विवेक अग्निहोत्री यांनी सांगितले की, मुलांची मानसशास्त्रज्ञांकडून सुयोग्य देखरेखीखाली अत्यंत काळजीपूर्वक निगा राखली जात आहे . “आम्ही अशा मुलांचाही विचार करत आहोत ज्यांचे कुटुंब विलग्नवासात आहेत कारण कधी कधी भावनात्मक त्रासामधून जात असलेल्या मुलांशी वागताना, त्यांना हाताळताना बहुतेक वेळा नातेवाईक कमी पडतात. अशा मुलांची चिंता आणि राग व्यक्त करण्याचीसुद्धा एक पद्धत असते, कारण त्यांचा सांभाळ नातेवाईक किंवा जवळचे परिजन करत असतात.

कोव्हिड-19 सर्व देशभर पसरल्याने अशावेळी हा लहानसा पुढाकार हजारो लोकांचे जीव वाचवू शकेल या भावनेने हे जोडपे कार्य करत आहेत. पल्लवी आणि विवेक एनजीओसमवेत सध्याच्या परिस्थितीमुळे पीडित असलेल्या मुलांची आणि कुटुंबाच्या मदतीवर भर देत आहेत. तसंच सध्या जास्तीत जास्त लोकांनी मदत करावी या हेतूनेच सध्या या गोष्टी नागरिकांसमोर आणण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत आहे. 

घरी बसून कंटाळला असाल तर कुटुंबासोबत पाहा या सीरिज

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From बॉलीवूड