मनोरंजन

पूजा हेगडेने मॅरेथॉनच्या रेस डे टी चे केले अनावरण

Dipali Naphade  |  Dec 20, 2018
पूजा हेगडेने मॅरेथॉनच्या रेस डे टी चे केले अनावरण

जानेवारी महिना जवळ आला की, मुंबईला वेध लागतात ते मॅरेथॉनचे. अर्थात या मॅरेथॉनची तयारी साधारण पाच महिने आधीपासूनच सुरु होते. मुंबईत 20 जानेवारी, 2019 मध्ये टाटा मुंबई मॅरेथॉन होणार असून आज अभिनेत्री पूजा हेगडेने मॅरेथॉनच्या रेस डे टी चं अनावरण आज एशियन मॅरेथॉन चँम्पियन गोपी टी सह केलं. पहिल्यांदाच एसिक्सच्या सहयोगाने मॅरेथॉन रेसचे टीशर्ट्स रनर्स वापरणार आहेत. पूजा हेगडे हे बॉलीवूडमधील खूपच कमी वेळामध्ये नावाजलेलं नाव आहे. पूजाने हृतिक रोशनबरोबर ‘मोहेंजोदडो’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये प्रवेश केला. पण पूजा स्वतः एक रनर आणि फिटनेस फ्रीक आहे. त्यामुळे पहिल्यांदाच फिटनेस फ्रीक पूजा हेगडे मॅरेथॉनशी जोडली गेली आहे. यापूर्वीही अनेक सेलिब्रिटीजने मॅरेथॉनमध्ये आपली हजेरी लावली असून दरवर्षी जॉन अब्राहम, राहुल बोस, तारा शर्मा, जुही चावला यांची उपस्थिती असतेच.


रनर्ससाठी शूज महत्त्वाचे – पूजा

कोणत्याही रनर्ससाठी शूज महत्त्वाचे असतात. धावताना आपल्या पायांची काळजी चांगल्या शूजमुळेच राखली जाते. फिटनेस हा माणासाच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग आहे आणि त्यासाठी नेहमी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणंही आवश्यक आहे. हाच संदेश देत दरवर्षी ही मॅरेथॉन घेण्यात येते आणि लाखो लोक यामध्ये सहभागी होतात. त्यामुळे त्यांची काळजी घेण्यासाठी अनेक ब्रँड्सही पुढे येत असतात, असं पूजाने यावेळी म्हटलं. मी स्वतः फिटनेस फ्रीक असल्यामुळे नेहमीच एसिक्सची चाहती राहिले आहे आणि लोकांनीही आपल्याला जास्तीत जास्त फिट राहता येईल याकडे लक्ष द्यायला हवं असंही पूजाने यावेळी म्हटलं. पूजा आपल्या फिटनेसची योग्य तऱ्हेने काळजी नेहमीच घेत असून रोजच्या व्यायामाकडे आणि धावण्याकडेही अगदी व्यवस्थित लक्ष देते. कोणत्याही रनर्ससाठी अधिकाधिक योगदान देणं गरजेचं असतं आणि त्यासाठी मॅरेथॉनशिवाय चांगला पर्याय असूच शकत नाही.


यावर्षी 47 हजार रनर्स धावणार

यावर्षी 47 हजार रनर्स धावणार असून साधारणतः अडीच लाखापेक्षाही जास्त लोकांची उपस्थिती मुंबई मॅरेथॉनमध्ये असण्याची शक्यता आहे. दरवर्षी मॅरेथॉनमध्ये कोणते सेलिब्रिटी धावणार आणि त्यांचे काय अनुभव असणार यांची सर्वांनाच उत्सुकता असते. तशीच यावर्षीही उत्सुकता ताणली गेली आहे. यामध्ये पूजा हेगडेचं नावही आता घेतलं जाणार का? हे आता पाहावं लागेल.

Read More From मनोरंजन