अभिनेत्री पूजा सावंत (Pooja Sawant) नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. आपले वेगवेगळे फोटोज आणि आयुष्यात सध्या नवं काय करत आहोत हे पूजा या माध्यमातून आपल्या चाहत्यांसमोर आणत असते. नुकत्याच एका रियालिटी शो च्या परीक्षकपदी पूजा दिसली होती. पूजाचे असंख्य चाहते आहेत. पण पूजा आता एकाच्या प्रेमात पडली आहे. या लॉकडाऊनमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या प्रेमात पडल्या आणि त्यांचं लग्न झालं आहे. त्यामुळे तुम्ही जो विचार करताय त्याला जरा आवर घाला. ओह…थांबा जरा …कोणताही अंदाज बांधण्याआधी आम्ही तुम्हाला नक्की कोणाच्या प्रेमात पडली आहे ते सांगणार आहोत. पूजाने काही दिवसांपूर्वीच या लॉकडाऊनमध्ये एका लहानशा पक्षाची सुटका केली आहे आणि ती सतत त्याचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत आहे. आपण या पक्षाच्या प्रेमात असून त्याचं लाडाचं नाव ‘पिकाबू’ ठेवलं असल्याचंही पूजाने सोशल मीडियावरच सांगितले आहे.
‘भाभीजी घर पे है’ मालिका सोडली की नाही यावर नेहा पेंडसेची प्रतिक्रिया
पूजा पोस्ट करत आहे व्हिडिओ
काही आठवड्यांपूर्वी पूजाने या पक्षाची सुटका केली आहे. त्यावेळी हा पक्षी अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत होता. पण आता पूजा त्याची इतकी चांगली सेवा करत आहे की, हा पक्षीही तिच्या प्रेमात पडला असल्याचं व्हिडिओवरून दिसून येत आहे. हाच आपला खरा आनंद असल्याचंही पूजाने सांगितलं आहे. पूजा सावंतचं प्राणीप्रेम लपून राहिलेलं नाही. पण ‘पिकबू’च्या प्रेमात आपण आकंठ बुडाल्याचं पूजाने सांगितलं आहे. त्याला अगदी दूध पाजण्यापासून ते त्याची काळजी घेण्यापर्यंत सर्व गोष्टी पूजा स्वतः करत आहे. आता या पक्षाची तब्बेत बऱ्यापैकी सुधारल्याचंही पूजाने सांगितलं आहे. तिने त्याचे अनेक व्हिडिओही पोस्ट केले आहेत. खायला हवं असेल तेव्हा भराभरा पूजाच्या अंगाखांद्यावर खेळताना पिकबू दिसून येत आहे. त्यामुळे त्याला पूजाच्या प्रेमाची खूपच सवय झाल्याचंही दिसून येत आहे.
ऑडिशन न देताच तापसी पन्नूने मिळवला होता तिचा पहिला बॉलीवूड चित्रपट
अलबिनो पक्षाची जात
पूजाने सोडविलेल्या या पक्षाची जात अलबिनो आहे. सध्या त्याला पंख फुटलेले नाहीत. पण आपली कोणीतरी मदत करत आहे हे समजण्याइतका हा पक्षी नक्कीच हुशार आहे. साधारण महिन्याभरापासून पूजासह हा पक्षी आहे. पूजा याची इमानेईतबारे सेवा करत असून त्याच्या तब्बेतीत सुधारणा होत असल्याचेही दिसून येत आहे. तसंच आपल्या चाहत्यांसाठीही पूजा त्याचे अनेक व्हिडओ पोस्ट करत असून तिच्या चाहत्यांनाही हा पक्षी खूपच आवडत आहे. त्याच्या प्रत्येक व्हिडिओवर अनेक लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत. आपल्या घरातील हा निखळ आनंद असल्याचे पूजाने म्हटले आहेत. तसंच पूजाचं त्याच्यावरील प्रेमही दिसून येत आहे. त्याला डॉक्टरांकडे घेऊन जाणं. त्याला वेळच्या वेळी भरवणं हे सर्व पूजा स्वतः करत आहे. त्यामुळे पिकबू आणि पूजा दोघांचाही अगदी घट्ट बंध निर्माण झाल्याचंही या व्हिडिओंवरून दिसून येत आहे. पिकबूची तब्बेत सुधारत असून आरोग्य आता चांगले होत असल्याचेही तिने एक फोटो शेअर करून सांगितले आहे. तसंच पिकबू आता काय काय करू लागले आहे याची उत्सुकता आता चाहत्यांमध्येही निर्माण झाली आहे.
अलिबागकरांवरुन विधान करणे आदित्यला पडले महाग, मनसेने दिला इशारा
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade