मराठी मालिकांच्या सेटवर भांडणं किंवा कलाकारांमध्ये मतभेद असे प्रकार फारच कमी घडतात. पण गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेमुळे नवाच वाद चव्हाढ्यावर आला आहे.या मालिकेतील प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने अचानक मालिकेतून एक्झिट घेतली अशा बातम्या समोर येत असताना या मालिकेच्या निर्मात्या आणि ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांनी या मालिकेतून प्राजक्ताला काढून टाकण्यात आल्याचे सांगितले आहे. शिवाय ज्या कारणामुळे तिला या मालिकेतून काढण्यात आले ते कारण ऐकून अनेकांना धक्का बसला आहे. आरोप-प्रत्यारोपाच्या फेऱ्या प्राजक्ता आणि अलका या दोघांकडून झाल्या आहेत. त्यामुळे नेमंक दोघांनी काय सांगितले ते आता जाणून घेऊया. दरम्यान, या मालिकेतील प्राजक्ताची जागा आता वीणा जगताप या अभिनेत्रीने घेतली आहे.
कश्मीरा शाहचं हॉट फोटोशूट पाहुन क्लिनबोल्ड झाला कृष्णा अभिषेक
सेटवर सतत नखरे
अलका कुबल यांनी आतापर्यंत अनेकांना या संदर्भात मुलाखती दिल्या आहेत. त्यांनी सांगितले की, वयाने लहान असणाऱ्या प्राजक्ताने आधीही सेटवर अशा काही गोष्टी केल्या आहेत. पण लहान आहे असे समजून तिच्या या गोष्टीकडे अनेकदा दुर्लक्ष करण्यात आलं. सेटवर उशीरा येणं, मेकअप रुममधून बाहेर न पडणं, सगळ्या स्टाफला तात्कळत ठेवणं या गोष्टी प्राजक्ता आणि तिच्या आईने अनेकदा सेटवर केल्या आहेत. लॉकडाऊनच्या काळात मालिकेचे शुटिंग बंद होते. पण ज्यावेळी शुटिंग पूर्ववत झाले त्यानंतर सेटवर सगळ्यांना बोलावण्यात आले. अनेकदा इंजिनीअरींगचा पेपर आहे सांगून ती सुपाऱ्या घेत होती. तिने सुपाऱ्या घेतलेले अनेक फोटो सगळीकडे वायरल झालेले आहेत. तिच्या अशा वागण्यामुळे अनेक ज्येष्ठ कलाकारांना तिची वाट पाहात बसावे लागायचे. सेटवर असताना तिच्या मर्जीप्रमाणेच काम केले जायचे. त्यामुळे सगळ्यांनाच मन:स्ताप होत होता. दुर्दैवाने सेटवर कोरोनाची लागण अनेकांनी झाली. ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे त्यात निधन झाले. अनेकांची कोरोना चाचणी केल्यानंतर ती पॉझिटिव्ह असल्याचे कळले. शूटसाठी एका गाडीतून विवेक सांगळे आणि प्राजक्ता प्रवास करत असताना विवेकला गाडीत बसण्यास तिने मज्जाव केला. कोरोना रुग्णांना हाताळत असल्यामुळे तू माझ्यासोबत नको असे म्हणत तिने त्याल गाडीतून उतरवले. अशा अनेक गोष्टी मालिका चित्रीकरणादरम्यान घडल्याचे अलका कुबल यांनी सांगितले.
प्राजक्तानेही दिले उत्तर
नाण्याची एक बाजू पाहून कधीच चालत नाही. ज्यावेळी हे सगळे प्रकरण पुढे आले त्यावेळी प्राजक्ताकडून या संदर्भात कोणतेही उत्तर आले नव्हते. पण प्राजक्ताने सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेला सगळा प्रकार सांगितला आहे. मालिकेतून तिला काढण्यात आल्याच्या बातमीवर नकार देत तिने स्वत: मालिका सोडल्याचे सांगितले आहे. आशालता वाबगावकर गेल्यानंतर शूट पुन्हा सुरु झाले. मुंबईच्या गोरेगाव फिल्मसिटीमध्ये हे शूट करण्यात येणार होते. विवेक सांगळे हा कोरोना रुग्णांसोबत होता. काळजी म्हणून त्याला मी गाडीतून येण्यास नकार दिला. त्याला गाडीतून येऊ नको म्हटल्यावर त्याने शिवीगाळ करायला सुरुवात केली. अत्यंत असभ्य भाषेत तो बोलत होता. त्या दिवसानंतर त्याच्यासोबत काम करण्याची इच्छा उडून गेली. मी चॅनेलला आणि मालिकेच्या निर्मात्यांना मालिका सोडत असल्याचे सांगितले होते. शिवाय तारीखही कळवली होती. असे तिने स्पष्ट केले.
लग्नासाठी आदित्य नारायणचा सोशल मीडियाला रामराम, डिसेंबरमध्ये करणार लग्न
वीणा जगतापने घेतली जागा
प्राजक्ता प्रकरणाला पूर्ण विराम देत मालिकेने प्राजक्ताच्या जागी आता वीणा जगतापला आणले आहे. अलका कुबल यांनी ही माहिती दिली आहे. त्यामुळे आता आर्या हे पात्र साकारताना वीणा जगताप दिसणार आहे. वीणा सोबत मालिकेचे शुटिंग सुरुवात झाले असून वीणाच्या फॅन्सनी तिचे अभिनंदन केले आहे.
मराठी मालिकेमध्ये वादाची ठिणगी पडण्याच्या घटना घडत असतील. पण या मालिकेच्या सेटवरील झालेल्या वादाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.
आपल्या प्रेमासाठी अंकिता लोखंडेची भावपूर्ण पोस्ट
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade