हिंदी आणि मराठी सिनेमातील लोकप्रिय अभिनेत्री रेणुका शहाणे हा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरील एक प्रसिद्ध चेहरा आहे. आत्तापर्यंत रेणुका यांनी अनेक शॉर्ट व्हिडिओजमध्ये काम केलं आहे. तसंच रेणुका यांचा पहिला वेब शो व्हॉट द फॉक्स च्या यशानंतर आता पुन्हा एका मेडिकल कॉमेडी वेबसीरिज ‘स्टार्टिंग ट्र्बल’मध्ये झळकणार आहे. या कॉमेडी मालिकेतून ती प्रेक्षकांना हसवण्यासाठी तयार आहे. ज्याचं दिग्दर्शन करत आहे अभिनव कमल.
पहिली कॉमेडी मेडिकल वेबसीरिज
‘स्टार्टिंग ट्रबल’ ही आपल्या दैनंदिन जीवनातल्या घटनांना केंद्रस्थानी ठेवूनही वेबसीरिज बनवण्यात आली आहे. जी डॉ. जगदीश चतुर्वेदी यांनी लिहीलेल्या इनवेटींग मेडिकल डिव्हायसेस नावाच्या पुस्तकावर आधारित आहे. आरोग्याच्या दुनियेत पाऊल ठेवणाऱ्या डॉक्टरांवर आधारित हे पुस्तक सर्वात जास्त खपलेल्या पुस्तकांपैकी एक आहे. जे 2016 साली प्रकाशित झालं होतं. खरंतर ही एका विद्यार्थ्याच्या आयुष्यात परिवर्तन घडताना घडणारी कथा आहे. ज्याचं रूपांतर डॉ. कविता गौडा यांच्या मार्गदर्शनाखाली एका मेडिकल इनोवेटरमध्ये होतं. दिग्दर्शक अभिनव कमल यांनी या वेबसीरिजबाबत सांगितलं आहे की, स्ट्रार्टिंग ट्रबल ही सत्य घटनांवर आधारित एक आकर्षक कथा आहे. जी कामाप्रती तुमची असलेली ओढ आणि प्रामाणिकपणा दाखवते.
रेणुका यांची विनोदी भूमिका
अभिनेत्री रेणुका शहाणे नेहमीच विविध भूमिका करून प्रेक्षकांचं मनोरंजन करत असते. आता रेणुका या वेबसीरिजमध्ये कॉमेडी अभिनयाचा तडका देताना दिसणार आहेत. आपल्या या अनुभवाबाबत रेणुका यांनी सांगितलं की, अभिनव आणि जगदीश यांच्यासोबत सेटवर काम करणं म्हणजे एखाद्या पिकनिकसारखं होतं. या निमित्ताने मला डॉ. जगदीश यांच्याकडून मेडिकल क्षेत्रातलं बरंच काही शिकण्याची संधी मिळाली. फक्त एकच गोष्ट कठीण होती ती म्हणजे शूटींगदरम्यान जगदीश यांच्यासमोर चेहरा सरळ ठेवणं. हा प्रोजेक्ट अगदी छान झाला असून या प्रोजेक्टचा मला भाग केल्याबद्दल मी अभिनव आणि जगदीश यांचे आभार मानते.
ही सहा भागांची वेबसीरिज आहे. या वेबसीरिजची निर्मिती खास आहे. कारण भारतात पहिल्यांदाच मेडिकल क्षेत्रावरील कॉमेडी वेब शो येतोय. या वेब शोमधील कलाकारांमध्ये डॉ. जगदीश चतुर्वेदी, रेणुका शहाणे, कुरूश देबू, अनुष्का, राजेश पीआय, भरत चावला, जुई पवार, अदिती रावल, विक्रांत खट्टा, नेहा पाठक आणि राहुल सुब्रमण्यम असे सर्व कलाकार आहेत.
एकता कपूरच्या दोन वेबसीरिजमध्ये झळकणार हा चेहरा
2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.
प्रेक्षकांपर्यंत न पोहचू शकलेला ‘दाह : एक मर्मस्पर्शी कथा’
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade