मनोरंजन

शिल्पा ठाकरेचा नवा चित्रपट ‘A फक्त तूच’

Dipali Naphade  |  Nov 15, 2021
shilpa thakre

टिकटॉक फेम आणि एक्स्प्रेशन क्वीन म्हणून अल्पावधीतच लोकप्रिय झालेली अभिनेत्री शिल्पा ठाकरे आता आगामी “A फक्त तूच” या चित्रपटात अभिनेता चिन्मय उदगीरकर आणि अभिनेत्री सुरुची आडारकर यांच्यासोबत मुख्य भूमिका साकारणार आहे. नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त निर्माते, दिग्दर्शक, कलाकार आणि तंत्रज्ञ मंडळींच्या उपस्थितीत अहमदनगर येथे संपन्न झाला. जयदीप फिल्म प्रॉडक्शनची निर्मिती असलेल्या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन रंगनाथ बबन पाचंगे करत आहेत.चित्रपटाची पटकथा, संवाद प्रफुल एस. चरपे यांचे आहे. राजू भोसले क्रिएटिव्ह प्रोड्यूसर, मंगेश भिमराज जोंधळे कार्यकारी निर्माता आहेत तर रणजित माने यांनी छायांकन, सागर गायकवाड यांनी कला दिग्दर्शनाची जबाबदारी  निभावली आहे. चिन्मय उदगीरकर आणि सुरुची आडारकर यांच्यासह या चित्रपटात माधुरी पवार, शिल्पा ठाकरे, तेजस्विनी शिर्के, ऋषिकेश वांबुरकर, गीत निखारगे यांच्या भूमिका आहेत. प्रियांका दुबे यांनी वेशभूषा तर समीर कदम हे रंगभूषाकार म्हणून काम पाहणार आहेत. 

अधिक वाचा – हळदीसाठी खास बॉलीवूडची गाणी, तुमचेही पाय थिरकतील

नातं वेगळं असणारी कथा

A फक्त तूच… कारण आपलं नातं वेगळं आहे असं नाव असलेल्या या चित्रपटाद्वारे एक वेगळी आणि रोमँटिक कथा चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. अहमदनगर आणि परिसरातल्या उत्तमोत्तम लोकेशन्सवर हा चित्रपट चित्रित करण्यात येत आहे. त्यामुळे येत्या वर्षात प्रेक्षकांना उत्तम कलाकृती पाहायला मिळेल. टीव्ही मालिकांमधून घराघरात पोहोचलेले चिन्मय उदगीरकर (Chinmay Udgirkar) आणि सुरुची आडारकर (Sururchi Adarkar) “A फक्त तूच” या चित्रपटात एकत्र येत आहेत. एका वेगळ्या नात्याची गोष्ट या चित्रपटातून उलगडणार असून दसऱ्याच्या मुहूर्तावर चित्रपटाचं टीजर पोस्टर श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या चरणी लाँच करण्यात आलं. याप्रसंगी चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञ मंडळी उपस्थित होती. चिन्मय आणि सुरूची या दोघांनाही मालिकांमधून प्रेक्षकांनी पाहिले आहे आणि त्यांचे काम प्रेक्षकांना खूपच आवडले आहे. दोघांचाही चाहतावर्ग मोठा आहे. तसंच पहिल्यांदाच ही जोडी प्रेक्षकांसमोर एकत्र येत आहे. तर त्यांच्यासोबत शिल्पा ठाकरेही या चित्रपटात दिसणार आहे. 

अधिक वाचा – अभिनेता आर्यन हगवणेचा लक्षवेधी लुक ‘खुर्ची’ या सिनेमातून प्रेक्षकांसमोर

रोमँटिक कथा असल्याचा अंदाज

समुद्राची उसळलेली लाट, गुलाबाचं फुल हातात घेतलेल्या त्याच्या हातावर तिनं ठेवलेला हात टीजर पोस्टरमध्ये याआधी दिसला होता. तर कारण आपलं नातं वेगळं आहे… ही चित्रपटाची टॅगलाईन आहे. त्यामुळे एक वेगळी आणि रोमँटिक कथा चित्रपटातून पहायला मिळेल असा अंदाज टीजर पोस्टरवरून करता येतो. टीव्ही मालिकांमधून प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवलेले चिन्मय उदगीरकर आणि सुरुची आडारकर ही फ्रेश जोडी चित्रपटाचं वैशिष्ट्य ठरणार आहे.  चिन्मय आणि सुरूची या दोघांचाही अभिनय नेहमीच वाखाणला गेला आहे. अत्यंत नैसर्गिक अभिनय असणारे दोन्ही अभिनेते असून या दोघांचा एकमेकांसह कसा अनुभव असेल आणि यांची फ्रेश जोडी कशी दिसेल याचीच आता उत्सुकता लागून राहिली आहे. नुकताचा ‘अगंबाई सूनबाई’ या मालिकेतून चिन्मय प्रेक्षकांसमोर आला होता. तर सुरूचीदेखील मालिकांमध्ये दिसून येते. याशिवाय दोघेही नाटकांमध्येही काम करतात. त्यामुळे दोघेही कसलेले कलाकार असून मराठी प्रेक्षकांमध्ये या दोघांचे नाव माहीत नाही असे विरळाच असतील. त्यातही चिन्मयला महिला फॅन फॉलोईंग अधिक आहे. त्यामुळे आता या रोमँटिक चित्रपटाला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहावे लागेल. 

अजूनही या चित्रपटाची तारीख सांगण्यात आलेली नाही. मात्र लवकरच या चित्रपटाची तारीखही जाहीर करण्यात येईल. तर बाप्पाचा आशीर्वाद घेऊन या चित्रपटाची वाटचाल सुरू झाली आहे आणि प्रेक्षकांना ही वेगळी स्टोरी नक्की आवडेल असा विश्वासही या टीमला आहे. 

अधिक वाचा – कोण आहे ही चिमुकली, ओळखलं का, करतेय सध्या मराठी मालिकेत काम

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From मनोरंजन