अभिनेत्री सोनाली खरे 2014 मध्ये ‘बे दुणे दहा’ ह्या टिव्ही मालिकेमध्ये दिसली होती. त्यानंतर तिने ‘7, रोशन व्हिला’, ‘हृदयांतर’, सिनेमांमध्ये काम केलं. सोनाली यंदा दस-याच्या मुहूर्तावर टेलिव्हिजन विश्वात परतत आहे. कलर्स मराठीवरच्या ‘आज काय स्पेशल’ ह्या कुकिंगविषयक शोमध्ये सूत्रसंचालिकेच्या भूमिकेत सोनाली खरे दिसणार आहे. पहिल्यांदाच अशा शो मध्ये सोनाली काम करणार आहे. बेकिंगची आवड असल्यानेच हा शो स्वीकारला असल्याचं सोनलीने सांगितलं आहे. तर नवा कोरा शो घेऊन सोनाली येणार असल्याने तिच्या चाहत्यांना खूपच आनंद झाला आहे. सोनाली नेहमी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते आणि आपले योगा आणि फिटनेसचे व्हिडिओदेखील शेअर करत असते. त्यामुळे ती चाहत्यांशी नेहमीच कनेक्ट होती. मात्र आता एका मोठ्या गॅपनंतर पुन्हा एकदा सोनाली खरे टीव्हीवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
जानला घरी ठेवण्यासाठी शहजादला घरातून केले बेघर, लोकांनी व्यक्त केली नाराजी
कमबॅकचा आनंद सोनालीचे केला व्यक्त
आपल्या कमबॅकविषयी सोनाली खरेने सांगितले की, “मला आनंद आहे की, मी पुन्हा एकदा माझ्या आवडत्या टीव्ही क्षेत्रात परतते आहे. स्वयंपाक करणं, कोणत्याही गृहिणीला नवीन नाही आणि मला पहिल्यापासूनच बेकिंगची आवड होती. पण लॉकडाऊनमध्ये मी भरपूर नव्या रेसिपी शिकले. त्यामुळे जणू या शो ची रंगीत तालीमच झाली आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यात मला माझ्या काही पूर्वीच्या सहकलाकारांसोबतही या शो मुळे स्क्रिन शेअर करायला मिळणार आहे, याचा एक वेगळाच आनंद आहे.” या शो बद्दल खासियत सांगताना सोनाली म्हणाली की, “इतर कुकिंगविषयीच्या शोमध्ये फक्त येणारे पाहुणेच रेसिपी दाखवतात. पण इथे मात्र मीही काही पदार्थ बनवणार आहे. योगाभ्यांसामुळे शिकलेल्या काही टिप्स आणि काही किचनटिप्सही मी शेअर करणार आहे. आलेल्या पाहुण्यांसोबत माझ्या कुकिंगविषयीच्या गप्पा रंगणार आहेत. काही फुडरिलेटेड खेळही असतील. जे प्रेक्षकांना नक्कीच मनोरंजक वाटतील असं मला वाटतं. कारण ही संकल्पना वेगळी आहे” दरम्यान ‘न्यू नॉर्मल’मध्ये शो च्या चित्रीकरण करण्याच्या अनुभवाबद्दल सोनालीने आपलं मत व्यक्त केलं, “सतत मास्क घालण्याची सवय नसते. त्यामुळे पूर्णवेळ मास्क घालून या ठिकाणी राहणं हे थोडं दमछाक करवणारं असलं, तरीही आपल्या सुरक्षेसाठी महत्वाचं आहे, असं मला वाटतं. स्वादिष्ट जेवण बनवण्याची पहिली पायरी ही स्वच्छता (hygine) आहे. त्यामुळे सेटवरचं वातावरणं तसंच असतं, याचा मला आनंद आहे.” असंही सोनालीने सांगितलं.
‘रंग माझा वेगळा’ मधील सासू हर्षदा खानविलकरची हटके साडी स्टाईल
सोनालीच्या शो ची संकल्पना वेगळी
केवळ पाहुणेच कुकिंग करणार नसून यामध्ये अनेक फन एलिमेंट्स आणि खेळही असणार आहेत. त्यामुळे या कुकिंग शो ची संकल्पना वेगळी असल्याचे सोनालीने स्पष्ट केले आहे. सोनाली बरेच वर्ष लहान आणि मोठ्या पडद्यापासून दूर असली तरीही सोशल मीडियावर मात्र अॅक्टिव्ह आहे. सोनालीने याअगोदर ‘कॉलेज माझी जान’, ‘गमंतगढ’, ‘आम्ही सारे खवैय्ये’, अशा टेलिव्हिजन शो चे सूत्रसंचालन केले होते. त्यामुळे अशा तऱ्हेचा शो हा तिच्यासाठी नक्कीच नवा नाही. आता सोनालीच्या चाहत्यांना दस-याच्या शुभमुहूर्तापासून तिला टेलिव्हिजनवर पुन्हा पाहण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
तुम्हालाही नक्कीच आवडेल अंकिता लोखंडेचं हे साडी कलेक्शन
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade