मनोरंजन

पुन्हा तनुश्री दत्ताने केले नवे आरोप, या गोष्टी आणल्या समोर

Leenal Gawade  |  Jul 21, 2022
तनुश्री दत्ता

आताच्या या काही वर्षांपासून तनुश्री दत्ता (Tanushree Dutta) कोणाला माहीत नाही असे अजिबात होणार नाही. कारण Me Too प्रकरणानंतर सगळ्या देशवासियांना तनुश्री दत्ता कोण आहे ते माहीत झाली आहे. अभिनयातून तिने जितकी प्रसिद्धी कमावली नाही तितकी प्रसिद्धी तिने या कॉन्ट्रावर्सीमधून कमावली आहे. यात काहीही शंका नाही. आता काही काळ तिच्या नावाचा कुठेही उल्लेख होत नसताना आता पुन्हा एकदा ती नव्याने चर्चेत आली आहे. तिची नवी पोस्ट सध्या चर्चेचा विषय बनली आहे. तनुश्रीला पुन्हा एकदा त्रास दिला जात असून कोणीतरी काहीतरी करा अशी मदत देखील तिने मागितली आहे. आता तिला नेमका कोणाकडून त्रास असेल असा तुम्हाला प्रश्न पडलाच असेल नाही का? तिने या गोष्टींचा खुलासाही एका पोस्टमधून केला आहे. चला जाणून घेऊया तनुश्रीला नेमक्या कोणत्या गोष्टींचा त्रास होत आहे ते .

 तनुश्रीची ती पोस्ट आणि आरोप

तनुश्रीने नुकतीच एक पोस्ट केली आहे.यामध्ये तिने तिचा छळ होत असल्याचे सांगितले आहे. ही पोस्ट भली मोठी असून यात तिने काही राजकारणी व्यक्ती आणि बॉलिवूड माफिया यांचा उल्लेख केला आहे. इतका गंभीर आरोप करत तिने या व्यक्ती आत्महत्या करण्यास प्रवृत्त करत असल्याचे म्हटले आहे. त्यावर तिने मी खंबीर आहे असे सांगून मी आत्महत्या करणार नाही… असे उत्तर देखील दिले आहे. या आधी Me Too  प्रकरणात नाना पाटेकर यांच्यावर आरोप करणारी तनुश्री आता पुन्हा एकदा नवा विषय आणि वाद घेऊन समोर आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

आरोप आहेत फारच गंभीर 

खूप वर्षानंतर तनुश्री परतल्यानंतर तिचे रुप पूर्णपणे पालटले होते. तिने पुन्हा एकदा करिअर करण्याचा विचार केला. तिच्या माहितीनुसार तिला कामाच्या अनेक संधी मिळतही होत्या़. पण तिच्या विरोधात कट रचून तिला पाण्यातून आणि तिच्या औषधातून असे काही स्टेरॉईड देण्यात आले त्यामुळे तिची तब्येत खराब झाली. त्याचा परिणाम तिला काही कामांना स्विकारता आले नाही. इतकेच नाही तर तिने पुढे असे लिहिले आहे की, मे महिन्यात ती उज्जैन येथे गेली असता तिच्या गाडीच्या ब्रेकची छेडछाड करण्यात आली त्यामुळे तिचा अपघात झाला. त्यातून ती सुखरुप बचावली. आता मोठ्या ब्रेकनंतर ती पुन्हा आली आहे. पण महाराष्ट्रातील राजकारणी आणि काही एनजीओज (जिचा तनुश्रीने पर्दाफार्श केला) या तिला जगू देत नाहीत. 

महाराष्ट्रात सगळं हाताबाहेर

तनुश्रीने या सगळ्या गोष्टी इथेच थांबल्या नाहीत. तिच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र सरकार यासाठी असक्षम आहे आणि त्यामुळे येथे राष्ट्रपती राजवट लागू करावी. अनेक गोष्टी हाताबाहेर जाऊ लागल्या आहेत. तनुश्रीच्या या बोलण्यावर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. सध्या महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती पाहता अनेक गोष्टी झाल्या आहेत. त्यामुळे त्या गोष्टींसाठी तर हा कांगावा केला जात नाही ना? किंवा तनुश्रीच्या माध्यमातून वेगळाच विषय बाहेर काढला जात नाही ना? अशी शंकाही नेटीझन्स व्यक्त करत आहेत. 

दरम्यान, 2008 साली तनुश्रीने नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटाच्या शूटींग दरम्यान नाना पाटेकर यांनी या गोष्टी केल्या. ज्याची तक्रार तिने तब्बल 10 वर्षांनी म्हणजे 2018 साली केली.ज्यामुळे Me Too चे वादळ देशभर घोंगावू लागले.

Read More From मनोरंजन