मनोरंजन

लवकरच करण जोहरचा ‘स्टुडंट ऑफ द इयर’ अभिनेता अडकणार लग्नबंधनात

Dipali NaphadeDipali Naphade  |  Sep 22, 2021
aditya-seal-and-anushka-ranjan-to-tie-knot-in-november-2021

गेल्या काही वर्षात इंडस्ट्रीमध्ये अनेक नवीन चेहरे आले ज्यापैकी काही जणांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. करण जोहरच्या (Karan Johar) ‘स्टुडंट ऑफ द इयर’ (Student of the year 2) चित्रपटातून आपली वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता आदित्य सील (Aditya Seal) लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. पुरानी जीन्स, तुम बिन 2, नमस्ते इंग्लंड, इंदी की जवानी यासारखे चित्रपट आणि ओटीटी प्लॅटफॉर्ममधूनही आदित्यने आपला एक वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आहे. गेल्या दोन वर्षांपासून आदित्य आणि अभिनेत्री – मॉडेल अनुष्का रंजन (Anushka Rajan) हिच्याबरोबर आदित्यचे प्रेमाचे नाते आहे अर्थात हे दोघेही एकमेकांना डेट करत आहेत. आता लवकरच अर्थात या नोव्हेंबरमध्ये दोघेही लग्नबंधनात अडकणार असल्याचे समोर आले आहे. 21 नोव्हेंबर रोजी हे दोघेही लग्न करणार असून लग्नाची तयारी सुरू झाली आहे असंही सांगण्यात येत आहे. कोविड परिस्थिती लक्षात घेत सर्व नियम पाळूनच हे लग्न होणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.

अधिक वाचा – Bigg Boss Marathi: पहिल्या भागापासून लक्ष वेधून घेतोय जय दुधाणे

सोशल मीडियावर दोघेही सक्रिय

आदित्य आणि अनुष्का हे गेल्या काही वर्षांपासून एकमेकांचे अत्यंत चांगले मित्र असून आता दोघेही हे नाते पुढे घेऊन जात आहेत. दोघांनीही कधीच आपल्या प्रेमाबद्दल काहीच सांगितलं नसलं तरीही सोशल मीडियावर दोघेही सक्रिय असून नेहमीच आपल्या सोशल अकाऊंटवर एकमेकांसह फोटो पोस्ट करताना दिसून आले आहेत. तसंच एकमेकांना नेहमीच कॉम्प्लिमेंट देतानाही अनेकदा दिसले आहेत. मागच्या वर्षी एका मुलाखतीत आदित्यने सांगितले होते की, दोघांचाही मित्रपरिवार हा कॉमन असून एकमेकांचे खूपच चांगले मित्र आहोत. 

अधिक वाचा – ‘खतरों के खिलाडी 11’ च्या विजेत्याचे नाव झाले लीक, सोशल मीडियावर चर्चा

अनुष्का नेहमीच करते आदित्यची स्तुती

आदित्य गेले काही वर्ष मनोरंजन क्षेत्रात आपले स्थान बळकट करत आहे. तर अनुष्काने नेहमीच त्याला साथ दिली असून सोशल मीडियावरदेखील ती त्याची नेहमीच स्तुती करते. आपल्या सोशल अकाऊंटवरही तिने अनेक फोटो त्याच्याबरोबर शेअर केलेले दिसून येत आहेत. त्यामुळे या दोघांमध्ये मैत्रीपेक्षा नेहमीच काहीतरी जास्त आहे हे त्यांच्या चाहत्यांनी कधीच हेरले होते. तर आता दोघांनाही लग्नासाठी चाहते सोशल मीडियावर शुभेच्छा देत आहेत. अनुष्का आणि आदित्य दोघेही अभिनय क्षेत्रात असून अनुष्काची बहीणदेखील चित्रपटांमधून काम करत आहे. तर अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) च्या या दोघीही अत्यंत जवळच्या मैत्रिणी आहेत. दरम्यान या दोघांचेही कुटुंब अत्यंत आनंदी असून लग्नाच्या तयारीला सुरूवात झाल्याचेही आता सांगण्यात येत आहे. कपड्यांची खरेदी झाली असून आता इतर गोष्टींची तयारी सुरू करण्यात आली असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. हे लग्न अत्यंत धुमधडाक्यात होणार की नाही असा प्रश्न चाहत्यांना असला तरीही कोविडच्या सर्व मर्यादा पाळूनच हे लग्न होणार आहे असंच सध्या सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता नोव्हेंबरपर्यंत चाहत्यांना वाट पाहायला लागणार आहे. मात्र अजूनही आदित्य अथवा अनुष्काच्या सोशल मीडियावरून कोणतीही अधिकृत माहिती मात्र देण्यात आलेली नाही. त्यामुळे ही बातमी खरी आहे की खोटी आहे याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे हे मात्र नक्की!

अधिक वाचा – Bigg Boss मराठी : मीरा जगन्नाथ होऊ पाहतेय का निकी तांबोळी

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From मनोरंजन