वय आणि वेळ धरून ठेवता येत नाही. वयानुसार शरीर आणि सौंदर्यामध्ये बदल होत जातात. सतत चिंता आणि काळजीमुळे तर लोक आजकाल अकाली वयस्कर दिसू लागतात. असं लवकर म्हातारं होण्याची भीती सतावत असेल तर तरूण पणीच स्वतःला चांगल्या सवयी लावायला हव्यात. वय वाढल्यावर आजारपण आणि थकवा नको असेल तर चाळीशी आधीच जीवनशैलीत विषेश बदल करायला हवेत. यासाठीच जाणून घ्या कोणत्या सवयी ठेवतील तुम्हाला दीर्घायुषी आणि चिरतरूण
नियमित व्यायाम करणे –
वाढत्या वयासोबत तुमच्या शरीरातील फॅट वाढू लागते. ज्यामुळे पोट, कंबर, पोटऱ्या, दंड अश ठिकाणी चरबी जमा होते. जर लठ्ठपणाला नियंत्रित ठेवायचे असेल तर नियमित व्यायाम आणि योगासने करायला हवी. कारण त्यामुळे तुमचे शरीर तंदरुस्त आणि मन प्रसन्न राहिल. वय वाढलं तरी तुमच्या प्रसन्न मनामुळे तुम्हाला वयस्कर झाल्यासारखं वाटणार नाही. शिवाय व्यायाम आणि योगामुळे तुमचे शरीर म्हातारपणीदेखील कणखर असेल. निरोगी राहण्यासाठी फिटनेस टीप्स मराठी (Marathi Health Tips For Women)
योग्य आणि संतुलित आहार घेणे –
चिरतरूण दिसण्यासाठी आहाराबाबत कठोर नियम पाळायलाच हवेत. कारण वयानुसार तुमच्या शरीरातील प्र्तिकार शक्ती कमी होत जाते. अशा वेळी तुम्हाला संतुलित आहार घेण्याची सर्वात जास्त गरज असते. म्हणूनच तिशीनंतर जंक फूड, प्रक्रिया केलेले पदार्थ, मसालदार, तेलकट, गोड आणि चमचमीत पदार्थ कमी खा. त्याऐवजी आहारात जास्तीत जास्त फळे, ताज्या भाज्या, सलाडचा समावेश करा. जेवणाची वेळ पाळा आणि मर्यादित आहार घ्या. निरोगी जीवनशैलीचे रहस्य दडले आहे आयुर्वेदात
वजन नियंत्रित ठेवणे –
वाढत्या वयासोबत वाढू लागतात आरोग्य समस्या… चाळीशीनंतर मधुमेह, रक्तदाबाचे अनियंत्रण, बद्धकोष्ठता, ह्रदयरोग हे जीवनशैली विकार बनतात. मात्र जर तुम्ही निरोगी जीवनशैली वेळीच अवलंबली आणि आहार, व्यायाम आणि योगासनांमधून तुमचे वजन नियंत्रित ठेवले तर तुम्हाला हे आजार होण्याचा धोका कमी होतो. मधुमेहावर नियंत्रण मिळविण्यासाठी काही उपाय तुम्ही घरच्या घरी करू शकता.
नियमित हेल्थ चेकअप करणे –
निरोगी राहण्यासाठी प्रत्येकाने दरवर्षी नियमित आरोग्य तपासणी करायला हवी. मात्र तिशीनंतर हा आरोग्य तपासणी करणं बंधनकारक असावं. कारण यातून तु्म्हाला तुमच्या आरोग्याचा आलेख तपासता येतो. यासाठी दरवर्षी वाढदिवशी तुमचे पूर्ण हेल्थ चेकअप करून घ्या. शिवाय चाळीशीनंतर दर दोन वर्षांनी मेमोग्राफी करा. लक्षा ठेवा ही एक साधीशी सवय तुम्हाला आजारांपासून दूर ठेवू शकते.
व्यसनांपासून दूर राहणे –
आजकालच्या आधूनिक जीवनशैलीत कामाचा ताण, चिंता, काळजी दूर करण्यासाठी अथवा स्टाईल म्हणून धुम्रपान आणि मद्यपानाची सवय सहज लागलेली दिसते. मात्र लक्षात ठेवा या सवयीमुळे तुमचे आयु्ष्य काही वर्षांनी कमी होऊ शकते. शिवाय जर तुम्हाला चाळीशीनंतर तरूण आणि उत्साही राहायचं असेल तर या व्यसनापासून शक्य तितकं दूर राहण्याचा प्रयत्न करा. आनंदी जीवन जगण्यासाठी या ’10’ गोष्टी अवश्य करा