वजन कमी करण्यासाठी डाएट, वर्कआऊट असं सगळं काही करण्याचा आटोकाट प्रयत्न आपण करतो. पण कधी कधी या गोष्टी नीट फॉलो केल्या जात नाही. मग वजन कमी होणे किंवा चांगली फिगर मिळणे सगळे काही अगदी दूर दूर पर्यंत शक्य होत नाही. आता जर तुम्हाला मी सांगितलं की, घरबसल्या हा झुंबा प्रकार तुमचे वजन कमी करु शकेल यावर तुमचा विश्वास बसेल का? नाही ना. पण विश्वास ठेवा हा झुंबा प्रकार सध्या चांगलाच गाजत असून यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत होते. विशेष म्हणजे घरीच अगदी कशाचाही उपयोग न करता तुम्ही हा झुंबा करु शकता.
पुढच्या 21 दिवसात न कंटाळता हे केलेत तर हमखास मिळेल सुडौल फिगर
एरोबिक झुंबा
shutterstock
झुंबामध्ये तसे बरेच प्रकार आहेत. म्हणजे बॉलीवूड डान्सपासून ते तुम्हाला वेस्टर्न डान्सपर्यंत अनेक प्रकार या झुंबामध्ये दिसतील. पण एरोबिक झुंबा हा प्रकार त्यामध्ये सगळ्यात जास्त प्रचलित आहे कारण यामध्ये तुम्हाला गोंधळ उडणाऱ्या स्टेप्स नसतात. तर तुम्हाला समजतील अशा स्टेप्स असतात. आता डान्स असतो असे नाही तर यामध्ये तुमच्या कंबरेचा, हाताचा, पोटाचा, पायाचा संपूर्ण व्यायाम होतो. एकदा का तुम्ही एरोबिक झुंबा सुरु केला की, तो कमीत कमी 15 मिनिटांचा असतो आणि जास्तीत जास्त 55 मिनिटांचा असतो.
अशी करा सुरुवात
आता कोणतीही नवी गोष्ट सुरु करताना काही पूर्वतयारी असते. पण एरोबिक झुंबामध्ये तुम्हाला विशेष काही करावे लागत नाही. फक्त मस्त कपडे घालून तयार व्हा. तुमचे शरीर व्यायामाचे नसेल तर तुम्ही अगदी 15 मिनिटांपासून व्यायामाला सुरुवात करा. त्यामुळे तुम्हाला अचानक थकवा जाणवणार नाही. हा डान्स केल्यानंतर तुम्हाला फ्रेश वाटणार हे 100 टक्के खरे. शिवाय तुम्हाला कधीही न येणारा घाम आलेला दिसेल.
परफेक्ट फिगरसाठी करा ‘हा’ परफेक्ट डाएट आणि पाहा तुमच्यातील बदल (Weight Loss Diet Plan In Marathi)
दिवसातून एकदा करा झुंबा आणि मग बघा कमाल
आता दिवसातून अशी वेळ निवडा. ज्यावेळी तुम्ही थोडे निवांत असता. फोन तुमच्या हातात नसतो आणि तुम्ही खूप खाल्लेले नसते. म्हणजे जड पोटाने तुम्हाला मनासारखे नाचता येणार नाही. उगाचच हलायचे म्हणून हा झुंबा करुन काहीच उपयोग नाही बरं का! त्यामुळे सकाळी किंवा संध्याकाळी छान वेळ निवडा. टीव्ही किंवा लॅपटॉपवर हा व्हिडिओ लावा आणि सुरु करा तुमचा झुंबा. प्रत्येकवेळी वेगवेगळा झुंबा करायला विसरु नका. एकच झुंबा सतत करु नका.
डाएटचीही नाही गरज
shutterstock
आता खूप जणांना प्रश्न पडतो की, अरे मग या डान्स प्रकारात डाएट करायचे की नाही. तर याचे उत्तर आहे नाही. तुम्ही अगदी मनापासून आणि दाखवला आहे तसा करा. डाएटची गरज नाही म्हणून तुम्ही कसेही खाऊ नका.तुम्हाला आवडीचा पदार्थ मोजून मापून खा. म्हणजे यामध्ये तुम्हाला कसले निर्बंध नाही. पण तरीही तुम्ही सगळं खाताना वेळा पाळून खा म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही.
असा दिसेल बदल
एरोबिक झुंबा प्रकारामध्ये तुम्हाला पटकन बदल झालेला दिसत नाही. म्हणजे तुम्हाला थोडे हलके वाटते. पण सगळ्यात आधी तुमच्या शरीराचा थुलथुलीपणा कमी होतो. तुमचे पोट आणि कंबर कमी होते. जसजसा तुम्ही या डान्समध्ये बदल कराल तसा तसा तुम्हाला तुमच्यामध्ये झालेला बदल जाणवेल.
आम्ही तुमच्यासोबत या एरोबिक झुंबाचे व्हिडिओ शेअर केले आहेत. मग आजपासूनच करा तुमच्या या बदलाला सुरुवात
2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.