आरोग्य

अॅंटिबॉयोटिक्सज घेत असाल तर आहारात करा असे बदल

Trupti Paradkar  |  Aug 17, 2021
after antibiotics add these food in your diet

ताप अथवा इतर कोणतेही इनफेक्शन झालं तर डॉक्टर अॅंटि बायोटिक्स घेण्याचा सल्ला देतात. कोविड इनफेक्शनवरदेखील हाच प्राथमिक उपचार केला जातो. कारण अॅंटि बायोटिक्समुळे तुमचे इनफेक्शन कमी होते आणि तुम्हाला लवकर बरे वाटू लागते. मात्र आजारी पडल्यावर अॅंटि बायोटिक्स घेतल्यामुळे तुमच्या शरीरावरही थोडा दुष्परिणाम होतो. जसं की अॅंटि बायोटिक्स तुमच्या आतड्यांमधील पोषक जिवाणूदेखील नष्ट करतात. या जिवाणूंमुळे तुम्ही खाल्लेल्या अन्नाचे पचन होत असते. मात्र अॅंटि बायोटिक्सचा हा दुष्परिणाम झाल्यामुळे तुमच्या पचन शक्तीवर वाईट परिणाम होतो. ज्यासाठी तुम्हाला त्यानुसार आहारात काही बदल करणं गरजेचं आहे.

अॅंटि बायोटिक्समुळे काय होतो शरीरावर परिणाम

 antibiotics

कोणतेही संक्रमण झाल्यावर तुमची प्रतिकार शक्ती कमी होते. यासाठी अॅंटि बायोटिक्स घेणं गरजेचं असत. कारण ते खूप प्रभावी असतात आणि त्यामुळे इनफेक्शन जास्त पसरत नाही. मात्र अॅंटि बायोटिक्स घेतल्यामुळे तुमच्या पोटातील चांगले जिवाणू नष्ट होतात. ज्याचा तुमच्या शरीरावर लगेच परिणाम दिसू लागतो. अॅंटि बायोटिक्स घेतल्यावर तुम्हाला बद्धकोष्ठता, उलटी, मळमळ, पोटाच्या समस्या जाणवतात. कधी कधी यामुळे तुम्हाला जुलाबही होतात. हे दुष्परिणाम टाळण्यासाठीच डॉक्टर तुम्हाला जेवणानंतर औषधे घेण्याचा सल्ला देतात. कारण उपाशी पोटी ही औषधे सहन होत नाहीत. 

अॅंटिबायोटिक्स घेतल्यावर कसा असावा आहार

अॅंटि बायोटिक्स घेतल्यावर तुमच्या शरीरातील पोषक जीवजंतूही नष्ट होतात. यासाठी तुमच्या आहारात त्यानुसार काही आवश्यक बदल ककरायला हवेत. ज्यामुळे तुमच्या शरीराचे नुकसान होणार नाही. जर तुम्ही आहारातून पुरेशी प्रोबायोटिक्स घेतले तर तुमच्या शरीरात पुन्हा चांगले जिवाणू तयार होतात. ज्यामुळे पोटाच्या समस्या आणि दुष्परिणाम होण्याचा धोका टाळता येतो. प्रोबायोटिक्स तुम्हाला अनेक भारतीय खाद्यपदार्थातून मिळू शकतात. जसं की, दही, चीज, ताक, इडली असे पदार्थ खाण्यामुळे तुमच्या शरीराला पुरेसे प्रोबायोटिक्स मिळतात. याशिवाय बाजारात तयार पेय मिळतात ज्यामध्ये प्रोबायोटिक्स भरपूर असतात. त्याचप्रमाणे रोग प्रतिकार शक्ती वाढवणारा आहार या काळात आवर्जून घ्यायला हवा. या  सर्व पदार्थांचा तुम्ही आहारात समावेश करून तुमच्या आरोग्याची काळजी घेऊ शकता. प्रतिकार शक्ती वाढवणारे पदार्थ घेण्यामुळे तुम्हाला आजारपणातून बरे होण्यास मदत मिळेल. शिवाय आहारात प्रोबायोटिक्स वाढवण्यामुळे तुमच्या शरीराची झीज होणार नाही.

दहीभात खाण्याचे फायदे आणि झटपट रेसिपी

कोरोना झाल्यावर किती दिवस असतात शरीरात अॅंटि बॉडी

प्रतिकार शक्ती कमी आहे हे ओळखण्याची लक्षणे (Signs Of A Weak Immune System In Marathi)

Read More From आरोग्य