मनोरंजन

अग्गंबाई सासुबाई मालिकेत साजरी होणार शुभ्राची पहिली संक्रांत

Trupti Paradkar  |  Jan 13, 2020
अग्गंबाई सासुबाई मालिकेत साजरी होणार शुभ्राची पहिली संक्रांत

‘अग्गंबाई सासूबाई’ ही मालिका सध्या फारच गाजत आहे. नेहमीच मालिकांमध्ये सासू आणि सुनेचं नातं हे टोकाचं दाखवलं जातं. मात्र या मालिकेचं नाविन्य, त्याची आगळी-वेगळी कथा, निवेदिता सराफ-गिरीश ओक यांची जोडी, या सगळ्यामुळे मालिकेने कमी कालावधीतच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला सुरुवात केली आहे.या मालिके तेजश्रीची शुभ्रा ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडत आहे. जशास तसं वागणारी आणि वेळ प्रसंगी आपल्या सासूबाईंच्या मागे खंबीरपणे उभी राहणारी शुभ्रा ही प्रेक्षकांच्या घरातीलच एक व्यक्ती बनली आहे. अभिनेत्री तेजश्री प्रधान हिनं ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर कमबॅक केला आणि पाहता पाहता प्रेक्षकांनी या मालिकेला डोक्यावर उचलून धरलं. नवीन वर्षाची सुरूवात मकर संक्रांतीच्या सणापासून होते. या मालिकेतूनही आता प्रेक्षकांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा (makar sankranti marathi wishes) देण्यात येणार आहेत. शुभ्रा आणि सोहमची ही लग्नानंतरची पहिलीच संक्रांत आहे. शुभ्रा आसावरीची लाडकी आहे. त्यांचं नातं सासू-सुनांपेक्षा आईमुलीप्रमाणे आहे. त्यामुळे आसावरी शुभ्राचे सगळे लाड पुरवणार आहे. सहाजिकच मालिकेत कुलकर्णी कुटुंब हा सण अगदी दणक्यात साजरा करणार आहेत. पहिली संक्रात साजरी करण्यासाठी शुभ्रा हलव्याचे दागिने घालून नटणार आहे. काळी साडी आणि हलव्याच्या दागिन्यांमुळे तेजश्रीचं सौंदर्य नक्कीच खुलून आलं आहे.

काय असणार मकरसंक्रात स्पेशल भागात –

अग्गंबाई सासूबाई  मालिकेच मकरसंक्रांती निमित्त घरातील सर्व मिळून पतंग देखील उडवणार आहेत. ज्यामुळे या मालिकेवर प्रेम करणाऱ्या चाहत्यांसाठी यंदाची मकरसंक्रांत खास ठरणार आहे. आम्ही तुमच्यासोबत या मालिकेच्या मकर संक्रांत भागाचे काही खास फोटो शेअर करत आहोत.  

या मालिकेचं वेगळेपण

मालिकांमध्ये नेहमीच सासू आणि सुनेचं नातं हे टोकाचं दाखवलं जातं. पण खऱ्या आयुष्यात नक्कीच सासूला समजून घेणाऱ्या सुनाही असतात. घर म्हटलं की भांड्याला भांडं लागणारचं. पण प्रत्येक घरात भांडण असतंच असं नाही. या मालिकेत आपल्या सासूला जपणारी, तिचं मन समजून घेणारी सून दाखवली आहे. जी सध्या सर्व प्रेक्षकांना आवडत आहे. तसंच सतत भांडण आणि कुरघोड्या बघण्यापेक्षा असं काहीतरी वेगळं पाहणं हे प्रेक्षकांना अधिक भावत आहे. त्यामुळे ही मालिका सध्या गाजत आहे.  त्यातही सासूला समजून घेणारी आणि समंजस सून दाखवल्याने प्रेक्षकांना ही मालिका आवडत आहे. यामध्ये निवेदिता सराफ आणि तेजश्री प्रधान या दोघींनीही अप्रतिम काम केलं असून गिरीश ओकची या मालिकेत प्रमूख भूमिका आहे. मालिका तेव्हाच प्रेक्षकांच्या मनाला भिडते जेव्हा त्याची संकल्पना नवीन असते. अग्गंबाई सासूबाई ही मालिका सासूच्या पुर्नलग्नाची आहे. इतकी वर्ष मनाने एकटी झालेल्या सासूच्या आयुष्यात एक नवीन आशा घेऊन येण्याचं काम चक्क सूनबाई करत आहे. त्यामुळे या मालिकेत सासू-सुनेमधील हेवेदावे दाखवेलं नाहीत. सासूबाईंना दुसऱ्या लग्नासाठी तयार करणारी एक सूनबाई पाहताना प्रेक्षकांना नक्कीच वेगळेपण जाणवत आहे. त्यामुळे सहाजिकच या मालिकेवर आणि त्यातील पात्रांवर प्रेक्षकांचं विशेष प्रेम आहे. 

हे ही वाचा –

अधिक वाचा –

मकरसंक्रांतीला संपूर्ण भारतात करण्यात येणारे ‘15’पदार्थ

मकर संक्रांत नक्की का साजरी करतात, जाणून घ्या अथपासून इतिपर्यंत

म्हणून मकर संक्रांतीला असतं तिळाचं महत्त्व

Read More From मनोरंजन