मनोरंजन

ग्लोबल खान्देश महोत्सवामध्ये घुमला आहिराणी गाण्याचा आवाज

Dipali Naphade  |  May 3, 2022
ahirani-song-in-movie-marathi-paul-padate-pudhe-in-marathi

खान्देशी संस्कृती आणि व्यापार उद्योगाच्या नव्या संधी उपलब्ध करून देणारे एकमेव व्यासपीठ “ग्लोबल खान्देश महोत्सव” (Global Khandesh Mahotsav). हा महोत्सव यंदा कल्याण येथे पार पडला. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधत “मराठी पाऊल पडते पुढे” (Marathi Paul Padte Pudhe) या चिराग पाटील (Chirag Patil) आणि सिद्धी पाटणेच्या (Siddhi Patane) आगामी सिनेमाचे आहिराणी (Ahirani) भाषेतील गाणे “हाऊ पोऱ्या अनेर काठणा” हे या कार्यक्रमात लॉंच करण्यात आले. या गाण्याचे संगीत इतके अनोखे आहे की जमलेल्या सर्व लोकांना त्यावर ताल धरायचा मोह आवरला नाही.

मराठी अस्मिता जोपासणारे गाणे 

हे गाणे मुख्यत्वे चिराग पाटीलवर चित्रित झाले असून त्यावेळी कार्यक्रमस्थळी चिराग आणि सिद्धीनेदेखील गाण्यावर ठेका धरला आणि वातावरणात एक वेगळाच उत्साह आला. या गाण्याचे गीतकार आणि गायक  “जळगाव भूषण पुरस्कार” विजेते प्रवीण माळी या ठिकाणी उपस्थित होते. चित्रपटाच्या संपूर्ण टीमने म्हणजेच कलाकार चिराग पाटील आणि सिद्धी पाटणे सहित दिग्दर्शक, निर्माते, संगीत दिग्दर्शक साऱ्यांनीच भगवे फेटे परिधान करत महाराष्ट्र दिनानिमित्त मराठी अस्मिता जोपासली. भगव्या फेट्या मधील ही मराठी पाऊले जशी जशी प्रेक्षकांसमोर रंगमंचावर पोहचली तेव्हापासून टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला तो कार्यक्रमाची सांगता होईपर्यंत!

या प्रसंगी अभिनेता चिराग पाटीलने सांगितले की, “आमचा आगामी सिनेमा “मराठी पाऊल पडते पुढे” मध्ये आम्ही मराठी तरुणांनी उद्योगक्षेत्रात यावे हे सांगत आहोत आणि असा संदेश देण्यासाठी ग्लोबल खान्देश महोत्सव यासारखे उत्तम व्यासपीठ दुसरे असूच शकत नाही. मी पहिल्यांदाच आहिराणी गाणे केले असल्यामुळे एक वेगळाच अनुभव मला मिळाला. गायक प्रवीण माळी यांच्या दमदार आवाजात गायलेले हे अहिराणी गाणे संपूर्ण महाराष्ट्राला आवडेल याची मला खात्री आहे.” या दरम्यान गीतकार गायक प्रवीण माळी (Pravin Mali) यांनी स्वतः त्यांच्या भारदस्त आवाजात लॉन्च झालेले गाणे सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली.

चिरागचा वेगळा चित्रपट

शिवलाईन इन्कम ग्रोथ प्रा.लि. निर्मित मराठी पाऊल पडते पुढे सिनेमाचे सहनिर्माते चंद्रकांत विसपुते असून संगीत दिग्दर्शक समीर खोले यांनी सिनेमाची सर्व गाणी संगीतबद्ध केली आहेत. बाविस्कर ग्रुप, नवी मुंबई यांचे प्रमुख सहकार्य या चित्रपटाला लाभले आहे. स्वप्नील मयेकर दिग्दर्शित तसेच अभिनेता चिराग पाटील आणि अभिनेत्री सिद्धी पाटणे, जेष्ठ अभिनेते अनंत जोग, सतीश पुळेकर, अभिनेते सतीश सलागरे आणि संजय कुलकर्णी या सर्वांच्या प्रमुख भूमिका असलेला चित्रपट “मराठी पाऊल पडते पुढे” हा एका धडाडी तरुण उद्योजकाची कथा आहे. या सिनेमाचे संगीत लेबल झी म्युझिक कंपनी असून पोस्ट प्रोडक्शन प्रोसेसिंग चे काम यूएफओ तर्फे झाले आहे. ऍक्शन, इमोशन्स आणि दर्जेदार डायलॉग्ज असलेला चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसंच चिरागने आतापर्यंत वेगवेगळे चित्रपट आणि वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे या चित्रपटाकडूनही प्रेक्षकांच्या आता अपेक्षा वाढल्या आहेत. चिरागलाही या चित्रपटाकडून खूपच अपेक्षा आहेत. लवकरच हा चित्रपट येणार आहे प्रेक्षकांच्या भेटीला. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From मनोरंजन