मनोरंजन

‘तू सौभाग्यवती हो’ मध्ये 1 जूनपासून दिसणार ऐश्वर्या आणि सूर्यभानचा विवाह सोहळा

Dipali Naphade  |  May 26, 2021
‘तू सौभाग्यवती हो’ मध्ये 1 जूनपासून दिसणार ऐश्वर्या आणि सूर्यभानचा विवाह सोहळा

काही मालिका या कमी वेळातच प्रेक्षकांच्या मनाची पकड घेतात. सध्या सुरू असणारी सोनी मराठी वाहिनीवरील मालिका ‘तू सौभाग्यवती हो’ थोड्याच काळात प्रेक्षकांना आवडू लागली आहे. गावातली ऐश्वर्या आणि त्याच गावचं प्रस्थ असलेला सूर्यभान यांची ही गोष्ट आहे. ऐश्वर्या  जाधवांची सून कशी होणार आहे आणि त्यापुढे कायकाय घडणार आहे, याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. खूपच कमी वेळात या मालिकेतील कलाकारांच्या अभिनयामुळे आणि वेगळ्या विषयामुळे ही मालिका घराघरात पोहचली आहे. या मालिकेमध्ये एक नवीन, बोलक्या डोळ्यांचा आणि ताजा चेहरा प्रेक्षकांना पाहायला मिळतो आहे आणि तो आहे दीक्षा केतकर या अभिनेत्रीचा. दीक्षाची ही पहिलीच मालिका आहे. दीक्षाबरोबरच या मालिकेमध्ये हरीश दुधाडे, स्वप्नाली पाटील, ज्योती चांदेकर, रोहित फाळके, गुरु दिवेकर आणि प्रिया करमरकर हे कलाकारही आहेत.

बॅकग्राऊंड डान्सर्सच्या मदतीसाठी अक्षय कुमार आला पुढे, 3600 डान्सर्संना पुरवणार भोजन

ऐश्वर्या आणि सूर्यभान यांच्या लग्नाला बायजींचा पुढाकार

तीर्थयात्रेला गेलेल्या बायजी घरात परत येतात आणि त्यांच्या गैरहजेरीत झालेल्या सर्व गोष्टी त्यांना कळतात. सूर्यभानवर चित्राचा वाढता प्रभाव आणि एकूण परिस्थिती पाहता आपल्यानंतर या घराची आणि सूर्यभानची काळजी घेणारी कोणीतरी घरात यावी, असं बायजींना वाटू लागलं आहे. दरम्यान घरातच राहणारी चुणचुणीत अल्लड पण तेवढीच समंजस असलेल्या ऐश्वर्याकडे त्यांचं लक्ष जातं. गावकऱ्यांच्या रोषापासून वाचवून सूर्यभान तिला घरात आसरा देतो आणि अनेक वर्षं तिचं कुटुंब जाधवांसाठी काम करत असतं. आता बायजींच्या पुढाकारानी ऐश्वर्या आणि सूर्यभान यांचा शुभविवाह संपन्न होणार आहे. सूर्यभानचं आधीच एक लग्न झालेलं असून त्याच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. ऐश्वर्याचं लग्न ठरलेलं होतं, पण लग्नाच्या आधीच तिच्या होणाऱ्या पतीचा गोळी लागून मृत्यू होतो आणि नियती या दोघांना समोरासमोर आणून उभं करते. त्यामुळे आता बायजी या दोघांच्या लग्नाला पुढाकार घेत असल्याचं दिसून येत आहे. तर प्रेक्षकांना त्यांचा हा विवाहसोहळा 1 जूनपासून पाहायला मिळणार आहे. 

तमाशा रंगभूमीची शान कांताबाई सातारकर यांचे निधन

दीक्षा केतकरची पहिलीच मालिका

या मालिकेत दीक्षा खूप निरागस आणि हसरी दिसते आहे. या नव्या चेहऱ्याला पाहण्यासाठी  प्रेक्षक  उत्सुक होते. वयानी खूप मोठ्या असणाऱ्या व्यक्तीबरोबर ऐश्वर्या का लग्न करते आणि जाधव घराण्याची सून कशी  होते, हे  पाहणं खूप उत्सुकतेचं असणार आहे. बऱ्याच वर्षांनी ज्योती चांदेकर यांनाही मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. दीक्षाने याआधी सेफ जेरनी, धूसर यामधून काम केले आहे.  मात्र बऱ्याच मराठी कलाकारांना खरी ओळख मिळते ती मालिकांमधून. पहिल्याच मालिकेत इतके तगडे कलाकार असल्यानंतर नक्कीच ही मालिका दीक्षासाठी खास ठरते आहे. दीक्षाचा आत्मविश्वास या मालिकेतून दिसून येतो. दीक्षा ही अभिनेता शशांक केतकर याची बहीण आहे. मात्र लवकरच तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे हे नक्की. सूर्यभान आणि ऐश्वर्या यांचं आता नक्की पुढे काय होणार आणि हे लग्न कसं होणार याकडेच प्रेक्षक डोळे लावून बसले आहेत. तसंच आता ही गोष्ट कोणत्या वळणार येणार याचीही सर्वांना उत्सुकता आहे. 

पकडला जाणार देवी सिंग, ‘देवमाणूस’ मालिकेला रंजक वळण

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From मनोरंजन