तुम्हा सर्वांना अजयने साकारलेला विजय साळगांवकर आठवत असेलच ना. दहावी फेल असलेल्या केबल टिव्हीचा व्यवसाय करणाऱ्या विजयने मुलीच्या आणि कुटुंबाच्या रक्षणासाठी पोलीस ऑफिसर मीरा देशमुखला घाम आणला होता. आता लवकरच या चित्रपटाची पुढील आण नवीन कहाणी प्रेक्षकांसमोर येणार आहे. होय, दृश्यमचा सीक्वल (Drishyam 2) लवकरच प्रदर्शित होणार आहे. अभिषेक पाठकच या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. त्यामुळे चाहत्यांना या रहस्यमयी आणि थ्रीलर चित्रपटाच्या सीक्वलचे वेध लागले आहेत. दृष्यमचा पुढचा भाग याच वर्षी 18 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा हटके विषय आणि रहस्यमयी मांडणी मागच्या वेळी प्रेक्षकांना खूपच भावली होती. त्यामुळे चित्रपटात आता पुढे काय रंजक वातावरण निर्माण होतंय, अथवा पुढे एखादं वेगळं कथानक पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत.
अजयने अशी केली चित्रपटाची घोषणा
अजय देवगणने स्वतः सोशल मीडियावर या चित्रपटाची खास अंदाजमध्ये घोषणा केली आहे. त्याने जाहीर केलं आहे की लवकरच म्हणजे 18 ऑक्टोबरला दृष्यम 2 चित्रपटगृहात प्रदर्शित केला जाणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात अजयसोबत तब्बू, अक्षय खन्ना, श्रिया सरन, रजत कपूर आणि इशिता दत्ता मुख्य भूमिकेत असणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आताच दृष्यम 2 च्या टीमने हैदराबादमध्ये शूटिंग पूर्ण केलं असून चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी आता सज्ज झाला आहे.
काय असेल पुढील कथानक
अभिषेक पाठकने 2015 साली क्राइम थ्रिलर दृश्यम दिग्दर्शित केला होता. चित्रपट पाहिल्यावर अनेकांना विषय खूपच भावला. कारण यात एका कमी शिकलेल्या माणसाने कसं चतुराईने त्याच्या कुटुंबाला वाचवलं आणि न्याय मिळवून दिला हे दाखवलं होतं. चित्रपट पाहताना प्रत्येक दृष्य रहस्यमयी आणि उत्सुकता वाढवणारं दाखण्यात आलं होतं. दृश्यम साऊथचा अभिनेता मोहनलाल याच्या दृश्यम चित्रपटाचा रिमेक होता. त्यानंतर मल्याळम भाषेत या चित्रपटाचा सीक्वल मागच्या वर्षी फेब्रुवारीत प्रदर्शित झाला. या चित्रपटाची कथा चार लोकांच्या कुटुंबावर आधारित होती. कुटुंबातील मोठ्या मुलीबरोबर झालेल्या एका घटनेमुळे या कथानकाला एक रंजक वळण मिळालं होतं. आता हिंदीमधील दृष्यमचा सीक्वल प्रदर्शित होण्याच्या वाटेवर आहे. त्यामुळे पुढील कथानक कसं असेल याची उत्सुकता चाहत्यांमध्ये वाढली आहे.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक
Read More From बॉलीवूड
फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यावरील बायोपिक ‘सॅम बहादूर’च्या चित्रीकरणास सुरुवात
Vaidehi Raje