बॉलीवूड

अक्षय कुमारच्या ‘पृथ्वीराज’वर ओमिक्रॉनचं संकट, या महिन्यात नाही होणार प्रदर्शित

Trupti Paradkar  |  Jan 5, 2022
अक्षय कुमारच्या ‘पृथ्वीराज’वर ओमिक्रॉनचं संकट, या महिन्यात नाही होणार प्रदर्शित

अक्षय कुमार आणि मानुषी छिल्लर ही जोडी पहिल्यांदाच पृथ्वीराज चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. सहाजिकच सध्या या ऐतिहासिक पिरिएड ड्रामाची चर्चा सगळीकडे सुरू आहे. या महिन्यात 22 जानेवारी 2022 ला पृथ्वीराज प्रदर्शित होणार होता. चाहते या चित्रपटाची आतूरतेने वाट पाहत होते. मात्र देशात पुन्हा एकदा कोरोनाचे संकट वाढू लागले आहे. त्यामुळे या कोरोनाच्या संकटाचा फटका अक्षयच्या बिगबजेट चित्रपट पृथ्वीराजलाही पडला आहे.

‘पृथ्वीराज’ची रिलीज डेट झाली स्थगित

कोरोनाचा नवा वेरियंट ओमिक्रॉनचं इनफेक्शन सध्या मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. अचानक सक्रिय झालेल्या या कोरोनामुळे पुन्हा एकदा कोविडपासून सुरक्षित नियम फॉलो करण्याची गरज निर्माण झाली आहे. म्हणूनच सध्या अनेक चित्रपटांचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं आहे. सात जानेवारीला प्रदर्शित होणारा एस एस राजमौलीचा आरआरआरची रिलीज डेट पोस्टपोर्न करण्यात आली आहेच. शिवाय आता पोस्टपोर्न केल्या जाणाऱ्या चित्रपटांमध्ये अक्षयच्या बिग बजेट पृथ्वीराजचाही समावेश करण्यात आला आहे.

‘पृथ्वीराज’चा टीझर होतोय व्हायरल

काही दिवसांपूर्वीच पृथ्वीराजचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता.या धमाकेदार टीझरला पाहतात लोकांना चित्रपटाविषयी अधिक उत्सुकता वाटू लागली. पृथ्वीराजचा एक मिनीट बाविस सेंकदाचा टीझर पाहता पाहता व्हायरल झाला. ज्यामध्ये अक्षय कुमार सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या भूमिकेत दिसला होता. अक्षयचा या चित्रपटातील लुक चाहत्यांना खूपच आवडला होता.अक्षय बऱ्याचदा विनोदी भूमिका उत्तम वठवतो. त्यामुळे पृथ्वीराज चौहानसारथी ऐतिहासिक आणि गंभीर विषय असलेली भूमिका करताना त्याला पाहणे नक्कीच विशेष असणार आहे. पृथ्वीराज चौहान एक महान यौद्धा होते त्यामुळे अक्षयला ही भूमिका साकारणं एखाद्या आव्हानापेक्षा नक्कीच कमी नसेल.  शिवाय यात तो पहिल्यांदा मानुषी छिल्लरसोबत एकत्र काम करत आहे.  या चित्रपटात संजय दत्त आणि सोनू सूद यांच्या मुख्य भूमिकादेखील आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी केलं आहे. या पूर्वी त्यांनी पिंजर चित्रपट आणि टीव्हीवरील चाणक्य मालिका दिग्दर्शित केली होती. 

Read More From बॉलीवूड