देशभक्ती, कॉमेडी, सोशल ड्रामा, हॉरर ड्रामा अशा अनेक राजकीय, सामाजिक विषयांवरील चित्रपट केल्यानंतर अक्षय कुमार आता त्याच्या फिल्मी कारकिर्दीतील पहिला ऐतिहासिक चित्रपट घेऊन येण्यास सज्ज झाला आहे. आता अक्षय त्याच्या आगामी पीरियड ड्रामा पृथ्वीराजमध्ये दिसणार आहे. यशराज फिल्म्स निर्मित ‘पृथ्वीराज’ या ऐतिहासिक चित्रपटात अक्षय कुमार बरोबर, विश्वसुंदरी मानुषी छिल्लर, सोनू सूद आणि संजय दत्त हे देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. डॉ चंद्रप्रकाश द्विवेदी दिग्दर्शित ‘पृथ्वीराज’ या चित्रपटाचा टीझर आधीच प्रदर्शित झाला आहे ज्यामध्ये चित्रपटातील महत्त्वाच्या पात्रांची ओळख करून देण्यात आली आहे. आणि आता प्रेक्षक या चित्रपटाच्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत आहेत.
9 मे रोजी लाँच होणार ट्रेलर
अक्षय कुमार, मानुषी छिल्लर, सोनू सूद आणि संजय दत्त स्टारर पृथ्वीराज या चित्रपटाच्या ट्रेलर आता लवकरच लाँच होणार आहे. चंद्रप्रकाश द्विवेदी दिग्दर्शित हा चित्रपट यावर्षी 3 जून रोजी मोठ्या पडद्यावर दाखल होणार आहे. आता या चित्रपटाबाबत माहिती समोर आली आहे की, ‘पृथ्वीराज’ची संपूर्ण टीम 9 मे रोजी चित्रपटाचा ट्रेलर मोठ्या दिमाखात लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. स्रोतांच्या माहितीनुसार मुंबईतील यशराज स्टुडिओमध्ये मीडियाच्या उपस्थितीत ट्रेलर मोठ्या धूमधडाक्यात लॉन्च केला जाईल. यानंतर होणाऱ्या ट्रेलरच्या डिजिटल लॉन्चची तयारी देखील सुरू आहे. या विशेष कार्यक्रमाला अक्षय, मानुषी आणि चंद्रप्रकाश द्विवेदी उपस्थित राहणार आहेत.
चित्रपटातून मांडला जाईल सम्राट पृथ्वीराज चौहान यांचा गौरवशाली इतिहास
पृथ्वीराज हा प्रत्येकाच्या हृदयाच्या जवळ असलेला चित्रपट आहे. याचे एक कारण म्हणजे या चित्रपटाच्या माध्यमातून सम्राट पृथ्वीराज चौहान यांचा गौरवशाली इतिहास मांडला जाणार आहे. निर्माते या चित्रपटाद्वारे सम्राट पृथ्वीराज चौहान यांचा गौरव करत आहेत. हा चित्रपट अनेक वर्षांच्या संशोधनावर आधारित आहे. यशराज फिल्म्सची संपूर्ण टीम प्रेक्षकांसमोर हा पीरियड ड्रामा सादर करण्यासाठी उत्सुक आहे. या चित्रपटाचे ऍक्शन पॅक्ड ट्रेलर 2 मिनिटे 57 सेकंदाचे असेल आणि त्यात या भव्यदिव्य चित्रपटातील थरारक दृश्यांची झलक बघायला मिळेल.
‘जयेशभाई जोरदार’ बरोबर दाखवले जाणार ट्रेलर
‘पृथ्वीराज’ ट्रेलरचे थिएट्रिकल रिलीज रणवीर सिंगच्या ‘जयेशभाई जोरदार’ बरोबर केले जाणार आहे. हा ट्रेलर मोठ्या पडद्यावर बघून प्रेक्षकांच्या मनात नक्कीच चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण होईल आणि प्रेक्षक हा चित्रपट बघण्यासाठी चित्रपटगृहांत गर्दी करतील. निर्मात्यांनी ठरवले आहे की जेव्हा प्रेक्षक जयेशभाई जोरदार पाहण्यासाठी सिनेमागृहात जातील, तेव्हा त्यांना मोठ्या स्क्रीनवर पृथ्वीराजची एक झलक पाहायला मिळेल. या भव्य ट्रेलर लाँच बरोबर ‘पृथ्वीराज’च्या मार्केटिंग मोहिमेची सुरुवात होईल जी 24 दिवस चालेल. या मोहिमेचा एक भाग म्हणून, संपूर्ण टीम चित्रपटाच्या प्रमोशनसाठी विविध शहरांमध्ये फिरणार असून चित्रपटाचे म्युझिक देखील एका इव्हेन्टमध्ये लाँच होणार आहे.
अक्षयकडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा
‘पृथ्वीराज’ हा या वर्षातील सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक असल्याचे मानले जात आहे. यासोबतच हा अक्षय कुमारचा आतापर्यंतचा सर्वात मोठा बिग बजेट चित्रपट असेल. 2021 च्या उत्तरार्धात पृथ्वीराजचा टीझर रिलीज झाला होता. आणि त्यानंतर हा चित्रपट 21 जानेवारी 2022 ला रिलीज होणार होता पण कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलावे लागले. पृथ्वीराज’ व्यतिरिक्त अक्षय कुमार रक्षाबंधन, मिशन सिंड्रेला, राम सेतू आणि सेल्फी यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक
Read More From बॉलीवूड
फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यावरील बायोपिक ‘सॅम बहादूर’च्या चित्रीकरणास सुरुवात
Vaidehi Raje