बॉलीवूड

रणबीर आणि आलियाचं आधीच झालं आहे लग्न, आलिया भटने दिली कबुली

Trupti Paradkar  |  Feb 14, 2022
रणबीर आणि आलियाचं आधीच झालं आहे लग्न, आलिया भटने दिली कबुली

बॉलीवूडमध्ये सध्या लग्नसोहळ्याचा धमाका सुरू आहे. एका पाठोपाठ एक असे अनेक सेलिब्रेटी लग्नाच्या बंधनात अडकत आहेत. बॉलीवूडचे लव्ह बर्ड रणबीर कपूर आणि आलिया भट कधी लग्न करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. गेली चार वर्ष ते एकमेकांना डेट करत आहेत. त्यामुळे दोन ते तीन वर्षांपासून सतत त्यांच्या लग्नाच्या अफवा निर्माण होत आहेत. चाहत्यांनाही आता या दोघांनी लवकर लग्न करावं असं वाटत आहे. मात्र रणबीरसोबत लग्न करण्याबाबत आलियाने एक वेगळाच खुलासा केला आहे. रणबीरसोबत तिचं कधीच लग्न झाल्याचं तिने जाहीर केलं आहे. आता ह्याला व्हॅलेंटाईन डे शुभेच्छा म्हणायचं की अजून काही.

खरंच झालं का रणबीर आणि आलियाचं लग्न

होय, रणबीर आणि आलिया याचं लग्न फार पूर्वीच झालं आहे… पण जरा थांबा… या गोष्टीत एक थोडासा मजेशीर ट्विस्ट आहे. आलियाला एका मुलाखतीत विचारण्यात आलं की तुम्ही आता सिरिअस रिलेशनशिपमध्ये आहात तर तू रणबीरसोबत कधी लग्न करणार आहेस ? यावर हजरजबाबी आलियाने एक मजेशीर उत्तर प्रेक्षकांना दिलं. आलिया म्हणाली की, “मी मनातून अनेक वर्षांपूर्वीच रणबीरशी लग्न केलं आहे” आलियाचं हे उत्तर मजेशीर तर होतंच पण तिचं रणबीरवर किती प्रेम आहे याची कबुली देणारंही होतं. त्यामुळे लवकरच विधीपूर्वक आलिया आणि रणवीर लग्नाच्या बेडीत अडकतील याची खात्री चाहत्यांना नक्कीच पटली असेल.

आयुषमान खुराणाने जागतिक रेडिओ दिनाच्या निमित्ताने दिला जुन्या आठवणींना उजाळा

याबाबत काय आहे रणवीरचं मत

काही दिवसांपूर्वीच हाच प्रश्न रणबीरलाही विचारण्यात आला होता. तेव्हा रणबीर म्हणाला होता की, “जर कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन झालं नसतं तर आमचं लग्न कधीच झालं असतं” यावरून रणबीरदेखील  आलियाशी लग्न करण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसला आहे असंच वाटत आहे. आता दोघांना एकमेकांपासून कोणीच वेगळं करू शकत नाही. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये दोघं लग्नाच्या बंधनात अडकण्याची दाट शक्यता आहे. याच वर्षी एप्रिलमध्ये आलिया आणि रणबीरच्या लग्नाचा थाटमाट पाहता येईल अशी सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे.

25 फेब्रुवारीपासून घडणार ‘पाँडीचेरी’ची सैर

ब्रम्हास्त्रमध्ये दिसणार ऑनस्क्रिन केमिस्ट्री

रणबीर आणि आलियाने सर्वांसमोर त्यांच्या प्रेमाची कबुली दिली असली तरी आजवर त्यांनी चित्रपटात कधीच एकत्र काम केलेलं नाही. लवकरच ब्रम्हास्त्रमधून ही जोडी मोठ्या पडद्यावर पहिल्यांदाच झळकणार आहे. लॉकडाऊनमुळे चांगलाच रखडलेला ब्रम्हास्त्र आता प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे चाहत्यांना रणबीर आणि आलियाची ऑनस्क्रिन आणि ऑफस्क्रिन केमिस्ट्री लवकरच पाहता येणार आहे.

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या ‘नो लँड्स मॅन’ने जिंकला वेसोल आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पुरस्का

Read More From बॉलीवूड