गंगूबाई काठियावाडीमधल्या हटके परफॉर्मेन्समुळे आलियाने चाहत्यांची मनं जिंकून घेतली. आता तर कपूर घराण्याची सून झाल्यावर तिची लोकप्रियता अधिकच वाढली आहे. आलिया चित्रपटात तर हिट आहेच पण तिचे सोशल मीडियावरही अनेक चाहते आहेत. याचाच परिणाम तिने आता सोशल माध्यमावर हॉलीवूड कलाकारांनाही या लोकप्रियतेत मागे टाकलं आहे. आलिया भटचं नाव इन्स्टाग्रामच्या टॉप फाईव्ह इनफ्लुएंनसर्समध्ये नोंदलं गेलं आहे. विशेष म्हणजे या यादीत सहभागी होणारी आलिया एकमेव बॉलीवूड अभिनेत्री आहे. ज्यामुळे आता आलियाच्या नावाचा डंका जागतिक स्थरावरही वाजू लागला आहे.
आलियाचे वाढले फॉलोव्हर्स
आलिया भटच्या लुक्स आणि अभिनयाचे चाहते अनेक आहेत. ज्यामुळे बॉलीवूडमध्ये ती भक्कमपणे स्वतःचे पाय रोवून उभी आहे. महेश भट आणि सोनी राजदान असा अभिनयाचा कौटुंबिक वारसा असूनही तिने बॉलीवूडमध्ये स्वतःच्या बळावर स्थान निर्माण केलं. बॉलीवूडप्रमाणेच आरआरआर चित्रपटात छोटीशी भूमिका साकारत तिने टॉलीवूडमध्येही स्वतःचे चाहते निर्माण केले. गंगूबाई काठियावाडीतील हटके भूमिका आणि रणबीर कपूरसोबत लग्न यामुळे ती काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे. याचाच परिणाम तिच्या सामाजिक जीवनावर झाला. सोशल मीडियावर तिचे चाहते मागील काही दिवसांपासून अचानक वाढू लागले आहेत.
आलियाने हॉलीवूड कलाकारांनाही टाकले मागे
आलियाची लोकप्रियता फक्त बॉलीवूड आणि टॉलीवूडमध्येच नाही तर आता हॉलीवूडमध्येही वाढू लागली आहे. ज्यामुळे तिने सोशल मीडियावर अनेक हॉलीवूड कलाकारांनाही मागे टाकलं आहे. सध्या आलियाचे इन्स्टाग्रावरील फॉलोव्हर्स 64 मिलीयनपेक्षा जास्त आहेत. विल स्मिथच्या नंतर चौथ्या क्रमांकावर आलियाचं नाव आहे. या यादीत फक्त सिने क्षेत्रातील कलाकारांची नावे आहेत. ज्यामध्ये पहिल्या पाचमध्ये येण्याचा मान बॉलीवूडमध्ये फक्त आलियाच्या नावे नोंद झाला आहे. पहिल्या क्रमांकावर जैंडेया, दुसऱ्या क्रमांकावर टॉम हॉलैंड, तिसऱ्या क्रमांकावर विल स्मिथ, चौथ्या क्रमांकावर आलिया भट आणि पाचव्या क्रमांकावर आहे जॅनिफर लोफेज… प्रियंका चोप्रा या यादीत तेराव्या स्थानावर आहे, तर श्रद्धा कपूर आणि रश्मिका मंदाना पहिल्या वीसमध्ये आहेत. अक्षय कुमार तर या यादीत तेविसाव्या क्रमांकावर आहे. बॉलीवूडमधील कुठल्याच अभिनेत्याने पहिल्या बावीसमध्ये स्थान मिळवलेलं नाही. यावरून सध्या सोशल मीडियावर सध्या फक्त आलियाचा बोलबाला असल्याचं सिद्ध झालं आहे.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक
Read More From बॉलीवूड
फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यावरील बायोपिक ‘सॅम बहादूर’च्या चित्रीकरणास सुरुवात
Vaidehi Raje