बाहुबली फेम एस. एस. राजामौलीचा आगामी बिगबजेट चित्रपट आरआरआर लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे सगळीकडे सध्या या चित्रपटाचे प्रमोशन सुरु आहे. या चित्रपटात अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री आलिया भट यांच्या लहान भूमिका आहे. तर साऊथ अभिनेता रामचरण आणि ज्युनियर एनटीआर मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच या चित्रपटाबद्दल जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे. सध्या एस. एस. राजमौली चित्रपटातील कलाकारांसोबत जोरदार प्रमोशन करण्यात व्यस्त आहेत. या प्रमोशन दरम्यान बॉलीवूड अभिनेत्री आलिया भटने मात्र तिच्या सहकलाकारांबद्दल एक तक्रार सर्वांसमोर मांडली आहे.
Year Ender: 2021 मध्ये गाजली या सेलिब्रिटींची लग्ने
‘आरआरआर’च्या सेटवर काय घडलं आलियासोबत
आरआरआरची टीम हैदराबादमध्ये प्रमोशनासाठी दाखल झाली. ज्यामध्ये एस.एस. राजामौलीसह साऊथ अभिनेता राम चरण आणि ज्युनियर एनटीआरसुद्धा होते. आलिया भटदेखील या प्रमोशनसाठी हैदराबादमध्ये गेली होती. जेव्हा प्रमोशन करता करता आलियाने एका गोष्टीचा खुलासा सर्वांसमोर केला. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तेलुगू मीडियासमोर मुलाखत देताना आलियाने चक्क तेलुगूमध्ये संवाद साधला. ज्यामुळे टॉलीवूड मिडीया आलियाच्या बोलण्यामुळे खूपच प्रभावित झाला. आलियाचा संवाद ऐकताच एस. एस. राजमौली म्हणाले की आलियाने वर्षभर तेलुगू शिकून घेतली आहे. त्यामुळे आता ती या भाषेत अगदी पारंगत झाली आहे आलियाने याबाबत स्पष्टीकरण देत सांगितलं की, लॉकडाऊनमध्ये मी झूम कॉलवर तेलुगू शिकून घेतलं. तेव्हा मी एस. एस. राजामौलीनां भेटले नव्हते त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधण्याआधी मी डिजिटलचा असा उपयोग करून घेतला.
अंकिता लोखंडे ‘पवित्र रिश्ता’ जोडणार 14 डिसेंबरला, विकी जैनशी होणार विवाहबद्ध
रामचरण आणि ज्युनियर एनटीआरसोबत आला असा अनुभव
आलियाने जेव्हा तिला सेटवर कसा अनुभव आला हे सांगितलं तेव्हा सर्वांना आश्चर्यच वाटलं. ती म्हणली की मी जेव्हा आरआरआरच्या सेटवर गेले तेव्हा रामचरण आणि ज्युनिअर एनटीआर फक्त तेलुगूमध्येच बोलत असत. मी तेव्हा त्यांना एकमेकांची मस्करी करताना पाहिलं होतं. पण त्यांनी मात्र मला सेटवर असून नसल्यासारखं भासवत माझ्याकडे दुर्लक्ष केलं होतं. हा मजेशीर किस्सा सोडला तर नंतर सेटवर सर्वजण आलियाचे कौतुक करत होते. प्रमोशन दरम्यानही एस. एस. राजामौलीनेही आलियाचे सर्वांसमोर खूप कौतुक केले. आलियाने आरआरआरमध्ये सीताची भूमिका साकारली आहे. अल्लुरी सीता ही रामचरण साकारत असलेल्या पात्राची प्रेमिका आहे. आरआरआर 7 जानेवारी 2022 ला प्रदर्शित होत आहे. चित्रपटाचे प्रोमो आणि प्रमोशन पाहुन चाहते नक्कीच या चित्रपटाकडे आकर्षित झाले आहेत.
Bigg Boss Marathi: गायत्री दातारची एक्झिट,अनेकांना बसला धक्का
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade