आलिया भट तिच्या प्रेगनन्सीमुळे एकीकडे चर्चेत आहे तर दुसरीकडे तिची ड्युप्लिकेट सोशल मीडियावर धुमाकूळ घालतेय. आलिया सारखं सेम टू सेम दिसणाऱ्या एका मुलीने तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे. शाहरूख खानच्या ‘दिल तो पागल है’ या चित्रपटातील ‘ओ ढोलना’ या गाण्यावर तिने ढुमके लावले आहेत. मात्र हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होण्यामागचं महत्त्वाचं कारण तिचा लुक आहे. ती सेम टू सेम आलियासारखी दिसत आहे. पांढऱ्या-गुलाबी रंगाच्या ऑर्गेंजा साडीत तिने स्वतःचा सेम टू सेम आलियाप्रमाणे लुक केला आहे. एवढंच नाही तर तिच्या चेहऱ्यावरील हावभावही आलियासारखेच आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी नेटकरी उत्सुक आहेत.
आलियाच्या ड्युप्लिकेटचा व्हिडिओ व्हायरल
सोशल मीडियावरील इन्स्टाग्राम हे प्रसिद्धीचं लोकप्रिय माध्यम आहे. या माध्यमावरून कोणीही आपली ओळख निर्माण करू शकतं. सध्या इन्स्टाग्रामची चलती असल्यामुळे प्रसिद्ध होण्यासाठी अनेक जण या माध्यमाचा पुरेपुर वापर करताना दिसतात. फोटो, स्टोरी, व्हिडिओ, रिल्स असे प्रकार इन्साग्रामवर सतत अपलोड होत असतात. सेलिब्रेटी तर इन्स्टाग्रामवर फेमस असतातच पण त्यांचे फॅन्सही सध्या इन्स्टाग्रामवर फॉलोव्हर्स वाढवून सेलिब्रेटी होताना दिसतात. अनेकींना सेलिब्रेटीप्रमाणे लुक करून फेमस होण्याची क्रेझ दिसून येते. आजवर बॉलीवूड स्टार्सचे अनेक ड्युप्लिकेट प्रेक्षकांसमोर आले आहेत. त्यामुळे ऐश्वर्या, श्रीदेवी प्रमाणेच आता आलियाचीही ड्युप्लिकेट नव्याने समोर आली आहे. बॉलीवूडमध्ये आलिया सध्या नंबर वनवर आहे. गंगुबाई, आरआरआरसारखे हिट चित्रपट, रणबीर कपूरसोबत गुपचूप लग्न, लग्नानंतर लगेच प्रेगन्सी अशा अनेक कारणांमुळे आलिया सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्यामुळे आलियाची ड्युप्लिकेटदेखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. तिने इन्स्टावर शेअर केलेल्या एका व्हिडिओवर त्यामुळे लाईक्स आणि कंमेट्सचा वर्षाव होताना दिसतोय.
आलियाची ड्युप्लिकेट आहे तरी कोण
सोशल मीडियावर सेलेस्टी बैरागी Celesti Bairagey या आसाममध्ये राहणाऱ्या ब्लॉगरचा एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. सेलेस्टीला पाहून लोक अक्षरशः थक्क झाले आहेत. कारण सेलेस्टी सेम टू सेम आलियासारखी दिसते. तिचे हावभाव, गालावर पडणारी खळी आणि तिचा पेहराव आलियासारखाच आहे. जर दोघींनी एकत्र पाहिलं तर काही क्षणासाठी आलिया नेमकी कोणती? हे समजणं कठीण जाईल इतकी ती आलियासारखी वाटते. त्यामुळे तिच्या व्हिडिओला अनेकजण लाईक्स करत आहेत. शिवाय आलियाची ड्युप्लिकेट, आलियाची छोटी बहीण, अरे ही तर आलियाच अशा कंमेट तिला या व्हिडिओवर मिळत आहेत.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक
Read More From बॉलीवूड
फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यावरील बायोपिक ‘सॅम बहादूर’च्या चित्रीकरणास सुरुवात
Vaidehi Raje