आलिया भट आणि रणबीरच्या लग्नाची चर्चा सध्या सर्वत्र जोरदार सुरू आहे. सतत या लग्नाचे अपडेट चाहत्यांना जाणून घ्यायचे आहे. मग तो वेडिंग मेन्यू असो वा लग्नात वऱ्हाडी मंडळींसाठी केलं जाणारा मेन्यू असो सर्व काही सविस्तर जाणून घ्यायला चाहते नक्कीच उत्सुक आहेत. मात्र या लग्नाबद्दल इतकी गुप्तता पाळली जात आहे की सतत लग्नातील काही गोष्टींचे तपशील बदलताना दिसत आहेत. लग्नाची तारिख देखील पुन्हा नव्याने समोर येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता आलिया आणि रणबीर 14 तारखेला लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. मात्र लग्न नेमकं कुठे होणार याचा अचूक तपशील कोणीच सांगत नाही आहे. कदाचित लग्न आर के स्टुडिओमध्ये पार पडू शकतं अथवा एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये…. मात्र आर के स्टुडिओला केलेली सजावट पाहून लग्नाची लगबग मात्र नक्कीच दिसून येत आहे. अशातच आलियाच्या सावत्र भावाने राहुल भटने लग्नाबाबत काही गोष्टींचा खुलासा केल्याची चर्चा आहे.
काय म्हणाला आलियाचा भाऊ
राहुल भटने शेअर केलेल्या माहितीनुसार आलिया आणि रणबीरचं लग्न थाटामाटात पण कमी पाहुण्यांच्या उपस्थितीत होणार आहे. या लग्नात फक्त घरातील मंडळी आणि अगदी जवळचे मित्रमंडळी उपस्थित असणार आहे. लग्नासाठी आतापर्यंत फक्त 28 लोकांना आमंत्रण देण्यात आलेलं आहे. मुंबईतील आर के स्टुडिओ यासाठी छान सजवण्यात आलेला आहे. कारण रणबीर कपूरचे वडील आणि दिवंगत अभिनेता ऋषी कपूर यांची तशी इच्छा होती. त्यांच्या शेवटच्या इच्छेनुसार रणबीर आणि आलियाचं लग्न कृष्णा राज यांच्या बंगल्यात होणार आहे. यासाठी या बंगल्याला सजवण्यात आलं असावं.
कसा असणार विवाह सोहळा
आतापर्यंत अशी चर्चा होती की आलिया आणि रणबीरचं लग्न त्यांनी दोघांनी खरेदी केलेल्या वास्तु अपार्टमेंटमध्ये होणार अथवा आरके स्टुडिओमध्ये केलं जाणार… मात्र काही सूत्रांच्या मते कदाचित हा विवाह सोहळा एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्येदेखील होऊ शकतो. लग्नाचा वेन्यू आणि तारिख याध्ये इतके बदल झाल्यावर आता चाहत्यांना नक्की लग्न होणार की नाही अशा शंका वाटू लागली आहे. मात्र सूत्रांच्या मते लग्न पंजाबी पद्धतीने होणार असून वीस एप्रिलच्या आधी दोघांचं लग्न नक्की होणार. मात्र लग्न कपूर घराण्याच्या मुलाचं आणि भट कंपनीच्या मुलीचं आहे. त्यामुळे कडक सुरक्षा असावी यासाठी असं प्लॅनिंग करण्यात आलं आहे. लग्नात पाहुणे मंडळी कमी असली तरी 200 हुन अधिक बाऊन्सर्स लोकांच्या सुरक्षेसाठी असणार आहेत.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm एक कडून मोफत लिपस्टिक
Read More From बॉलीवूड
फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यावरील बायोपिक ‘सॅम बहादूर’च्या चित्रीकरणास सुरुवात
Vaidehi Raje