गेल्या तीन – चार दिवसांपासून निर्माती एकता कपूर आणि तिच्या चमूतील काही कलाकार सोशल मीडिया इन्स्टाग्रामवरून अपहरण झाल्याचे काही व्हिडिओ पोस्ट करत होते. आज या अपहरणावरून पडदा उठला आहे. अल्टबालाजीची नवी वेबसिरीज ‘अपहरण’ येत्या १४ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. याचं ट्रेलर आज प्रदर्शित करण्यात आलं आहे. सध्या वेबसिरीज हे विषय सहजरित्या मांडायचं आणि प्रेक्षकांपर्यंत पोहचण्याचं सहज माध्यम झालं आहे आणि याचा विचार करूनच अल्टबालाजी दर आठवड्याला वेगवेगळ्या विषयावरील वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहे. अशीच ‘अपहरण’ ही वेबसिरीज एकता कपूरने आणली आहे. पहिल्यांदाच वेबसिरीजमधून माही गिलदेखील प्रेक्षकांसमोर येणार आहे.
माही पहिल्यांदाच वेबसिरीजमध्ये
माही गिल आतापर्यंत अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांसमोर आली आहे. मात्र पहिल्यांदाच ती वेबसिरीजमधून दिसणार आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर आतापर्यंत अशाच भूमिकेमधून माही दिसली असल्याचं विचारताच माहीने सांगितलं की, या प्रश्नासाठी मी तयारच होते. त्यातील कपडे आणि ट्रेलरमधील वावर पाहता असं जाणवणं साहजिक आहे. मात्र ही वेबसिरीज रहस्यमय असल्यामुळं यातील रहस्य सुरुही माझ्यापासून होतं आणि संपतंही माझ्यावरच. त्यामुळे माझी भूमिका अतिशय वेगळी आहे,’ असं माहीने स्पष्ट केलं. इतकंच नाही तर तिने बालाजीसंदर्भात एक मजेशीर किस्साही सांगितला. दहा वर्षांपूर्वी आपल्याकडे कोणाचाही संपर्क नव्हता तेव्हा एकताला भेटायची खूप इच्छा होती. पण दारावरील वॉचमनने आपल्या भेटू न देता हाकलवून लावल्याचं आठवतं. तेव्हापासून एकताबरोबर काम करायची इच्छा होती ती दहा वर्षांनी पूर्ण होत असल्याचंही तिने यावेळी नमूद केलं.
अरूणोदयने साकारलेला रूद्र अप्रतिम
अरूणोदयने या वेबसिरीजमध्ये साकारलेला रूद्र हा उत्तरप्रदेशमधील असून त्याने अगदी अप्रतिम लहेजा पकडल्याचं या ट्रेलरमधून दिसून येत आहे. अरूणोदय हा उत्तम कलाकार असल्याचं त्याने आतापर्यंत सिद्ध केलं आहे. या वेबसिरीजमधूनही पुन्हा एकदा आपल्या अभिनयाचं अंग अरूणोदयने दाखवून दिलं आहे आणि त्याला साथ मिळाली आहे ती वरूण वडोलाची. वरूणने लिहिलेले संवाद नेहमीच्या जगण्यातले असल्यामुळे त्याला भारदस्तपणा येत आहे आणि त्याशिवाय वरूण आणि अरूणोदयची केमिस्ट्री अप्रतिम या ट्रेलरमधून दिसून येत आहे. दोघांचीही संवादफेक अतिशय अप्रतिम असून उत्तरप्रदेशची बॅकग्राऊंडही या कथेला साजेशी आहे. त्यामुळे आता १४ डिसेंबरला ही वेबसिरीज प्रदर्शित झाल्यानंतरच प्रेक्षकांचा काय प्रतिसाद असेल ही कळेल.
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade