मनोरंजन

अमिताभ बच्चन ‘या’ मराठी चित्रपटात साकारणार महत्त्वाची भूमिका

Trupti Paradkar  |  Sep 8, 2019
अमिताभ बच्चन ‘या’ मराठी चित्रपटात साकारणार महत्त्वाची भूमिका

बॉलीवूडच्या कलाकारांना मराठी चित्रपटसृष्टीची ओढ नेहमीच दिसून येते. आतापर्यंत अनेक बॉलीवूड स्टार्सनी मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. महानायक अभिताभ बच्चन देखील लवकरच एका मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ‘AB आणि CD’ या सिनेमातून अमिताभ बच्चन मराठी चित्रपटसृष्टीत पुन्हा एकदा पदार्पण करत आहेत. यापूर्वी ‘अक्का’ या चित्रपटात त्यांनी जया बच्चन यांच्यासोबत एका गाण्यातून काम केलं होतं.मात्र त्यानंतर तब्बल तीस वर्षांनी या महानायकाला मराठी चित्रपटातून पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. अभिताब बच्चन यांची महत्त्वाची भूमिका  असलेला मराठीतील हा पहिलाच चित्रपट असणार आहे. कारण अक्कामध्ये त्यांनी फक्त एका गाण्यापुरती छोटीशी भूमिका साकारली होती. काहीही असलं तरी अभिनयाच्या महानायकाला मराठी चित्रपटातून पाहण्यासाठी त्यांचे चाहते नक्कीच उत्सुक आहेत. ‘AB आणि CD या सिनेमाचे शूटिंग पूर्ण झालेलं असून नुकतच त्यांचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं. 

AB आणि CD’ चं पोस्टर लालबागच्या राज्याच्या चरणी

गणेशोत्सव मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरा केला जात आहे. गणेशोत्सवात लालबागच्या राजाची शान न्यारीच  असते. लालबागच्या राजाच्या चरणी सर्वसामान्यांपासून ते कलाकारांपर्यत सर्वच नतमस्तक होण्यासाठी येत असतात. गणेशोत्सवाचं औचित्य साधून अक्षय विलास बर्दापूरकर आणि प्लॅनेट मराठी निर्मित तसेच मिलिंद लेले दिग्दर्शित ‘AB आणि CD’ सिनेमाचे पहिलं पोस्टर लालबाग राजाच्या चरणी प्रदर्शित करण्यात आलं. ‘AB आणि CD’ चे निर्माते अक्षय बर्दापूरकर, दिग्दर्शक मिलिंद लेले, गोल्डन रेशो चे कुणाल वर्मा, अभिनेत्री सायली संजीव यांनी हे पोस्टर बाप्पाच्या चरणी समर्पित केलं. त्यामुळे लालबागच्या राजाच्या दर्शनाने ‘AB आणि CD’ सिनेमा प्रेक्षकांपर्यंत पोहचण्याच्या प्रक्रियेचा श्री गणेशा झाला आहे. त्यामुळे प्रेक्षकांना या चित्रपटाची झलक देखील लवकरच पाहायला मिळेल. या चित्रपटातून महानायकाला पाहण्यासाठी प्रेक्षक नक्कीच उत्सुक आहेत. शिवाय या चित्रपटातून महानायकासोबतच अनेक दिग्गज कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. 

या चित्रपटात दिग्गज कलाकारांची मांदीयाळी

अक्षय विलास बर्दापूरकर आणि प्लॅनेट मराठी निर्मित आणि गोल्डन रेशो फिल्म्स, केव्हीआर प्रॉडक्शन्स आणि क्रिष्णा प्रसाद प्रस्तुत ‘AB आणि CD’ मध्ये अमिताभ बच्चन, विक्रम गोखले, सुबोध भावे, सायली संजीव आणि अक्षय टंकसाळे यांच्या भूमिका आहेत. अमिताभ बच्चन आणि विक्रम गोखले यांची मैत्री या चित्रपटात दाखवण्यात आला आहे म्हणजेच अमिताभ बच्चन यामध्ये महत्वाची भूमिका साकारणार असून विक्रम गोखले यांच्या मित्राच्या भूमिकेत दिसतील.विशेष म्हणजे या पोस्टरमध्ये देखील विक्रम गोखले यांनी अमिताभजी यांच्या ‘याराना’ सिनेमातील ‘सारा जमाना हसींनो का दिवाना’ या गाण्यातील गेट अप केलेला आहे. यापूर्वी अनेक हिंदी चित्रपटांमधून अमिताभ बच्चन आणि विक्रम गोखले यांनी एकत्र काम केलेलं आहे. त्यामुळे सिनेमातील त्यांच्यातील दोस्ती ही नक्कीच विशेष असेल यात शंका नाही. चित्रपटाच्या पोस्टरवर कमिंग सून लिहीलेलं असल्यामुळे हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार हे असून जाहीर झालेलं नाही. मात्र हा चित्रपट खास असेल असं या पोस्टरवरून नक्कीच जाणवत आहे. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा

OMG:सुरवीन चावलाची 5 महिन्यांच्या मुलीने केला डेब्यू

काळे धंदे’ उघड झाल्यामुळे आता होणार भलभल्यांचे वांदे

मॅडम तुसाद म्युझियममध्ये बॉलीवूडची चांदनी Sridevi चा वॅक्स स्टॅच्यू

Read More From मनोरंजन