मनोरंजन

बिग बी आणि सुबोध भावे ‘AB आणि CD’ च्या निमित्ताने येणार एकत्र

Aaditi Datar  |  May 21, 2019
बिग बी आणि सुबोध भावे ‘AB आणि CD’ च्या निमित्ताने येणार एकत्र

मराठी सिनेमा हा नेहमीच विषयांची वैविध्यता आणि आशयघन कंटेटसाठी ओळखला जातो. प्रत्येक नवीन मराठी सिनेमाबाबत फक्त मराठी प्रेक्षकांनाच नाहीतर इतर चित्रपटसृष्टीतील कलाकारांनाही उत्सुकता असते. फक्त भारतातीलच नाहीतर आंतरराष्ट्रीय पातळीवरही मराठी सिनेमा आणि कलाकाराचं आवर्जून कौतुक केलं जातं ते याच कारणामुळे. याचाच परिणाम म्हणून की काय तब्बल 25 वर्षांनंतर बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) मराठी चित्रपटात एंट्री करत आहेत.

सिनेमाच्या विषयासह जर सिनेमातील पात्र देखील प्रेक्षकांच्या आवडीची असतील तर बात काही औरच असते. अशाच एका नवीन सिनेमाचा मुहुर्त नुकताच पार पडला आणि या सिनेमाचं नाव आहे ‘AB आणि CD’. या सिनेमाच्या निमित्ताने मराठी प्रेक्षकांना बिग बींना मराठी चित्रपटात अभिनय करताना पाहता येणार आहे.  

आक्कानंतर आता ‘AB आणि CD’

25 वर्षापूर्वी अमिताभ बच्चन यांनी त्यांचे मेकअप आर्टीस्ट दीपक सावंत यांची निर्मिती असलेल्या आणि श्रीधर जोशी यांचं दिग्दर्शन असलेल्या ‘आक्का’ (1994) या मराठी चित्रपटात काम केलं होतं. या चित्रपटात त्यांच्यासोबत जया बच्चन यांनीही काम केलं होतं. त्यानंतर आता तब्बल पंचवीस वर्षांनी बिग बी मराठी चित्रपटात दिसणार आहेत. मराठी चित्रपटाच्या निर्मितीच्या माध्यमातून बिग बी यांच्या एबीसीएल कंपनीने 2009 साली आलेल्या विहीर या मराठी चित्रपटाची निर्मिती केली होती. या चित्रपटाचं दिग्दर्शन उमेश कुलकर्णी यांनी केलं होतं. या चित्रपटाला अनेक फिल्म फेस्टिव्हलमध्ये पसंती मिळाली होती.

आजारी असूनही अमिताभ बच्चन करतायत काम, फोटो झाला व्हायरल

सुबोध भावेने व्यक्त केला आनंद

मिलिंद लेले दिग्दर्शित ‘AB आणि CD’ या सिनेमात अमिताभ बच्चन, विक्रम गोखले, सुबोध भावे, सायली संजीव आणि अक्षय टंकसाळे यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच अभिनेता सुबोध भावेला बिग बीसोबत काम करण्याची संधी मिळत आहे. याबाबतची पोस्टही सुबोधने इन्स्टावर शेअर केली आणि ‘AB आणि CD’ या चित्रपटाच्या टीमचे आभार मानले.

अमिताभ बच्चन यांनी विकली त्यांची आलिशान कार

‘AB आणि CD’ चा पार पडला मुहूर्त

नुकताच या सिनेमाचा मुहूर्त नुकताच पार पडला. यावेळी चित्रपटातील कलाकार विक्रम गोखले, सागर तळाशिलकर, सीमा देशमुख, लोकेश गुप्ते, जयंत सावरकर, सुनिल गोडबोले, अरुण पटवर्धन, प्रशांत गोखले, सुभाष खुंडे, मुक्ता पटवर्धन, अक्षय टंकसाळे, सायली संजीव आणि साक्षी सतिश हेदेखील यावेळी उपस्थित होते. अमिताभ बच्चन यामध्ये कॅमिओ पण मुख्य पात्राचा रोल करणार आहेत. या चित्रपटात ते विक्रम गोखले यांच्या मित्राच्या भूमिकेत दिसतील. या सिनेमाच्या शूटींगला सुरुवात झाली असून लवकरच ‘AB आणि CD’  हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येईल.

हेही वाचा –

‘गुलाबो सिताबो’ चित्रपटात अमिताभ बच्चन आणि आयुषमान खुराना एकत्र

Read More From मनोरंजन