अभिनय क्षेत्रातील सर्वोच्च असा दादासाहेब फाळके पुरस्कार यंदा बिग बी अमिताभ बच्चन यांना जाहीर करण्यात आला आहे. चित्रपट क्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मंगळवारी संध्याकाळी प्रकाश जावडेकर यांनी ट्विटरवरुन ही आनंदवार्ता सगळ्यांना दिली.अमिताभ बच्चन यांच्यावर सोशल मीडियावरुन अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. अनेक सेलिब्रिटींनी त्यांना या पुरस्काराबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.
वयाचं अंतर असूनही प्रेमात आकंठ बुडाल्या आहेत ‘या’ जोड्या
दोन दशकांहून अधिक काळ काम
अमिताभ बच्चन यांनी दोन दशकांहून अधिक काळ चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि अजूनही ते काम करतात. वयाची किंवा स्टार असल्याची कोणतेही कारण न देता ते आजही सातत्याने काम करत आहेत. त्यांच्या या सातत्याचे चीझ झाले असून म्हणूनच त्यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला.
दिग्गज अभिनेत्री तनुजा यांची ‘दुर्मिळ’ छायाचित्रं राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात
शुभेच्छांचा वर्षाव
दरम्यान अमिताभ बच्चन यांच्यावर कालपासून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सबंध भारतीय चित्रपटसृष्टी त्यांचे अभिनंदन करत आहे. अनेकांनी त्यांच्या सोबतच्या आठवणीही सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. नेत्यांपासून ते अभिनेत्यांपर्यंत अनेकांनी त्यांना ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.
पुरस्काराला इतका उशीर का?
अमिताभ बच्चन यांना मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अनेक स्तरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी अमिताभ बच्चन यांना शुभेच्छा देत हा पुरस्कार देण्यासाठी फार वेळ लावला अशी प्रतिक्रिया दिली. शिवाय त्या म्हणाल्या की, अमिताभ बच्चन यांचे करीअर घडताना मी पाहिले आहेत. त्यांना खूप आधीच हा पुरस्कार द्यायला हवा होता.
अमिताभ यांचा करीअरग्राफ
अमिताभ यांनी त्यांच्या करीअरची सुरुवात 1969 साली आलेल्या ‘सात हिन्दुस्तानी’ या चित्रपटातून केली. 1971 साली आलेल्या ‘आनंद’ या चित्रपटाने त्यांच्या करीअरला कलाटणी दिली. त्यांनी या चित्रपटात राजेश खन्ना यांच्या मित्राचे काम केले होते. त्यासाठी त्यांना बेस्ट सर्पोटींग अॅक्टरचा अॅवार्ड मिळाला. या चित्रपटानंतर त्यांना अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या. जंजीर, अभिमान, दिवार, नमक हराम असे उत्तम चित्रपट केले. त्यांच्या या चित्रपटांची यादी अगणित आहे. अजूनही अमिताभ बच्चन काम करत असून हल्लीच आलेला त्यांचा ‘पिंक’ हा चित्रपटही चांगलाच गाजला. सध्या अमिताभ कौन बनेगा करोडपतीचे शुटींग करत आहेत.
पुरस्कारावरुन वाद
अमिताभ बच्चन यांना पुरस्कार जाहीर झाल्यानंतर काहींनी एक नवाच वाद समोर आणला आहे. ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनाताई यांना हा पुरस्कार देण्यास दिरंगाई का करण्यात येत आहे, असा सवाल अनेकांनी केला आहे. मराठी सिनेसृष्टीत सुलोचनाताई यांचे अमूल्य योगदान असून त्यांना पुरस्कार देणे अपेक्षित आहे
महानायक अमिताभ बच्चन यांना पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांच्या फॅन्सनी आनंद व्यक्त केला आहे.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade