नातीगोती

#MyStory: आणि तेवढ्यात त्याची आई आली….

Anonymous  |  Nov 16, 2018
#MyStory: आणि तेवढ्यात त्याची आई आली….

आम्हाला दोघांना भेटून जवळजवळ सहा महिने झाले होते आणि आम्ही एकमेकांबरोबर खूप खूष होतो. आमचं लग्नाबद्दल अजून काही बोलणं झालं नव्हतं. पण आम्हाला माहीतं होतं की, आम्हाला आयुष्यभर एकत्र राहायला आवडेल. माझ्या parents ना ही आमच्या नात्याबद्दल काही प्रॉब्लेम नव्हता. त्यामुळे अर्जुन.. माझा boyfriend त्यांना भेटला होता. असंच एक दिवशी मी अर्जुनला माझ्याबरोबर घरी घेऊन गेले आणि आईबाबांशी भेट घालून दिली. माझ्या ओळख करून देण्याच्या एकंदर पध्दतीनेच त्यांना समजून चुकलं की अर्जुन आणि माझ्यामध्ये काहीतरी सूरू आहे.

एक दिवशी माझ्या घरी मी आणि अर्जुन टीव्ही बघत होतो…. घरी कोणी नव्हतं आणि आम्ही दोघं ही खूप romantic मूडमध्ये होतो. तेवढ्यात अर्जुन म्हणाला, हीच योग्य वेळ आहे जेव्हा मला ही त्याच्या parents ना भेटायला हवं.

“तुलाही त्यांना भेटलं पाहिजे… ते खूप चांगले आहेत पण थोडे conservative आहेत. त्यामुळे त्यांना तुझी सवय होण्यासाठी थोडावेळ जावा लागेल.”

मी डोकं हलवत होकार दिला. पण मी काहीशी घाबरले होते… जर मी त्यांना आवडले नाहीतर? माझे छोटे केस, छोटे कपडे आणि रागीट स्वभाव… आता साहजिकच आहे की, त्यांनी आपल्या मुलासाठी अश्या मुलीचा विचार तर केला नसेलच.

“Um, मी त्यांना भेटायला जाताना काय घालू ?” मी विचारलं. माझ्या डोळ्यासमोर माझा वॉडरोब दिसत होता…माझा प्रत्येक ड्रेस त्याच्या parents ना impress करण्यायोग्य नाही, असं वाटत होतं…कशावर जास्त प्रिंट तर काही ड्रेस खूपच शॉर्ट होते…!

“Uff, थांब गं ,” तो म्हणाला. “Relax, कर. कदाचित जीन्स घालून आलीस तर चालेल.”

“कदाचित??” मला माझ्या future बाबत कोणतीही risk घ्यायची नव्हती. अर्जुन पण sure नव्हता म्हणून दुसऱ्याच दिवशी आम्ही शॉपिंगला गेलो. मी स्वतःला बदलणार नव्हते पण मला त्या भेटीसाठी काहीतरी चांगलं आणि appropriate घालायचं होतं. कितीतरी तास आम्ही बाजारात फिरत होतो. पण मला काही कळत नव्हतं की कुठला ड्रेस मी घ्यायला हवा…माझ्याकडे एक ही पंजाबी ड्रेस नव्हता. त्यासाठी नेहमीच मी माझ्या आईवर डिपेंड असायचे. पण अखेर मला एक परफेक्ट ड्रेस मिळाला. FabIndia मध्ये एक लाल रंगाचा ड्रेस मला आवडला… ड्रेस फॉर्मल होता आणि full sleeves चा होता….त्यावर ओढणी घ्यायचीसुध्दा गरज नव्हती.. तर आता मी तयार होते अर्जुनच्या आईवडिलांना भेटण्यासाठी.. एका सूनेच्या रूपात.

त्या दिवशी जेव्हा अर्जुनने त्याच्या घराचा दरवाजा उघडला..तेव्हा मला त्याच्या expression वरूनच कळलं की, मला बघून तो आश्चर्यचकित झाला आहे. तो जास्त काही म्हणाला नाही..एवढचं म्हणाला की, मी चांगली दिसतेय.

त्याने आपल्या parents शी मला introduce करून दिलं, त्याचे बाबा रंजन शर्मा आणि आई श्रध्दा शर्मा मला चांगले वाटले. आता ते माझ्या आईबाबांएवढे cool नव्हते. पण जसा विचार केला होता तसे ही नव्हते… बॉलीवूडच्या एखाद्या रागीट आईबाबांसारखे… मला असं वाटलं की, मी व्हीडीओ एडीटर आहे. हे कळल्यावर ते जास्त impress झाले नाहीत. एक तासानंतर आम्ही जेवणार होतो. तोपर्यंत आम्ही एकत्र बसून गप्पा मारत होतो.

अर्ध्या तासाने अर्जुन फोन आला म्हणून उठून बाहेर बोलायला गेला. त्याची आई किचनमध्ये चहा बनवण्यासाठी गेली. मी किचनमध्ये गेले आणि त्यांना म्हटलं मला वॉशरुमला जायचंय. त्यांनी मला त्यांच्या बेडरूममधील वॉशरूम use करण्यास सांगितले.

वॉशरूममध्ये गेल्यावर मला कळलं की, मी एका मोठ्या संकटात अडकले आहे…ड्रेस तर आधी कधी घातला नव्हता. त्यामुळे नाडी सोडताना जबरदस्त गाठ बसली. मी पाच मिनिटं ती सोडण्याचा प्रयत्न केला पण मला काही ते जमेना… मी अर्जुनला मेसेज केला, “लवकर इकडे ये. मला help हवीये..”

दोन मिनिटांनी अर्जून बेडरूममध्ये आला..मी वॉशरूमचा दरवाजा थोडासा उघडून त्याला माझा problem सांगितला.

“हे तू काय केलंस यार?” त्याने मी काहीशी नाराजी दाखवली. पण त्याची पण काही चूक नव्हती… मला माहीत नाही की, काय विचार करून मी गाठ सोडायचा प्रयत्न केला आणि ती अजूनच घट्ट झाली. अखेर तो म्हणाला की, मीच प्रयत्न करून बघतो. गाठ सोडवायचा. तो क्षण माझ्यासाठी खूपच विचित्र होता…माझा boyfriend माझे कपडे काढण्यासाठी मला मदत करत होता…माझ्याकडून काही हवं होतं म्हणून नाहीतर मला टॉयलेटला जाता यावं यासाठी. Oh God!! अर्जुनने वॉशरूमचा दरवाजा उघडला आणि माझ्यासमोर गुडघ्यावर टेकून बसला आणि माझी नाडीची गाठ सोडवायचा प्रयत्न करू लागला…मी बिचारी बनून त्याला बघत होते. मी विचार करते होते की, जर ह्याने खरंच मला ह्या प्रसंगानंतर सोडून दिलं तर?? माझा मूर्खपणाच एवढा मोठा होता की…

“Yes!” तो जोरात म्हणाला, “ घे. मी गाठ सोडवली.”

YAYY….My HERO!

मी ह्या गोष्टीने खूष होणारच होते की मला जोरात आवाज ऐकू आला.“Aaaaieeeeee!!!”

आम्ही दोघंही आवाजाच्या दिशेने एकत्र वळलो. अर्जुनची आई बेडरूमच्या दरवाज्याशी उभी होती, त्यांच्या हातात चहाचा ट्रे होता आणि त्यांचे हात थरथरत होते…त्यांची नजर आमच्यावर होती…आमच्यावर…आम्ही दोघं वॉशरूममध्ये…माझा कुर्ता वर उचलून मी दोन्ही हातांमध्ये खोचला होता, त्यांचा मुलगा गुडघ्यावर बसून माझ्यासमोर बसला होता आणि त्याचे दोन्ही हात माझ्या सलवारच्या नाडीशी होते…!!

तो क्षण माझ्या आयुष्यातील अगदी…म्हणजे अगदी वाईट क्षण होता.

आम्ही तिघंही freeze झालो होतो… तिघंही गपचुप उभे होतो..माझे कान लाल झाले होते, माझे हृदयाचे ठोके जोरजोरात पडत होते…

WHAT THE F*** ….माझ्या डोक्यात हेच सुरू होतं की मी आता काय करू???

अर्जुन सगळ्यात आधी frozen situation मधून बाहेर आला. तो उभा राहिला, त्याने त्याचा चष्मा नीट केला आणि म्हणाला, “Hi, Maa.” त्याच्या आवाजात कुठलाही संकोच नव्हता…मी impress झाले, खरंतर मला वाटतं होतं की, जमीन फाटावी आणि मी त्यात सामावून जावं..मला अर्जुनचं रिएक्शन आवडलं.

“काय..काय चालेल इकडे…?” त्याची आई म्हणाली, त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी साफ दिसून येत होती.

“इशिकाच्या सलवारची नाडी घट्ट झाली होती. ” तो म्हणाला. “मी फक्त तिची मदत करत होतो.” Brave, brave boy. मला खरंच त्याच्या या बोलण्यामुळे चांगल आणि positive वाटत होतं.

“पण….तिला काय गरज लागली..सलवार सोडण्यासाठी?” त्या म्हणाल्या.

आता मला रहावलं नाही….मी माझी सलवार पकडली आणि लगेच बाथरूममध्ये जाऊन दरवाजा आतून बंद केला.

वॉशरूम use केल्यावर मला हायसं वाटलं. मग मी माझा चेहरा धुतला…जो अजूनही लालच होता…अगदी माझ्या ड्रेससारखा. वाह!! लाल-लाल….वरपासून खालपर्यंत…टोमॅटोसारखी सून!! मी एक खोलवर श्वास घेतला…स्वतःला सांभाळलं आणि वॉशरूमच्या बाहेर आले.

खोलीत ना अर्जुन होता ना त्याची आई ना चहाचा ट्रे. मी परत हॉलमध्ये आले. अर्जुनने आपल्या आईला काय सांगितलं माहीत नाही..पण ती मला ignore करत होती. त्याच्या बाबांनी मला बसायला सांगितलं आणि फुटबॉल मॅच पाहू लागले. मी त्यांच्याशी बोलतच होते पण माझं सगळ लक्ष अर्जुन आणि त्याच्याकडे जात होतं. जे हळूहळू आवाजात काहीतरी बोलत होते. थोड्या वेळानंतर डिनर लागला.

मला असं वाटत होतं की, कधी एकदा ही संध्याकाळ संपतेय. मी लवकर लवकर जेवले आणि बाकीच्याचं जेवण संपायची वाट पाहू लागले. टेबलवरून उठताच मी म्हटलं की, मला उशीर होतोय आणि मला घरी जायचंय.

“Sure,” अर्जुन म्हणाला. “मी गाडी काढतो.”

“नाही, मी टॅक्सीने जाईन,” मी म्हणाले. मला फक्त तिथून लवकरात लवकर पळ काढायचा होता.

“नको, अर्जुन तुला घरी सोडेल ना,” त्याची आई म्हणाली.“रात्रीचं असं एकटं जाणं चांगलं नाही.”

क्षणभर खरंच वाटलं नाही…त्या अजूनही त्यांच्या मुलाबरोबर मला एकटं सोडायला तयार होत्या? Wow.

अर्जुने गाडीच्या किल्ल्या घेतल्या आणि बाहेर गेला. मी काही वेळ थांबले आणि त्याच्या आईबाबांना bye केलं…

मनातल्या मनात तर असं वाटत होतं की इथून पळून जाऊ पण ते चांगलं दिसलं नसतं. म्हणून मी त्यांना डिनरसाठी थॅंक्स म्हटलं आणि अर्जुनच्या मागे निघून आले.

त्याची आई दरवाजा बंद करण्यासाठी म्हणून माझ्या पाठी आली. “बेटा, पुढच्या वेळी कात्री मागून घे, मी तुला सेफ्टी पिनसुध्दा दिली असती.”

“Thanks, आंटी..That’s very nice of you,” मी म्हटलं आणि निघून आले.

गाडीत बसताच मला रडू आलं. अर्जुनने मला लगेच मिठीत घेतलं.“Shhh, it’s okay,” तो हळूच म्हणाला.

“मी आईला सांगितलं, जे झालं होतं ते. ती ऐकून हसली.” मी विचार करत होते की, ह्याच्या आईला काय वाटेल की त्यांच्या मुलाला किती मूर्ख  girlfriend मिळाली आहे.

“अच्छा, ऐक ना,” अर्जुन बोलला, “ही जागा आमच्या बाल्कनीतून दिसते आणि माझी आईसारखी बाल्कनीत येत जात असते…”

“OMG, चल इथून लवकर.” मी ओरडलेच.

तीन वर्षानंतर माझं आणि अर्जुनचं लग्न झालं. ह्या दरम्यान आमच्या नात्याने अनेक चढउतार बघितले. माझ्या आईबाबांना मनवणं सोप्प नव्हतं. माझे बाबा अर्जुनला नापसंत करू लागले होते…त्यांना वाटायचं की तो माझ्यावर खरं प्रेम करत नाही. पण काही काळानंतर सगळं ठीकं झालं.

नाडीच्या incident नंतर मी त्याच्या घरच्यांबरोबर कधीच जास्त वेळ घालवला नाही आणि त्याच्या आईशीसुध्दा हाय-हॅलोपेक्षा जास्त बोलले नाही. पण जेव्हा त्याने त्याच्या आईबाबांना सांगितलं की, त्याला माझ्याशी लग्न करायचंय तेव्हा ते खुश झाले आणि लग्नाच्या तयारीला सुरूवात केली. माहीत नाही अर्जुनच्या आईने त्याच्या बाबांना तो नाडीचा किस्सा सांगितला की नाही…कदाचित नाही.

लग्नाआधी माझ्या घरी शगूनचं सामान आलं. त्या सगळ्या सामानांमध्ये एक खूप सुंदर गिफ्ट होतं. अर्जुनच्या चुलत बहीणीने ते गिफ्ट माझ्या हातात देत म्हटलं की, “श्रद्धा आंटीकडून तुझ्यासाठी.” माझे हात ते गिफ्ट उघडताना अक्षरशः थरथरत होते. तो एक सुंदर लाल रंगाचा अनारकली ड्रेस होता ज्याच्या पायजम्याला इलास्टीक होतं…नाडी नाही.

मला माहीत होतं की, मी अर्जुनवर खूप प्रेम करते पण…त्या दिवशी माझं त्याच्या आईवर ही प्रेम जडलं. 🙂

 

Read More From नातीगोती