मनोरंजन

अंकिता लोखंडेचं नवं घर, तुलसी विरानी स्टाईलमध्ये केलं प्रेक्षकांचं स्वागत

Trupti Paradkar  |  Jun 30, 2022
Ankita Lokhande turns Tulsi Virani as she introduces her family in Marathi

‘पवित्र रिश्ता’ फेमअंकिता लोखंडे तिच्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल लाईफसाठी नेहमीच चर्चेत असते.  अंकिता लोखंडे आणि विकी जैन मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात लग्नाच्या बेडीत अडकले. लग्नाला अजून वर्ष पूर्ण न झाल्यामुळे अंकिता अजूनही नववधूच्या भूमिकेतच आहे. तिच्या वैवाहिक जीवनातील गोष्टी ती सतत सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकतीच अंकिताने एक इंस्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. अंकिता आणि विकी जैन लग्नानंतर त्यांच्या नवीन घरात शिफ्ट झाले होते तेव्हाचा हा व्हिडिओ आहे. या घराची आणि कुटुंबियांची ओळख करून देण्यासाठी अंकिताने एक नवी शक्कल लढवली आहे. तिने तिच्या कुटुंबाची ओळख ‘क्योंकि सांस भी कभी बहू थी’च्या तुलसी विरानी प्रमाणे करून दिली आहे. ज्यामुळे आता ‘क्योंकि सांस भी कभी बहू थी’ ही मालिका पुन्हा येणार आणि त्यामध्ये अंकिता तुलसीची भूमिका साकारणार अशा चर्चांना उधाण आलं आहे.

अंकिता झाली तुलसी विरानी

अंकिताने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती तिच्या नवीन घराचं दार उघडते आणि क्योंकि सांस भी कभी बहू थीच्या शीर्षक गीतावर चाहत्यांचे स्वागत करते. या व्हिडिओमध्ये ती तिचे सासू सासरे, दीर भावजया, नणंद आणि इुतर परिवार, आई, पती आणि देवघराचं दर्शन घडवताना दिसत आहे. हा व्हिडिओ आणखी स्पेशल आहे कारण तिने पोस्टमध्ये तिने अर्चना देशमुखची तुलना यात तुलसी विरानी सोबत केली आहे. अंकिता ‘पवित्र रिश्ता’मधील अर्चना देशमुख या नावाने घराघरात प्रसिद्ध झाली होती. त्यामुळे तिच्यासाठी ही ओळख कायमच खास असल्याचं या पोस्टमधून दिसत आहे. मात्र आता अंंकिता अर्चनाप्रमाणे तुलसीदेखील साकारणार का हा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

अंकिता साकारणार का नवीन तुलसी विरानी

अंकिताने नव्या घराच्या गृहप्रवेशासाठी लाल आणि सोनेरी रंगाची बनारसी साडी परिधान केली होती. शिवाय त्यावर टेंपल डिझाइनचे दागिने परिधान केले आहेत. हा व्हिडिओ जुनाच असून तिच्या लग्नानंतर ती जेव्हा नव्या घरात शिफ्ट झाली तेव्हाचा आहे. मात्र अंकिताने तो आता पोस्ट शेअर केल्यामुळे तिच्या नववधूच्या लुकची पुन्हा चर्चा होऊ लागली आहे. तसंच क्योंकि सांस भी कभी बहू ती मालिका पुन्हा सुरू होणार असा अंदाज बांधला जात आहे. अंकिता आणि विकी जैन काही दिवसांपूर्वीच ‘स्मार्ट जोडी’ या रिअॅलिटी शोचे विनर ठरले होते. या विजेतेपदासाठी त्यांना पंचविस लाखांचे पारितोषिक मिळाले होते. लग्नानंतर लगेच असा पुरस्कार मिळाल्यामुळे ते खरंच मेड फॉर इच अदर असल्याचं सिद्ध झालं आहे. पण अजूनही या पोस्टमागचं गुपित चाहत्यांसमोर उघड झालेलं नाही.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From मनोरंजन