बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा काही दिवसांपासून इन्स्टावर खूपच सक्रिय झाली आहे. तिचे मालदिव्जमधील मोनोकिनीमधले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पती विराट कोहली आणि लेक वामिकासोबत ती मालदिव्ज वेकेशनवर गेली होती. सोमवारी विराट आणि अनुष्का लेकीसह पुन्हा मुंबईत परतले. मात्र मुंबई एअरपोर्टवर येताच त्यांनी त्यांचा मोर्चा थेट कोकिलाबेन धिरूबाई अंबानी हॉस्पिटलमध्ये वळवला होता. पापराझींनी यावेळी विरूष्काला लेकीसह हॉस्पिटलमध्ये जाताना स्पॉट केलं. सहाजिकच त्यांचे फोटो पाहून चाहत्यांनी चिंता सतावू लागली. वेकेशनवर असं काय झालं की विरूष्काला येताना थेट हॉस्पिटल गाठावं लागलं.
मालदिव्जवरून परत आले अनुष्का आणि विराट
मालदिव्जवरून परतल्यावर मुंबईत हॉस्पिटलबाहेर अनुष्का आणि विराट त्यांच्या लेकीसह दिसल्यामुळे चाहत्यांना चिंता सतावू लागली. सोशल मीडियावर पाहता पाहता ही बातमी व्हायरल झाली. या फोटोजमध्ये विराट फोनवर बोलताना तर अनुष्का फोटोग्राफर्सनां काहीतरी सूचना देताना दिसत होती. त्यांच्या हावभावावरून त्यांना फोटो घेतलेले आवडले नाहीत असं वाटत होतं. मात्र असं असलं तरी यावरून ते हॉस्पिटलमध्ये का गेले हे मात्र समजलं नाही. काही तास हॉस्पिटलमध्ये काढल्यावर दोघंही लेकीसह पुन्हा घरी परतले. पंरतू यामुळे त्यांचे चाहते मात्र चिंतेत पडले. तिघांचे आरोग्य चांगले असावे म्हणून चाहते देवाजवळ प्रार्थना करत आहेत. कदाचित नॉर्मल रूटिन चेकअपसाठी ते हॉस्पिटलमध्ये गेले असावेत.
अनुष्काच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
अनुष्का शर्मा खूप दिवसांनंतर तिच्या पती आणि मुलीसोबत वेकेशनवर गेली होती. मालदिव्जवरून परत येताच तिने सोशल मीडियावर फोटोंचा सपाटा सुरू केला.
अनुष्काचे समुद्रकिनारी मोनोकिनीमधले फोटो चाहत्यांना खूप आवडले.
लवकरच ती तिच्या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. ‘चकदा एक्सप्रेस’ या चित्रपटात ती क्रिकेटर झूलन गोस्वामीची भूमिका साकारत आहे. चकदा एक्सप्रेस नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. अनुष्काला पुन्हा एकदा चित्रपटात पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक
Read More From बॉलीवूड
फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यावरील बायोपिक ‘सॅम बहादूर’च्या चित्रीकरणास सुरुवात
Vaidehi Raje