आहारात चांगल्या गोष्टींचा समावेश असावा असा हट्ट हा हल्ली आपल्या सगळ्यांचाच असतो. फिटनेसच्या बाबतीत आताची पिढी बरीच जागरुक झालेली आहे. त्यामुळे चांगल्या पदार्थांचा अगदी हमखास समावेश आहारात केला जातो. आता तुम्हीच आठवून बघा एखाद्या पदार्थांच्या सेवनाचे फायदे हे अनेक आहेत म्हटल्याबरोबर आपण तो पदार्थ विशिष्ट पद्धतीने आहारात घेतो. मखाणा, पालेभाज्या, अंडी, चिकन, मटण आणि काही पावर फूड्स हे फारच फायद्याचे आहेत. या अन्नपदार्थांच्या सेवनामुळे त्वचा, केस आणि आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळते. आता एखादा चांगला आहार तुम्हीही घेत असाल पण तरीदेखील तुम्हाला त्याचा फायदा होतोय की नाही हे जर जाणून घ्यायचे असेल तर तुम्हाला काही त्रास होणे अगदी स्वाभाविक आहे. जाणून घेऊया चांगला आहार घेऊन सुद्धा जर तुम्हाला असा त्रास होत असेल तर तुम्ही काय काळजी घ्यायला हवी ते.
हातसडीचा तांदूळ आरोग्यासाठी उत्तम, आहारात असा करा वापर
केसगळती
तुम्ही खूप चांगला आहार घेत असाल पण तरीदेखील तुमचे केस चांगले न होता मोठ्या प्रमाणावर गळत असतील तर तुम्ही घेत असलेल्या आहारातील घटक तुम्हाला मुळीच मिळत नाहीत. असे समजून जावे. कारण अचानक केस गळणे हे तुम्हाला तुमच्या शरीराला आवश्यक घटक न मिळण्याची पहिली निशाणी आहे. अशावेळी तुम्ही किती प्रोटीन्सचा समावेश करत आहात याची योग्य माहिती ठेवा. केस हे प्रोटीन्सचे बनलेले असतात. त्यामुळे आहारात तुम्ही किती प्रोटीन्स घेत आहात याचा अंदाज घ्या. त्यामुळे तुमची केसगळतीची समस्या कमी होण्यास मदत मिळेल.
पावसात भिजल्यावर त्वरीत करा या गोष्टी, नाहीतर पडाल आजारी
चेहऱ्यावर चमक नसणे
जर तुमचा आहार चांगला असेल तर त्याचा थेट परिणाम तुमच्या त्वचेवर तुम्हाला दिसून येतो. जेव्हा शरीरात पोटॅशिअम, व्हिटॅमिन E ची कमतरता असेल अशावेळी तोंडाची चमक कमी होऊ लागते. चेहरा अनाकर्षक दिसू लागला असेल तर तुमच्या आहारात काहीतरी गडबड झाली आहे असे समजावे. पोटाच्या आरोग्यावरही चेहऱ्यावरील चमक अवलंबून असते. अशावेळी तुम्ही आहारात व्हिटॅमिन C युक्त फळांचा समावेश करा. तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल.
पोट साफ न होणं
पोटाच्या आरोग्यावरही अनेक गोष्टी अवलंबून असतात. जर शरीरात फायबरयुक्त पदार्थ नसतील तरी देखील तुमचे पोट साफ होणार नाही. पोट साफ नसेल तर त्याचा थेट परिणाम हा तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो. त्यामुळे आहारात फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा. तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल.
डोकेदुखी
जर तुम्हाला वरचेवर डोकेदुखीचा त्रास होत असेल तर तुमच्या आहारात बऱ्याच गोष्टींची कमतरता आहे असे समजून जा.डोकेदुखी खूप जणांना अॅसिडीटीमुळे होऊ शकते. तुमच्या आहारात जर जंक फूड, पचनास जड असे खाद्यपदार्थ असतील तर तुम्हाला हा त्रास होऊ शकतो.त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त घरचं जेवणं आणि वेळेवर जेवायचा प्रयत्न करा त्यामुळे तुम्हाला हा त्रास होणार नाही.
5 मिनिट्समध्ये दातावरील प्लाक हटवा, जाणून घ्या घरगुती उपाय
थकवा
चांगले अन्नपदार्थ खाऊनही तुम्हाला थकवा येत असेल तर तुम्हाला शारीरिक थकवा आला असे समजावे. हा शारीरिक थकवा तुम्हाला पुरेसे अन्नपदार्थ न मिळाल्यामुळे देखील होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही काय खाता त्याकडे लक्ष द्या. आहारात केळी आणि दूध यांचा समावेश असू द्या त्यामुळे तुम्हाला पुरेशी एनर्जी मिळू शकेल.
आता हे काही त्रास होत असतील तर तुमच्या आहाराकडे लक्ष द्या